भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१
भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१ अनुसार, 'कामाचे लेखक' विहीत नमुन्यात कॉपीराइट निबंधक यांना सूचना देऊन, अथवा जाहीर उद्घोषणे द्वारे सुद्धा, 'कामात समाविष्ट' सर्व अथवा अंशतः अधिकारांचा त्याग करू शकतात. भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम ३० परवाने देण्यास अनुमती देते ज्यास कलम १९ची उपकलमे अंशतः लागू होतात. भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम ७८ उपलम (२) क्लॉज (b) परवान्यांच्या स्वरूपाच्या बाबतीत केंद्रसरकारला नियम बनवण्यास अनुमती देते. असे नियम कॉपीराइट रूल्स २०१३ नियम क्रमांक ४ आणि ५ मध्ये नमुद केले गेले. यात , कॉपीराईट निबंधकांना अर्ज पाठवण्यासाठी Form I आणि प्रतिज्ञापत्राचे विहीत नमुने आणि प्रताधिकार त्यागाच्या जाहीर उद्घोषणेसोबत जोडावयाची माहिती दिली आहे.
- (अनुवाद)
- २१. प्रताधिकार त्यागाचा लेखकाचा अधिकार
- (१) 'कामाचे लेखक' विहीत नमुन्यात कॉपीराइट निबंधक यांना सूचना देऊन, अथवा जाहीर उद्घोषणे द्वारे,[6thAmnd १] 'कामात समाविष्ट' सर्व अथवा अंशतः अधिकारांचा त्याग करू शकतील आणि की ज्या नंतर, उप-कलम ३ मधील तरतुदींच्या आधीन राहून, सूचनेच्या दिवसा पासून संपुष्टात येतील.
- (२) उपकलम १ खाली सूचना प्राप्त झाल्यानंतर, कॉपीराइट निबंधक, त्यांना सुयोग्य वाटेल अशा पद्धतीने अधिकृत राजपत्रात आणि अशा इतर पद्धतीने प्रकाशित करवतील.
- [6thAmnd २](२A) कॉपीराइट निबंधक अधिकृत राजपत्रात सूचना प्रकाशित झाल्यापासून चौदा दिवसांचे आत कॉपीराइट कार्यालयाच्या अधिकृत संस्थळावर सूचना देतील की, ज्या सूचनेची सार्वजनिकरित्या उपलब्धता[विशीष्टार्थ १], तीनवर्षेपेक्षा कमी असणार नाही.
- (3) 'कामा'बद्दलच्या प्रताधिकारातील कोणतेही अधिकार पूर्ण अथवा अंशतः त्यागण्याने, उपकलम (१) मध्ये नमुद संदर्भातील सूचना देण्याच्या तारखेस कोणत्याही व्यक्तीच्या प्रती विद्यमान असलेले कोणतेही अधिकार बाधीत होणार नाहीत.
* भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१ चा इंग्रजी मसुदा आणि या लेखात वापरलेल्या इंग्रजी मराठी विकि संज्ञा, उपयुक्त तांत्रिक शब्दांचे सामान्य अर्थ यादी इत्यादी
|
---|
भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१चा इंग्रजी मसुदा
|
विशीष्टार्थ
संपादन- ^ इंग्लिश: Public Domain, मराठी: सार्वजनिकरित्या उपलब्ध *भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१ च्या उप-कलम (2A) मध्ये पब्लीक नोटीस तीन वर्षे पब्लिक डोमेन मध्ये असावी असे म्हणले आहे, त्या पब्लिक डोमेन शब्दाचा तेथे प्रथमदर्शनी अभिप्रेत अर्थ सार्वजनिक उपलब्ध असावी एवढाच होण्याची शक्यता असेल का सार्वजनिक अधिक्षेत्र म्हणल्यामुळे संस्थळावरची नोटीस इतरत्र संदर्भासाठी सहज वापरता येईल असा उद्देश असेल?
- copyright प्रताधिकार
- काही पारिभाषिक शब्दार्थ संदर्भ :http://www.marathibhasha.org/ येथून
विविध कायद्यांतर्गत संबंधीत कलमे
संपादन- ^ for the words "the Registrar of Copyrights”, the words "the Registrar of Copyrights or by way of public notice” substituted;..by subsection (i) of Section 11 of Act 27 of 2012, w.e.f. 8th June, 2012
- ^ Inserted sub-section (2A) after sub-section (2)..by subsection (ii) of section 11 of Act 27 of 2012, w.e.f. 8th June, 2012
- ^ Inserted sub-section (2A) after sub-section (2)..by subsection (ii) of section 11 of Act 27 of 2012, w.e.f. 8th June, 2012
- भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १९
- भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम ३०
- कॉपीराइट रूल्स २०१३ नियम क्रमांक ४ आणि ५
न्यायालयीन निकालांचे दाखला अभ्यास
संपादन- उत्तरदायकत्वास नकार लागू
क्रमांक | केस शक्यतो ऑनलाईन दुव्यासहीत | माननीय उच्च अथवा सर्वोच्च न्यायालय | वर्ष | कायदा आणि कलम (आणि उपलब्ध असल्यास दाखला मजकुर |
(दाखला अभ्यास विश्लेषण असल्यास केवळ उचित संदर्भासहीत) |
---|---|---|---|---|---|
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | |
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | |
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | |
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | |
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | |
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | |
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | |
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण |