विकिपीडिया:वर्ग सुसूत्रीकरण/कार्यपद्धती

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)








कार्यपद्धती संपादन

सर्वसाधारण कार्यपद्धती:

  • मूळ या सर्वोच्च वर्गापासून विकिपीडियावरील लेखांचे विषयानुरूप ढोबळ विभाजन होईल असे प्राथमिक स्तरातील ५-६ उपवर्ग तयार करणे. उदा.: निसर्ग, समाज, विचार. या प्राथमिक स्तरावरील वर्गांचे इतर द्वितीय स्तरावरील किंवा आणखीन स्तरीय रचनेत विभाजन करावे. हा शाखाविस्तार एकदा संमत झाला की लेखांचे योग्य त्या वर्गात वर्गीकरण करण्यास सुरुवात करता येईल.

मराठी विकिपीडियावरील वर्गीकरण साधारणपणे इंग्लिश विकिपीडियाप्रमाणेच असते. यावर त्रोटक चर्चा अधूनमधून झाली असून ती चावडीच्या जुन्या पानांवर इतस्ततः आहे पण याचे सगळे नियम अद्याप कोठे लिहून ठेवण्यात आलेले नाहीत तरी येथे मी प्रयत्न करतो. या चर्चेतून निष्पन्न होणारे नियम Formalize करता येतील.

१. मराठी विकिपीडियावरील प्रत्येक लेख वर्गीकृत असावा.

१.१ लेख लिहिताना वर्गीकरण कसे करावे हे न कळल्यास लेखाच्या शेवटी {{वर्गीकरण}} हा साचा घालावा, ज्यायोगे इतर सदस्य वर्गीकरण करतील.अद्याप पर्यंत अवर्गीकृत राहिलेल्या लेखांचे वर्गीकरण वर्ग:अवर्गीकृत येथे होते. वर्ग:अवर्गीकृत येथील लेखांकरिता सुयोग्य वर्ग माहित असल्यास त्यांचे सुयोग्य वर्गात वर्गीकरण करावे.

२. मराठी विकिपीडियावरील प्रत्येक वर्ग वर्गीकृत असावा.

२.१ ‌- १.१ प्रमाणेच.

३. लेखाचे वर्गीकरण करताना शक्य तितक्या सगळ्या वर्गांत लेख घालावा, पण पुनरावृत्ती करू नये.

उदा. बोईंग ७४७ हा लेख बोईंग प्रवासी विमाने, प्रवासी विमाने व प्रचंड प्रवासी विमाने या वर्गांत बसतो. हाच लेख परत बोईंग विमाने, मोठी विमाने या वर्गांत (बसत असला तरी) करू नये.

४. वर्गीकरण करताना सगळ्यात खालच्या (towards the leaf node of the category tree) वर्गात करावे. वरच्याच उदाहरणातील बोईंग ७४७ लेख बोईंग विमाने व बोईंग प्रवासी विमाने या दोन्हीत बसत असला तरी बोईंग प्रवासी विमान हे जास्त सयुक्तिक आहे.

हा नियम subjective आहे व याला अनेक अपवाद असू शकतात. शंका असल्यास लेखाच्या चर्चा पानावर किंवा चावडीवर विचारावे.

५. लेखाचे वर्गीकरण करताना योग्य तेथे त्याचे Alphabetization करावे. उदा. शंकरराव चव्हाण या लेखाचे वर्गीकरण करताना [[वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|चव्हाण, शंकरराव]] असे करावे.

क्रमित लेखांसाठी आकडे वापरावे, उदा. [[वर्ग:पोप|जॉन ०१]], [[वर्ग:पोप|जॉन ०२]], इ.

६. वर्गाचे नाव बहुवचनी असावे. उदा - [[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]], [[वर्ग:इंग्लंडचे राज्यकर्ते]], इ.

७. वर्ग पानावर वर्गाचे संक्षिप्त वर्णन अपेक्षित आहे पण गरजेचे नाही.

८. प्रत्येक वर्ग शेवटी विकिपीडियावरील मूळ वर्गांत वर्गीकृत व्हावा. उदा. फ्रेंच ओपन --> ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा --> टेनिस स्पर्धा --> टेनिस --> मैदानी खेळ --> क्रीडा.

८.१ एखाद्या वर्गाला एकच असा मार्ग असेल असे नाही. उदा. फ्रेंच ओपन --> फ्रांस --> देश --> भूगोल, किंवा फ्रेंच ओपन --> फ्रांसमधील टेनिस स्पर्धा --> देशानुसार टेनिस स्पर्धा --> टेनिस स्पर्धा --> टेनिस --> मैदानी खेळ --> क्रीडा

अस्तित्वात असलेले पण वर्गीकरणात न आलेले लेख कसे शोधावेत ? संपादन

  1. विशेष:उपसर्गसूची [सोप्या शब्दात लिहा] आणि विशेष:सर्व_पाने येथे लेखांची समग्र सूची (अल्फाबेटिकल-अकारविल्हे) उपलब्ध असते. विशेष:विशेष_पाने येथे इतरही काही सूची उपलब्ध असतात. विकिपीडिया वर्णमाला आधारित अनुक्रमणिकासुद्धा शोधकामात उपयोगी पडते. या सूची स्वयमेव निर्मित असतात.विकिपीडिया:सफर साहाय्य पान लेखांपर्यंत पोहचण्याचे इतर मार्ग विषद करते.त्या शिवाय विशेष:शोधा येथील उन्नत शोध एवढेच नाहीतर गूगल शोध सुद्धा बऱ्याचदा मदतीला धावून येतो असे आढळून येते.