प्रिय विकिसदस्य,

विषयः प्रताधिकार संदर्भात

आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.




आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते.

मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी .

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.


साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते.

आपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.

आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.



असे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे.


आपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.


आपले विनीत,

साहाय्य चमू

ता.क.:

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले