विकिपीडिया:वार्तांकन नको

वृत्तपत्रीय लेखनाची वार्तांकनशैली ही विश्वकोषीय लेखनाशी विसंगत ठरते .

  • वृत्तपत्रीयशैलीतील लेखन मुख्यत्वे वार्ताहारांच्या दृष्टीकोणामुळे झालेले प्रथम पुरूषी लेखन असते. यातील लेखन प्रयोग जसे की "असे मला/आम्हाला कळाले/आढळले/दिसून आले/दिसून येते" अशा तत्सम स्वरूपाचे असते. विश्वकोषीय लेखनात तृतीयपुरूषी लेखन करावे लागते. यात "मी, आम्ही, आम्हाला, तु तुम्ही तुम्हाला आपल्याला आपण" अशा स्वरूपाच्या वाक्यरचना टाळणे अभिप्रेत असते.

वृत्तपत्रीय लेखन बर्‍याचवेळा कालसापेक्ष असते.वृत्तपत्रास तारीख असते त्या तारखेच्या संदर्भाने वाचक "अलिकडे, नुकतेच, काल, आज, उद्या, गेल्या महीन्यात/वर्षी, या महीन्यात/वर्षी, पुढच्या महीन्यात/वर्षी" अशा शब्दांचा नेमका अर्थ लावू शकतात.विश्वकोशीय वाचताना "अलिकडे, काल, आज, उद्या" अशा कालवाचक शब्दांवरून "नेमके केव्हा ?" याचा बोध होत नाही किंवा चुकीचा बोध होण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे कालसापेक्षता आवर्जून टाळली पाहीजे.

  • वृत्तपत्रीय लेखनात एकच बाजू कशी बरोबर आहे अशा स्वरूपाची वार्ताहरांची स्वतःची पुर्वग्रह/मते/निष्कर्शांचे प्रतिबिंब असू शकते जे तटस्थ आणि साक्षेपी असेल याची बर्‍याचदा खात्री नसते.

आपण [ वार्तांकन दोष] येथे टिचकी देऊन या सहाय्यपानावर पोहोचला असालतर, कृपया ब्राऊजरच्या 'बॅक की' वर टिचकून आपण वाचत होता त्या पानावर परत जाऊन त्या लेखातील वार्तांकनता दोष असलेल्या लेखनाचे पुर्नलेखन करून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती.

विकिपीडिया काय नाही

संपादन

विकिपीडियाचा आवाका मुक्त आहे पण परिघाला ज्ञानकोशीय मर्यादा आहेत.

  • विकिपीडिया ...
    • पहिल्या माहितीची स्रोत किंवा ब्रेकिंग न्यूज नाही.
    • भविष्यकालीन घटनांची असंबद्ध यादी नाही. (या विषयावर अधीक तात्वीक चर्चा विकिपीडिया:उल्लेखनीयता येथे करा.

अविश्वकोशिय वार्तांकन प्रयोग

संपादन
  • आढळते/आढळतो/आढळून आले , दिसते, दिसून येते

काही अविश्वकोशिय वार्तांकन लेखन उदाहरणे

संपादन
  • कोट्यवधी रूपयांच्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली.[ संदर्भ हवा ] [ वार्तांकन दोष]
न्यायालयात आरोप सिद्ध होण्यापूर्वी अटक होऊन व्यक्तीस जेल मध्ये जावे लागले तरी वृत्तपत्रीय लेखक अशा स्वरूपाचे लेखन करू शकतात. विश्वकोशिय लेखनात मात्र अधीक सुसंगत नेमकेपणा अभिप्रेत असतो.वरील वाक्यात घटना केव्हा घडली त्यातारखेचा उल्लेखही नाही "अलिकडे केव्हातरी घडले " अशास्वरूपाचे लेखन विश्वकोशिय लेखनास अनुसरून नसते.

पत्रकारीतेतील आदर्श आणि विश्वकोशीय लेखनातील साम्यस्थळे आणि फरक

संपादन

विकिपीडिया ज्ञानकोश आहे.पत्रकारीतेतील आदर्शांप्रमाणेच विकिपीडियातील लेख तटस्थ, वस्तूनिष्ठ, समतोल, सर्वसमावेशक दृष्टिकोनातून लिहिणे अपेक्षित असते (पण पत्रकारीतेत या बाबींकडे मवाळपणे पाहिले जाते) .अर्थातया सर्व बाबींबाबत ज्ञानकोशातील अपेक्षेचा बार पत्रकारीतेपेक्षाही खूपच अधीक उंचीवर,अधीक कडक असतो .

पत्रकारीतेत माहितीस दुजोरा घेणे आणि खातरजमा करणे अभिप्रेत असते;पण एकतर असेकरणे संबधीत पत्रकारावर व्यक्तिश: अवलंबून असते वृत्तपत्रीय लेखनात व्यक्तिगत निरीक्षण,निष्कर्श आणि प्रथम स्रोतातील(अ-पुर्वप्रकाशित) तसेच मौखीक माहिती स्विकारता येते .ज्ञानकोशात पहिली मांडणी केली जात नाही, आधी कुठेतरी मांडणी/लेखन झाले आहे अशा मांडणीचे समसमीक्षण झाले आहे अशा माहितीचे खातरजमा करण्यायोग्य जमेल तेवढे वाक्यागणीक पुर्वप्रकाशित स्रोतातील संदर्भही द्यावे लागतात.


वृत्तपत्रीय लेखनात हातातील लेख विषयाकडे संबधीत विषयाच महत्व अधोरेखीत करण्याकरिता/लक्षवेधण्याकरिता/वाचकाच्या संवेदना/विवेक जागृतकरण्याकरिता लक्षवेधक मथळे आणि लक्षवेधी लेखन करण्यास अनुमती असू शकते पण असे करताना पत्रकाराच्या/लेखकाच्या व्यक्तिगत मताचे प्रतिबिंब येत तटस्थता, वस्तूनिष्ठता , समतोलता या मुल्यांशी तडजोड काही अंशी स्विकारली जाते.

ज्ञानकोशीय लेखकाच्या अपेक्षा भिन्न असतात.विश्वकोशीय वाचकांना भाषेचे सौंदर्य/लक्षवेधकता अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोन: आम्ही ज्ञानकोश मोजक्या तथ्यांसाठी आणि आकडेवारीसाठी वाचतो. येथे आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित मिळावीत. पण आमचे मन आणि विचार प्रभावित करण्याकरिता ज्ञानकोशांतील लेखकांचे मत त्यात मिसळू नका असा असतो. कोशांतील लेख वाचून वाचक आपले मत आपण बनवतो.ज्ञानकोशाच काम सत्य जस आहे तस मांडण्याच आहे ; विवेकाची जबाबदारी ज्याची त्याची व्यक्तिगत आणि माहिती आणि समाजातील इतर घटकांची आहे , वाचकाच्या विवेकाची जबाबदारी ज्ञानकोशांची नसते.

वृत्तपत्रीय लेखनात सद्दघटना किंवा लक्षवेधी लेखनाने सुरवात केली जाते , विषयाची ओळख पार्श्वभूमी इतिहास या बाबी नंतर वेगळ्या क्रमाने येतात.विश्वकोशीय लेखनात विषयाची व्याख्या ओळख इतिहास शेवटी सद्द स्थिती असा क्रम येतो.

* अधिक माहिती

विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. मराठी विकिपीडिया हि काही सर्वसाधारण वेबसाईट नाही, विकिपीडिया एनसायक्लोपिडीया विश्वकोश/ज्ञानकोश आहे. येथील लेखन मजकुर आणि लेखन संकेत ज्ञानकोशीय परिघास अनुरूप असणे गरजेचे असते, विकिपीडियावर लिहिताना वार्तांकन अथवा वृत्तपत्रीयशैलीतील लेखन मुख्यत्वे वार्ताहारांच्या दृष्टीकोणामुळे झालेले प्रथम पुरूषी लेखन प्रयोग "असे मला/आम्हाला कळाले/आढळले/दिसून आले,दिसून येते/" प्रयोग टाळणे अभिप्रेत असते. शिवाय असे लेखन बऱ्याचदा नवागत संपादकांकडून ऑनलाईन वृत्तपत्र माध्यमातून जसेच्या तसे कॉपी पेस्ट झाल्यास कॉपीराईट कायद्दांचा भंग होणे संभवते.

वर्तमान अथवा भविष्यातील "काळाची गरज" स्वत: किंवा इतरांनी उल्लेखीलेली या सुद्धा ज्ञानकोशाकरीता अनुल्लेखनीय आहेत.

कृपया या लेखात/लेखनात जर वार्तांकन शैली असेल तर संदर्भासहीत पुर्नलेखन करून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.

आपण करू इच्छित असलेला लेखातील बदल जतन करण्यापूर्वी, बदलांची झलक पाहून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे सूचित केले जात आहे.हे सुद्धा पहा

संपादन