विकिपीडिया:मराठी विश्वकोश

मराठी विकिपीडियावरील रिकाम्या लेखांचे प्रमाण कमी होण्यात अंशत: हातभार लागू शकेल. नवागतांकडून अनवधानाने मराठी विश्वकोशातून होणारे कॉपीपेस्टला मराठी विकिपीडियात अंशत: सामावून घेता येऊ शकेल.

मराठी विश्वकोशातून घेतलेल्या मजकुराची दोन उदाहरणे बनवली आहेत. आधीपासून असलेल्या लेखातील उदाहरण "गाहा_सत्तसई#शृंगार आणि उछृंखलता" विभाग; नविन लेखाचे उदाहरण "लवण". तुमच्या शाळेच्या आठवतो च्या गावातील सार्वजनिक ग्रंथालय तुम्ही गेल्या तर अनेक झाडं मोठी पुस्तके असलेल्या काचेचं कपाट तुमचं लक्ष वेधून घेईल मराठीच्या विविध साहित्य संपदा सोबत मराठी विश्वकोश मराठी मराठी चरित्र कसे मराठी शब्दकोश असे ग्रंथ वाचण्याचा पण मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेऊ या विज्ञान विषयाची माहिती मिळाली समजून घेता येतो

पार्श्वभूमीसंपादन करा

मराठी विकिपीडिया सदस्य:Rahuldeshmukh101 , सदस्य:अभय नातू, सदस्य:Mahitgar, सदस्य:Sudhanwa यांच्या सक्रीय प्रयत्नामुळे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा मराठी विश्वकोशाने अंशत: का होईना गैरव्यावसायिक वापरापुरते काही अटी मांडत, प्रताधिकार स्तर कमी केले हे त्यांच्या https://marathivishwakosh.maharashtra.gov.in या वेबसाईटला आज भेट दिल्या नंतर दिसून आले.[१]

प्रस्तावसंपादन करा

पब्लिक डोमेन मध्ये टाकलेले नसल्यामुळे आणि काही अटींसहीत कमर्शीअल आधिकार राखीव ठेवल्यामुळे, व त्यांच्या त्यांचे प्रताधिकारस्तर कमी करणे मराठी विकिपीडियाच्या प्रताधिकार परवान्याशी जसेचे तसे जुळणारे नाही. तसेच मराठी विश्वकोशातील पारिभाषिक शब्दांचे वेगळेपण, माहिती जुनी असणे आणि त्यांच्या माहितीत बदल करण्यात आपल्या मनुष्यबळाच्या मर्यादा लक्षात घेता मराठी विश्वकोशातील माहिती सरसकटपणे मराठी विकिपीडियावर घेणे रास्त होणार नाही. पण त्याच वेळी मर्यादीत प्रमाणांची अट टाकून अंशत: प्रायोगिक स्वरुपात सुरु करावयास हरकत नसावी म्हणून तसा प्रस्ताव आणि प्रकल्प मांडत आहे.


 • मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळाच्या अटींचे पालन करण्याची तसेच मजकुरात व संदर्भांमध्ये सुयोग्य बदल करण्याची तयारी असावी.
 • मराठी विश्वकोशाच्या व्यावसायिक संधीं बद्दल आदर ठेवावा
 • उपयोग कमीत कमी ठेवावा
  • प्रस्ताव:प्रतिलेख न बदललेला अधिकतम मजकुर, ४००० बाईट्स किंवा २ परिच्छेद जे कमी असेल ते मान्य असावे.
  • प्रति सक्रीय मराठी विकिपीडियन अधिकतम ५ लेखात माहिती आणण्यास परवानगी असावी.
  • मराठी विकिपीडियावर सुरवातीस एकुण अधिकतम १०० लेखांची अट असावी, मजकुर अद्ययावत ठेवणे आणि मराठी विश्वकोशाच्या अटी समजून घेणे आणि पाळण्याची मराठी विकिपीडिया सदस्य कितपत काळजी घेतात हे पाहून हि मर्यादा भविष्यात वाढवता येईल
 • इतर स्रोतातून मुक्त स्रोतातून समकक्ष माहितीची अनुपलब्धता असावी.
 • त्या लेखाच्या/विभागाच्या काँटॅक्स्टच्या द्ष्टीने घेतल्या जाणाऱ्या मजकुराची गरज असावी
 • केवळ लेख नामविश्वापुरता मर्यादीत असावा
 • मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रकाशित असावे, (अजून प्रकाशित झाले नाही अशी माहिती काही कारणाने मिळाल्यासही घेऊ नये)
 • मजकुर इतर विकिपीडिया संकेतांचे पालन करणारा असावा
 • हे विशीष्ट धोरण केवळ मराठी विश्वकोशाच्या https://marathivishwakosh.maharashtra.gov.in वेबसाईटवरील मजकुरासाठी मर्यादीत राहील.
 • या संदर्भाने सुसुत्रीकरण आणि नियोजनासाठी हे वेगळे प्रकल्प पान असावे.


मराठी विश्वकोशच्या वेबसाईटवर तळटिप, अटी आणि तात्पर्यसंपादन करा

Copyright © 2017"गैरव्यावसायिक वापरासाठी विश्वकोशाचे स्वामित्व हक्क खुले करण्यात आले आहेत." (काही अटीसह) . संकेतस्थळ निर्मीती, सीडॅक जिस्ट, पुणे यांच्यामार्फत करण्यात आली.[२]

"काही अटीसह" हा दुवा https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/terms.html या पत्त्यावर उघडले तेथे दिसलेल्या अटी खालील प्रमाणे.

अटी

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या खंडाचे मूळ स्वरुप कायम ठेवून भारतीय कॉपीराईट अधिनियम, १९५७ च्या कलम २१ मधील तरतुदीनुसार मराठी विश्वकोशाचे स्वामित्व हक्क गैरव्यावसायिक वापरासाठी खुले करण्यात आले आहेत." त्या अटी खालीलप्रमाणे आहेत.

१) मराठी विश्वकोशामध्ये संग्रहित केलेली माहिती मूळ स्वरूपात तशीच कायम राहील.

२) विश्वकोशातील माहितीचा वापर करायचा असल्यास एक स्रोत म्हणून वापर करावा.

३) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या खंडाचा, नोंदीचा, लेखकाचा योग्य तेथे संदर्भ म्हणून उल्लेख असावा.

४) वाचकांना मूळ नोंद पाहण्यासाठई या कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाण्याची सोय असावी. (संकेतस्थळाचा पत्ता - www.marathivishwakosh.maharashtra.gov.in)

५) विश्वकोशातील माहितीचा वापर केल्यानंतर एखादी व्यक्ती व संस्था त्यामध्ये जो बदल करेल ती त्या व्यक्ती व संस्थेची स्वंतंत्र निर्मिती व जबाबदारी राहील. त्याची जबाबदारी विश्वकोश मंडळाची राहणार नाही. [३]

मराठी विकिपीडियनसाठी तात्पर्यसंपादन करा

१) मराठी विश्वकोशातून माहिती जशीच्या तशी आणली तर; मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या खंडाचा, नोंदीचा, लेखकाचा योग्य तेथे संदर्भ आणि मराठी विश्वकोशातील लेखाचा दुवा देणे अभिप्रेत आहे,

२‌) त्यांच्या मजकुरात जो पर्यंत बदल केला जात नाही तो पर्यंत गैरव्यावसायिक उपयोगास परवानगी नसल्याचे संबंधीत विभागातील साचातून वाचकास समजले पाहिजे, [असे का? १] [असे का? २]

३‌) विकिमिडीया फाऊंडेशनला अभिप्रेत अधिकतम मजकुर क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/ शी मॅच होण्याच्या दृष्टीने अशा मजकुरास शक्य तेवढ्या लवकर बदलावे./अद्ययावत करावे

४) मराठी विश्वकोशाच्या मजकुरात बदल केल्या नंतर संबधीत संदर्भात बदल करणाऱ्या व्यक्तीची स्वंतंत्र निर्मिती व जबाबदारी राहील. त्याची जबाबदारी विश्वकोश मंडळाची राहणार नाही. आणि विकिपीडियाचा उत्तरदायकत्वास नकार लागू राहील हे संदर्भात नोंदवावे.

प्रस्ताव समर्थन अथवा विरोधसंपादन करा

समर्थन/विरोध मत
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. कौल देताना कृपया आपले सदस्य नाव द्यावे कृपा {{कौल}} पहा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:४०, १५ जानेवारी २०१७ (IST)
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. कौल देताना कृपया आपले सदस्य नाव द्यावे कृपा {{कौल}} पहा.
--वि. नरसीकर (चर्चा) १६:२१, १५ जानेवारी २०१७ (IST)
योग्य ते पाऊल आहे.
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. कौल देताना कृपया आपले सदस्य नाव द्यावे कृपा {{कौल}} पहा.
--प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) २२:४३, १७ जानेवारी २०१७ (IST)

साचे आणि संदर्भ कसे जोडावेतसंपादन करा

{{साचा:कॉपीपेस्टमवि}} खालील प्रमाणे दिसेल.***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***


संदर्भ उदाहरण १संपादन करा

<ref name="केळकर_आणि_दातार">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = दि. श्री.; | आडनाव = दातार | लेखक = दातार, दि. श्री.; | सहलेखक = केळकर, गो. रा. | शीर्षक = मराठी विश्वकोश | मालिका = (जर पुस्तक कोणत्या पुस्तकमालेचा भाग असेल, तर त्या पुस्तकमालेचे नाव) | प्रकरण = मीठ | भाषा = मराठी | संपादक = संपादक: (कै.) [[लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी]] | प्रकाशक = महाराष्ट्रराज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | आवृत्ती = (पुस्तकाची प्रकाशन आवृत्ती) | दिनांक = | महिना = | वर्ष = (पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष) | फॉरमॅट = ऑनलाईन संकेतस्थळातून | अन्य = (आवृत्तीविषयक इतर माहिती) | पृष्ठ = ? | पृष्ठे = ?? | आयएसबीएन = (पुस्तकाचा ८-आकडी आय. एस. बी. एन. क्रमांक उदा.-11111111) | दुवा = https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/ | संदर्भ = https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand13/index.php/component/content/article?id=10465 | अ‍ॅक्सेसदिनांक = ३०, सप्टेंबर २०१५ रात्रौ १२ ०५ | अ‍ॅक्सेसमहिना = सप्टेंबर | अ‍ॅक्सेसवर्ष = २०१५ | अवतरण = पुस्तकातील विशिष्ट वाक्य, ज्याचा संदर्भ घेतला आहे : "रासायनिक परिभाषेत याला सोडियम क्लोराइड म्हणतात." ...."रासायनिक सूत्र NaCl. सोडियमाचे हे सर्वांत महत्त्वाचे संयुग आहे." }}</ref>

संदर्भ उदाहरण २संपादन करा

<ref>{{cite encyclopedia |title= गरुड-१ |encyclopedia= मराठी विश्वकोश |author= ठाकूर अ. ना. |volume= खंड ४ |publisher= महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ |location= मुंबई |id= ७१२४ |url= https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand4/index.php/khand4-suchi?id=7124 }}</ref>

हे संदर्भ सुद्धा पहासंपादन करा

नोंदीसंपादन करा

संदर्भसंपादन करा

 1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले