स्वागत प्रथमेश ताम्हाणे, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन प्रथमेश ताम्हाणे, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९५,७१५ लेख आहे व २८२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादकात़़ दुवे देण्याची सुविधा उपलब्ध करणारे चिन्ह

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) २०:३०, ३० एप्रिल २०१४ (IST)Reply

स्वागत व अभिनंदन संपादन

आपण विकिमध्ये मोलाची भर घालत आहात हे बघुन बरे वाटले.आपल्या पुढील लेखनास माझ्या हार्दिक शुभेच्छा.--वि. नरसीकर (चर्चा) १०:०३, ७ जून २०१४ (IST)Reply

धन्यवाद.
न्यूटनच्या नियमांचा लेख देखिल वाढवण्यात रस असेल तर कळव. अंतराळ स्थानकाचा लेख छान करतो आहेस.
स्नेहल शेकटकर १९:१३, ८ जून २०१४ (IST)
मला रस आहे पण मी आणि मिहिर रेडिओ खगोलशास्त्रावरती लेख लिहित आहोत. तो लेख पूर्ण झाला कि सांगेन.
प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) २०:३३, ८ जून २०१४ (IST)Reply

माहितीचौकट साचे संपादन

नमस्कार,

मराठी विकिपीडियावरील माहितीचौकट साचे माहितीचौकट साचे येथे आहेत.

नवीन माहितीचौकट साचा बनविण्यासाठी इंग्लिश किंवा इतर विकिपीडियावरील तत्सम साचा येथे आयात करुन त्यात पाहिजे तसे बदल करुन घ्यावेत. पॅरामीटरचे मराठीकरण केले तर उत्तम पण गरजेचे नाही. याशिवाय अधिक पॅरामीटर घालणे, नको असलेले पॅरामीटर काढून टाकणे, रचनेत बदल करणे, इ. बदलही करता येतात.

हे करीत असताना तुम्हाला मदत लागली तर कळवावे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १९:००, २१ जानेवारी २०१६ (IST)Reply

आपण् दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) २२:४३, २१ जानेवारी २०१६ (IST)Reply
मराठी विकिपीडियावर आपण चांगले काम करत आहात. सांच्यांच्या आत बरेच साचे अशी बऱ्यचदा स्थिती असते आणि एक एक साचा आयात करणे कठीण होते. आपण मराठी करणासाठी स्वत: वेळ देऊ शकत असलेले इंग्रजी विकिपीडियातील साचे जरूरी नुसार कळवल्यास प्रचालक असा साचा एकगठ्ठा आयात करून देण्यात साहाय्य देऊ शकतील.
पु.ले.शु.(पुढील लेखनास शुभेच्छा)
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:३४, ४ फेब्रुवारी २०१६ (IST)Reply
धन्यवाद. मला साच्यांचे मराठीकरण करायला आवडेल. अभय नातू यांनी एकदा संरक्षित क्षेत्राच्या साच्यासाठी मदत केली आहे. त्यासाठी त्यांना धन्यवाद. यापुढेही मदत लागल्यास कळवेन. -- प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) १५:५४, ४ फेब्रुवारी २०१६ (IST)Reply

आययुसीएन पताका संपादन

मी आययुसीएन पताका हा साचा तयार केला आहे. यातील इंग्लिश मजकूराचे अचूक/चपखल मराठीकरण करावे.

अभय नातू (चर्चा) ०२:१४, २२ जानेवारी २०१६ (IST)Reply

साचा:माहितीचौकट संरक्षित क्षेत्र संपादन

साचा:माहितीचौकट संरक्षित क्षेत्र साचा बराचसा तयार आहे. आता नकाशाचे किचकट काम उरले आहे. तेही बघतोच :-)

अभय नातू (चर्चा) ०२:४३, २२ जानेवारी २०१६ (IST)Reply


विंडोज एक्सपी आणि बराहा संपादन

माझ्याकडे विंडोज XP आणि बरहा फाँट्‌स आहेत. मी टंकलेखित केलेला र्‍या हा माझ्या संगणकाच्या पडद्यावर चंद्रकोरीला लावलेल्या या सारखा दिसतो, म्हणजे मराठीत जसा हवा आहे तसा. दुर्दैवाने मराठी सोडून अन्य भारतीय भाषांमध्ये र्‍या अक्षराची गरज पडत नाही. मराठीत ते अक्षर रा-कारान्त, री-कारान्त किंवा रे-कारान्त शब्दाचे अनेकवचन वा प्रत्ययापूर्वीचे सामान्य रूप करताना लागते. उदा० दोरा-दोर्‍या-दोर्‍याने सुरा-सुर्‍याने, खोरे-खोर्‍याने, बरा-बर्‍यापैकी, चोरी-चोर्‍या वगैरे. हे अक्षर अन्य भाषकांना लागत नसल्याने बहुतेक युनिकोड फाँट्‌समधे ते लिहायची सोय नसते. अशी आणखीही काही अक्षरे आहेत, की जी फक्त मराठीत आहेत. उदा० र्‍होडेशियातला र्‍ह, अॅटममधला अॅ, ड्यमधला पाऊण य, हविर्अन्‍न मधला र्अ, कुर्आनमधला र्आ, पुनर्उभारणीमधील र्उ, नैर्ऋत्यमधला र्ऋ, वगैरे वगैरे. देवनागरी फाँट्स बनवणार्‍याला मराठी लिपी माहीत नसते हे त्याचे मुख्य कारण

ब्राउझर बदलला की अक्षराचे दिसणे बदलते हा दैवदुर्विलास आहे. .... (चर्चा) १२:३५, ७ फेब्रुवारी २०१६ (IST).Reply

@: प्रतिसादाबद्दल धन्यवाद. खरय. मराठीसाठी देवनगरी फाँट्समध्ये आणि ब्राउजर्समध्ये बदलाची आवश्यकता आहे.


@प्रथमेश ताम्हाणे: सदस्य:ज यांची भाषा विषयक माहिती आणि योगदान वाखाणण्यासारखे आहे अर्थात त्याच वेळी तांत्रिक गोष्टींचे आकलन कठीण असू शकते. या संबंधाने आपल्या शंकांची नोंद विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न या मध्यवर्ती ठिकाणी करुन ठेवणे बरे पडू शकेल. मागे सदस्य:संतोष दहिवळ यांनी तांत्रिक बाबी तपासण्यासाठी थोडीशी मेहनत केलेली आहे आपण आपल्या शंकांसाठी त्यांनाही संपर्क करू शकाल. मी मराठी भाषिकांमध्ये प्रमाणिकरणाच्या दृष्टीने व्यापक सहमती साधता यावी म्हणून मराठी संकेतस्थळांवर र्‍य आणि ऱ्य पैकी अधीक बरोबर कोणता ? आणि का ? आणि अ‍ॅ अक्षराच्या लेखन वाचनातील समस्या आणि प्रमाणीकरण अशी चर्चा मागे केली आहे. अर्थात हा विषय मराठी भाषिकांनी अद्याप पुरेसा गांभीर्याने घेतला म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. :(
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:३२, ८ फेब्रुवारी २०१६

(IST)


माहितगार यांचे र्‍य आणि ऱ्य पैकी अधिक बरोबर कोणता ? आणि का ? या विषयावरील मिसळपाववरील मजकूर वाचला. त्यावरून एक लक्षात आले की तीच ती अक्षरे प्रत्येकाच्या संगणकावर एकसमान दिसत नाहीत.

देवनागरी लिपीतल्या एखाद्या व्यंजनात ’ह’ मिसळला की ह-कारयुक्त व्यंजन तयार होते, ते जोडाक्षर असतेच असे नाही. उदा० ’क’मध्ये ’ह’ मिसळला की ’ख’ होतो, पण ’ख’ला जोडाक्षर समजत नाहीत. ज्या शब्दातल्या अक्षराचा उच्चार करताना आधीच्या अक्षरावर जोर येतो, तेच जोडाक्षर समजावे, असे काही व्याकरणकारांचे मत आहे. ’प्रखर’ हा शब्द उच्चारताना ’प्र’वर आघात होत नाही, त्यामुळे त्या शब्दातले ’ख’ हे अक्षर जोडाक्षर नाही. ’चक्र’ शब्द उच्चारताना ’च’वर आघात होतो, म्हणूनच क्र हे जोडाक्षर आहे. याच नियमाने खछठथफ आणि घझढधभ ही जोडाक्षरे नाहीत.

भारतीय भाषांपैकी बहुधा फक्त मराठीमध्ये, जोडाक्षरासारखी वाटणारी पण पूर्ण अर्थाने जोडाक्षरे नसणारी काही अक्षरे आहेत. एखाद्या व्यंजनाला य किंवा ह जोडला की ती अक्षरे बनतात. तुक्यातला क्य, जग्यातला ग्य, वाघ्यातला घ्य, गंप्यातला प्य वगैरे. तुक्या, जग्या, वाघ्या, सोप्या असले शब्द उच्चारताना अनुक्रमे तु, ज, वा, किंवा सो वर आघात होत नाहीत म्हणून या शब्दांतली ’य’ची जोडाक्षरे पूर्ण अर्थाने जोडाक्षरे नाहीत. त्याच कारणाने र्‍य (यकारयुक्त र), म्ह (हकारयुक्त म), न्ह (हकारयुक्त न), र्‍ह (हकारयुक्त र) ही जोडाक्षरे नाहीत. गनिमी काव्यातला व्या जोडाक्षर नाही पण शाहिरी काव्यातला व्या जोडाक्षर आहे. ब्राम्हणातला किंवा गाईम्हशीतला म्ह जोडाक्षर नाही, परंतु ब्राह्मणातला ह्म जोडाक्षर आहे. वाल्या कोळीतला ल्या जोडाक्षर नाही पण कल्याणमधला ल्या हे जोडाक्षर आहे. मराठी राजहंसमधले स जोडाक्षर नाही, पण हिंदी राजहंसमधला स हे जोडाक्षर आहे.

मराठीतली बहुतेक य-कारयुक्त आणि ह-कारयुक्त व्यंजने संगणकावर टाईप करता येतात, पण यकार किंवा हकारयुक्त र ही दोन अक्षरे योग्यप्रकारे टाईप करता येतीलच असे नाही; आणि टाईप केली तरी ती वाचणार्‍याला तशीच दिसतील असे नाही. या कारणासाठी मराठी लेखनासाठी प्रमाण ब्राउझर आणि प्रमाण टंक यांची गरज आहे. आज बाजारात असलेले ब्राउझर आणि टंक आदर्श नाहीत. .... (चर्चा) १५:१०, ९ फेब्रुवारी २०१६ (IST)Reply

र्‍य आणि ऱ्य संपादन

र्‍य मला टाईप करता येतो, आणि तो मला ’चंद्रकोरीशेजारी य’ असा दिसतो. ऱ्य (हा मला टाईप करता आलेला नाही, तो मी येथे नकल-डकव करून उमटवला आहे) मला ’नुक्तावाला पायमोडका र आणि शेजारी य‘ असा दिसतो. विकिपीडियावर जिथेजिथे मला ऱ्य (’नुक्तावाला पायमोडका र आणि शेजारी य‘) असा दिसला तिथेतिथे मी तो माझ्या मते र्‍य (’चंद्रकोरीशेजारी य) असा केला. आता मी दुरुस्त केलेला rya जर माझ्याखेरीज इतरांना विचित्र दिसत असेल, तर ही गंभीर गोष्ट आहे. नुक्तावाला पायमोडका र असलेला rya माझ्याच्याने पाहवत नाही, आणि मी तो बदलून टाईप केलेला मला दिसणारा र्‍य (’चंद्रकोरीशेजारी य) इतरांना भलताच दिसतो, हे आपण लक्षात आणून दिल्यापासून माझा संपादन करण्यातला रसच निघून गेला आहे.

विकिपीडियावर मी जसे टाईप करीन तसेच ते इतरांना दिसावे आणि ते जसे टाईप करतील तसेच ते मला दिसावे याकरिता तज्ज्ञांनी उपाय सुचवायला हवेत. नाहीतर विकीवर लिहिणार्‍याला आणि विकीवर वाचणार्‍याला विशिष्ट ब्राऊझर आणि विशिष्ट फाँट वापरायची सक्ती करावी लागेल.

जाताजाता एक - तुम्ही कोणता ब्राऊझर आणि कोणता फाँट वापरता? .... (चर्चा) १७:३८, १० फेब्रुवारी २०१६ (IST)Reply

 
र्‍य आणि ऱ्य मधील फरक दर्शवण्यासाठी काढलेला स्क्रिनशॉट
@:तुम्ही टाईप केलेला र्‍य तुम्हाला ’चंद्रकोरीशेजारी य’ असा दिसत असला तरी मला तो तसा दिसत नाही आणि मी टाईप केलेला ऱ्य तुम्हाला ’चंद्रकोरीशेजारी य’ सारखा दिसत नाही. मला तुमचा वरचा प्रतिसाद कसा दिसतो याचा स्क्रिनशॉट मी इथे टाकत आहे. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल.
मी मराठी टायपिंगसाठी विकिपीडियाचा अक्षरांतरण किंवा गूगल इनपुट टूल्स वापरतो. विकिपीडियातील 'स्रोत संपादित करा' वर क्लिक केल्यावर जी संपादन चौकट उघडते, त्यामध्ये उजव्या बाजूला छोटेसे कीबोर्ड सारखे बटन दिसते त्यावर क्लिक केल्यावर मराठी फाँट्ससाठी "अक्षरांतरण, फोनेटिक, मराठी इनस्क्रिप्ट २" असे विविध पर्याय दिसतात. त्यातला अक्षतरांतरण हा पर्याय वापरून मी नेहमी त्या चौकटितच संपादन करतो. हा फाँट कसा वापरावा यासाठी या संकेतस्थळाला भेट द्या: अक्षरांतरण मदत
मी गूगल क्रोम ब्राऊजर (नवीनतम आवृत्तीचा) वापरतो व बऱ्याचदा लिनक्स उबुंटू १४.०४ ऑपरेटिंग सिस्टिम वापरतो. पण एक गोष्ट आहे, की तुम्ही टाईप केलेला र्‍य आणि मी टाईप केलेला ऱ्य दोनही मला माझ्याकडच्या विंडोज ८ ऑपरेटिंग सिस्टिममधील गूगल क्रोम ब्राऊजरमध्ये ’चंद्रकोरीशेजारी य’ सारखे दिसतात. त्यामुळे एखादा ब्राउजर तुम्ही कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये वापरता त्यानुसार वेगवेगळी अक्षरे उमटवू शकतो.
विकिपीडियावर मी जसे टाईप करीन तसेच ते इतरांना दिसावे आणि ते जसे टाईप करतील तसेच ते मला दिसावे याकरिता तज्ज्ञांनी उपाय सुचवायला हवेत - या मताशी मी सहमत आहे. विकीवर लिहिणार्‍याला आणि विकीवर वाचणार्‍याला विशिष्ट ब्राऊझर आणि विशिष्ट फाँट वापरायची सक्ती करावी लागेल याने हा प्रश्न सोडवता आला तरी हा पर्याय योग्य नाही. प्रत्येकाची अपापली आवड असते. कोणावरही ब्राऊजरची किंवा त्याच्या विशिष्ट आवृत्तीची सक्ती असू नये. विकीचा अधिकाधिक लोकांनी वापर करावा व या प्रकल्पात सहभागी व्हावे असे वाटत असेल तर एखाद्या विशिष्ट ब्राऊजरची सक्ती करणे योग्य नाही. या प्रश्नासाठी अतिशय व्यापक स्तरावर प्रयत्न करावे लागतील. ब्राउजर डेव्हलपर्स, फाँंट डेव्हलपर्स आणि ऑपरेटिंग सिस्टिम डेव्हलपर्समध्ये समन्वय साधावा लागेल असे मला वाटते.
बाकी या गोष्टीमुळे कृपया तुम्ही तुमचे संपादन थांबवू नका. आपण विकिपीडियावर मोलाचे योगदान देत आहात. ते असेच चालू राहूद्या अशी विनंती :)
--प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) २१:०४, १० फेब्रुवारी २०१६ (IST)Reply

---

स्क्रीनशॉट : र्‍य विरुद्ध ऱ्य संपादन

तुम्ही पानावर टाकलेला स्क्रीनशॉट पाहिला. हसावे की रडावे हे कळत नाही. जिथेजिथे चंद्रकोरी र यायला पाहिजे, तिथेतिथ पायमोडका नुक्तावाला र आला आहे. म्हणजे मी टाईप केलेली अक्षरे मला जशी दिसतात्त त्याच्याबरोब्बर विरुद्ध तुम्हाला दिसतात.

संपादन मी थांबवत नाही पण ऱ्य दुरुस्त करणे थांबवत आहे.

अॅ (अ वर चंद्र) चे असेच काहीतरी करायला पाहिजे. मी उमटवलेल्या प्रत्येक अॅ (अ वर चंद्र) च्या जागी निनावी नावाचे एक रो(बॉट) चिनी चित्रलिपीत शोभेल असे (ॲ) हे अक्षर टाकतात. म्हणजे ते अक्षर त्यांना अॅ (अ वर चंद्र) दिसत असावे. .... (चर्चा) २१:५१, १० फेब्रुवारी २०१६ (IST)Reply


लोहित देवनागरी हा उत्तम फॉन्ट आहे; मीही वापरला आहे. पण या फॉन्ट्समध्यॆ ZWNJची सोय मला सापडली नाही, त्यामुळे स्पोर्ट्‌स, हर्ट्‌झ हे शब्द, र्टचा पाय मोडून टंकणे मला जमलेले नाही. ... (चर्चा) ०९:२१, १३ मार्च २०१६ (IST)Reply

@: होय ती एक त्रुटी या फॉन्टमध्ये आहे. ZWNJ म्हणजे काय? तुमच्या वरच्या प्रतिसादातल्या 'फॉन्ट्समध्यॆ' शब्दातल्या ध्ये चा मात्रा ४५ अंशांनी उजवीकडे फिरवलेल्या ∽ या चिन्हासारखा दिसत आहे, पण इतर मात्रे ठीक दिसत आहेत. प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) ११:५१, १३ मार्च २०१६ (IST)Reply

ध्ये ची मात्रा आता बरोबर दिसावी, ती देताना मी यापूर्वी शिफ्ट की दाबली नव्हती. ZWNJ म्हणजे Zero Width Non Joint, दोन अक्षरे एकमेकांना चिकटून लिहायची (झीरो विड्थ) पण एकमेकांना जोडायची नाहीत (नॉन जॉईंट). ... (चर्चा) १५:००, १३ मार्च २०१६ (IST)Reply

@: वरील माहितीसाठी धन्यवाद. ZWNJ कॅरॅक्टर टाईप करताना उदा. हर्ट्झ हा शब्द, रफार झ वरती येतो. आधी मला पण तो शब्द हर्ट्‌झ असा टाइप करता येत नव्ह्ता. मी यापूर्वी तुम्ही टाइप केलेला शब्द कॉपी पेस्ट करायचो. आता इंटरनेटवर ZWNJ शोधल्यावर सापडले, की विकिपीडियामध्ये अशाप्रकारच्या जोडाक्षरांमधील अक्षरे वेगळी दिसण्यासाठी त्या दोन अक्षरांमध्ये ‌ असे लिहिल्यास ती वेगळी दिसतात. उदा. हर्ट्झ शब्द हर्ट्‌झ असा टाइप केल्यास तो हर्ट्‌झ असा योग्य दिसतो. फक्त याच साठी नाही इतरही अनेक जोडशब्द बरोबर उमटण्यासाठी हे उपयुक्त आहे. इतर ठिकाणी हे काम करत की नाही माहित नाही. प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) १६:०८, १३ मार्च २०१६ (IST)Reply

ही युक्ती मलाही माहीत नव्हती. ही युक्ती वापरून मी Bernigham (बर्मिंग्‌हॅम) हा शब्द लिहून पहात आहे. .जमले नाही 'code' पण टाईप करायला पाहिजे? हे खूप त्रासाचे काम आहे.

B.A. LL.B - मराठीत बी.ए.एल्‌एल.बी. .छे! जमत नाही. (चर्चा) १९:१९, १३ मार्च २०१६ (IST)Reply

@: तुम्ही चुकीचे टाइप करत आहात. &amp हे लिहू नका. या प्रतिसादाच्या स्रोतात जाऊन पुढील शब्द कसे टाइप केले आहेत ते पहा: बी.ए.एल्‌एल.बी. , बर्मिंग्‌हॅम , हर्ट्‌झ
प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) २०:११, १३ मार्च २०१६ (IST)Reply

समजले. आणखी एक मार्ग : manogat.comला जा. मनोगतचे पान उघडल्यावर सदस्य नावाच्या जागी hart.h.sjh या कळी दाबून टाईप करा. . (.h = पाय मोडा; .s = जोडू नका; jh = झ). हर्ट्‌झ उमटेल. टाईप झालेला शब्द सिलेक्ट करा, एडिटला जाऊन कॉपी/कटचा पर्याय निवडा आणि विकीच्या पानावर जाऊन हवे तिथे पेस्ट करा. .... (चर्चा) २०:५०, १३ मार्च २०१६ (IST)Reply

विकिपीडिया,परिसरातील वास्तव व सजग नागरिक संपादन

आपल्या पानावर माधव गाडगीळ यांच्या लेखाचा संदर्भ पहिला. विकिपीडियाचा उपयोग परिसरातील पर्यावरण विषयक वास्तव मांडण्यासाठी आम्ही (मी व माधव गाडगीळ) सुरु केला आहे. विविध ठिकाणाचे सजग नागरिक यात सहभागी होत आहेत. आपल्याला या प्रकल्पात रस असल्यास जरूर सहभागी व्हावे, तांत्रिक मदतही हवी आहे. संपर्क - subodhkiran@gmail.com,madhav.gadgil@gmail.com

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:३०, १ एप्रिल २०१६ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: मला यात रस आहे. माधव गाडगीळांनी काही महिन्यांपूर्वी आयुकामध्ये एका लेक्चरमध्ये देखील याचा उल्लेख केला होता. मला या प्रकल्पाबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही काही लेख बनवले असतील तर त्याची लिंक इथे द्याल का? आणि कशाप्रकारची तांत्रिक मदत हवी आहे? माझा संपर्क: prathameshdt@gmail.com -- प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) १६:२७, १ एप्रिल २०१६ (IST)Reply

@प्रथमेश - आपले स्वागत आहे, मी आपणास स्वतंत्र मेल करून लेखांच्या लिंक्स देत आहे. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:४९, १ एप्रिल २०१६ (IST)Reply

संरक्षित क्षेत्रे साचा संपादन

अभयारण्ये व इतर संरक्षित क्षेत्रांच्या लेखांमध्ये वापरला गेलेला साचा सदोष आहे असे वाटते. उदा. एकूण क्षेत्रफळ, नकाशा बऱ्याच ठिकाणी दिसत नाही. हा लेख पहा -

या लिंकवर हे साचे आहेत. पण ते कसे वापरायचे? आपण मदत करू शकाल काय?

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:१५, २९ जून २०१६ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: संरक्षित क्षेत्राच्या माहितीचौकट साच्यामध्ये बदल केला आहे. आधीच्या साच्यामध्ये फक्त क्षेत्रफळामध्ये बदल करावा लागला. नकाशाचा साचा बरोबर आहे. कोयना अभयारण्याच्या पानामध्ये त्या अभयारण्याचे गुणक दिले नसल्याने साचा काम करत नव्हता. आता काम करतोय. मी त्याच्या इंग्रजी विकिपीडियाच्या पानावरून गुणक आणि क्षेत्रफळ घेऊन या पानावर टाकल्यावर आता ते ठीक दिसतय. हा साचा वापरण्यासाठी सध्या ज्या पानावर हा साचा वापरला आहे त्या पानावरून कॉपी पेस्ट करून योग्य तो बदल करून वापरा. त्याचे डॉक्युमेंटेशन चांगल्या पद्धतीने बनवायची गरज आहे. जसा वेळ मिळेल तसे बनवेन. फक्त Latitude आणि longitude च्या किंमती टाकताना इंग्रजी अंकांमध्ये टाकाव्यात आणि पॅरामीटर्सची नावे आहेत तीच ठेवावीत. -- प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) १७:४५, २९ जून २०१६ (IST)Reply

किल्ला साचा संपादन

तोरणा या किल्ल्यावरील चौकटीत नकाशा कसा आणायचा?

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:४०, २९ जून २०१६ (IST)Reply

या साच्यामध्ये नकाशा टाकणे जरा अवघड वाटतय. मी श्यक्यतो इंग्रजी विकिपीडियावरचे साचे इकडे आयात करतो आणि गरजेनुसार पॅरामीटर्सच्या नावांचे मराठीत भाषांतर करतो. हा साचा कुणितरी स्वत: बनवलाय असं वाटतय. नकाशासाठी साच्यात बदल करायचा प्रयत्न करून बघेन. जमलं तर तुम्हाला सांगेन. -- प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) १८:०४, २९ जून २०१६ (IST)Reply

मराठीत बरेच साचे नीट, काळजीपूर्वक बनवायला हवेत. आपण मनावर घ्यावे...
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:०७, २९ जून २०१६ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: किल्ल्याच्या साच्यामध्ये नकाशा घालण्याची सोय केली आहे आणि काही किल्ल्यांच्या लेखामध्ये नकाशे घातले आहेत. बऱ्याच किल्ल्यांच्या लेखांमध्ये सुधारणांची आणि विकिपीडियाच्या शैलीत लिहिण्याची आवश्यकता आहे. प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) ००:५२, २ जुलै २०१६ (IST)Reply

Left Aligned Infobox संपादन

Left Aligned Infoboxचा एखादा नमूना करुन बघता येईल का?

अभय नातू (चर्चा) ०३:५६, २३ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply

@अभय नातू: Infobox टेम्प्लेट वापरलेल्या साच्यांमध्ये सुरुवातीला labelstyle = text-align: left; अशी ओळ घातली की लेबल्स left aligned होत आहेत. पण त्यांची रुंदी बदलता येत नाही. मी त्याच ओळीमध्ये पुढे width: xxem; लिहिलं, पण ते काम करत नाही. तेसुद्धा जमलं, तर बरेचसे साचे जास्त आकर्षक दिसतील.

--प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) २३:२८, २३ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply

अभिनंदन संपादन

 
आपण या मराठी विकिवरील लेखात व विशेषतः साचेविषयक लेखात जी मोलाची भर घालीत आहात त्याबद्दल आपणांस हा साचेविषयक बार्नस्टार देण्यात येत आहे. तो आपण आपल्या सदस्यपानावर लावू शकता. कृपया त्याचा स्वीकार करावा ही विनंती. आपण येथे १५०० संपादनांच्या जवळपास आहात (नेमके म्हणजे १४६९) व लवकरच हा आकडा पार कराल अशी मला खात्री आहे. आपले हार्दिक अभिनंदन.वि. नरसीकर (चर्चा) १२:००, २४ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply

धन्यवाद. --प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) २३:१३, २४ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply

Content Translation संपादन

Hi,

Some time ago you asked about not being able to publish an article using Content Translation.

That problem should be fixed now. Sorry it took so long. Can you please try this again? --अमीर ए. अहरोनि (चर्चा) १३:५८, ४ नोव्हेंबर २०१६ (IST)Reply

पॅन संपादन

पॅन नंबरचे विस्तृत रुप केले तर ते 'परमनंट अकाउंट नंबर नंबर' असे होईल सबब आपण केलेले पुनर्निर्देशन मी वगळत आहे. कृपया गैरसमज करु नये.

--वि. नरसीकर (चर्चा) १८:४६, १८ नोव्हेंबर २०१६ (IST)Reply

आपली संपादने संपादन

आता आपण छान गती पकडली आहे व आपणास योग्य ती पकड आली आहे.आपली १६३३ संपादने एकूण झालीत.पुढील लेखनास शुभेच्छा. आपण या विकित अशीच भर घालत रहाल अशी आशा व अपेक्षा. लगे रहो! --वि. नरसीकर (चर्चा) ११:३९, १९ डिसेंबर २०१६ (IST)Reply


  • Elevation=उन्नतन
  • कमाल उंची
  • किमान उंची

असे शब्द आपण बहुदा वापरतो. रुचल्यास वापरावेत.--वि. नरसीकर (चर्चा) १७:३३, १२ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

@V.narsikar: वरील बदल केलेत. फक्त उन्नतन हा बदल नाही केला. मी Elevation साठी उन्नतन हा शब्द वापरलेला पाहिलेले नाही. एकतर समुद्रसपाटीपासून उंची किंवा फक्त उंची असा वापर पाहिला आहे. त्यामुळे उंची तसेच ठेवत आहे.प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) २३:०४, १२ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

विभाग Location map संपादन

या पानाची सुरक्षा पातळी आता बदलली आहे. आपणांस हवे ते बदल यात करु शकता. अगदी मी केलेली संपादनेही उलटवण्यास हरकत नाही. यासमवेतच विभाग:Geobox coor हेही तपासावे ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १५:१६, १७ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

आपल्या विनंतीनुसार मी विभाग:Location map येथे केलेले सर्व बदल उलटविले आहेत. माहितीस्तव.हे बदल उलटविल्याने आपले ईप्सित साध्य झाले काय? ते कृपया बघावे व कळवावे ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १५:१४, १८ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply
@V.narsikar:विभाग:Location map पूर्ववत केल्यावर देखील relief नकाशे दिसत नव्हते. म्हणुन मी इंग्रजी विकिवरून विभाग आयात केला. तरीही दिसत नाही. त्यामुळे नक्की कशात प्रॉब्लेम आहे काही कळत नाही. विभाग:Geobox coor तपासला. तो व्यवस्थित आहे.--प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) १४:५३, १९ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply


विभाग:Location map याची उपपानेही (विभाग:Location map/ )तपासून बघावीत. आता आपण हे काम सुरु केले आहे ते तडीस न्यावे अथवा हवी तर, यात सदस्य:Abhijitsathe यांचीही मदत घेऊ शकता.--वि. नरसीकर (चर्चा) १५:०१, १९ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply
@V.narsikar:@Abhijitsathe: मी विभाग:Location map याची उपपाने तपासून अद्ययावत केली आहेत. एक प्रश्न आहे. मी साचा:Coord हा साचा:माहितीचौकट संरक्षित क्षेत्र मध्ये वापरला आहे. त्यामध्ये गुणक देताना पूर्वी display या पॅरामीटरची डिफॉल्ट किंमत inline होती. ती आता inline,title अशी झाली आहे असं वाटतय. त्यामुळे गुणक देताना |display= inline असं लिहावं लागतय. नाहीतर गुणक एकापुढे एक दोन वेळा दिसतात. ते कसं बदलायचं ते मला माहीत नाही. उदाहरणार्थ हा लेख पहा: थट्टेकड पक्षी अभयारण्य.
थट्टेकड पक्षी अभयारण्य हा लेख आता बघावा. साचा:Coord यात आपण केलेल्या बदलांमुळे असे घडले.ते बदल मी उलटविले आहेत. आता तो लेख बरोबर दिसतो.विभाग:Location mapविभाग:Coordinates यात ताळमेळ करावयाचा तर, त्यावर आधारीत सर्व साचे समर्पकपणे बदलवायला हवेत. नुसते एककल्ली बदल करुन चालणार नाहीत. धन्यवाद.--वि. नरसीकर (चर्चा) १६:५१, १९ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

मराठी भाषा गौरव दिन संपादन

वि. नरसीकर (चर्चा) १७:२०, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

नक्षत्र संपादन

नक्षत्र हा आपल्या आवडीचा विषय असेल तर कदाचित आपल्याला या दुव्यावरील चर्चेत सहभागई होणे आवडल्यास पहावे.


धन्यवाद आणि शुभेच्छा


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:१६, २६ मार्च २०१७ (IST)Reply


@Mahitgar: दुवा पाहिला. चर्चा छान आहे. पण मला मुळातच नक्षत्र आणि त्यांची पारंपारिक नावं यांबद्दल कमी माहिती आहे. चर्चेतल्या कमेंट्सवरून नवी माहिती मिळाली. चर्चा निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. काही नवीन माहिती मिळाती तर चर्चेत सहभागी होईन. --प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) १६:५३, २६ मार्च २०१७ (IST)Reply

गुढीपाडवाचे शुभेच्छा! संपादन

गुढीपाडवाचे शुभेच्छा!

टायवीन२२४०माझ्याशी बोला तुम्हाला गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे..!! 💐💐💐💐💐💐💐💐

 
{{subst:गुढीपाडवा शुभेच्छा}} असे ज्या सदस्यास संदेश द्यावयाचा आहे, त्या सदस्याच्या चर्चापानावर जोडून हा शुभेच्छा संदेश त्यांचेपर्यंत पोचवा.

ग्लोबल विपश्यना पॅगोडा संपादन

ग्लोबल विपश्यना पॅगोडा या लेखासाठी कोणता विशिष्टसाचा असेल तर कृपया उपलब्ध करून द्या. GLOBAL PAGODA ऐवजी तुम्ही मराठीतून त्यासंबंधी लिहा, जसे - मुंबई, महाराष्ट्रातील पॅगोडा असे. संदेश हिवाळे (चर्चा) ०२:०९, ३० मार्च २०१७ (IST) संदेश हिवाळे (चर्चा) ०२:०९, ३० मार्च २०१७ (IST)Reply

हॅपी बिर्थडे मराठी विकिपीडिया संपादन

 --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:०६, १ मे २०१७ (IST)Reply

मार्च २०१७ बाबत शुभेच्छा संपादन

 
नमस्कार प्रथमेश ताम्हाणे,

विकिपीडियाने मार्च २०१७ च्या आकडे प्रकाशन केले आहे. त्यातील सर्वाधिक सक्रिय विकिपीडिया मराठी विकिपीडियामध्ये जगभरातील १७ व्या क्रमांकावर आहे.

या आकडेवारीत आपण मराठी विकिपीडियाचे तेरावे सर्वात सक्रिय विकिपीडियाचे सदस्य आहात.पूर्ण यादी इथे पहा

आम्ही मराठी विकिपीडियावर केलेल्या आपल्या प्रयत्नांचे अभिनंदन करतो आणि भविष्यात आणखी पुढे चालू ठेवण्यासाठी उत्सुकता दाखवतो.

 


आपल्या योगदानाबद्दल धान्यवाद.


आपला शुभचिंतक,

टायवीन

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:५७, ३ मे २०१७ (IST)Reply

सदस्य:श्यामल संपादन

प्रथमेश,

इंग्लिश विकिपीडियावरील सदस्य श्यामल हे तेथील अनेक पक्षीविषयक लेखांत व प्रकल्पांत सहभागी असतात. तुमचे पक्षीविषयक योगदान पाहून मला तुमचा त्यांच्याशी परिचय करुन द्यावासा वाटतो आहे. तरी त्यांना उद्देशून येथे लिहित आहे. आशा आहे की तुमच्या परिचयातून मराठी विकिपीडियावर पक्षीविषयक माहितीत भर पडेल :-)

@Shyamal:,

Prathamesh is one of very active users on Marathi Wikipedia and has a keen intereste in birds. I would like to introduce you guys to each other in the hopes that it will of mutual benefit and also of benefit to w:mr and w:en!

Cheers,

अभय नातू (चर्चा) ०५:५७, २ जून २०१७ (IST)Reply

Hi Prathamesh, do join us on http://en.wikipedia.org/wiki/WP:BIRD or http://en.wikipedia.org/wiki/WT:BIRD Thanks Abhay! Shyamal (चर्चा) ०८:१६, २ जून २०१७ (IST)Reply
Thanks @अभय नातू: and @Shyamal:. I will definitely check it out. प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) ०९:१९, २ जून २०१७ (IST)Reply

मराठी विकिपीडिया व्हॉट्सॲप ग्रुप संपादन

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:०४, ५ जून २०१७ (IST)Reply

[Wikimedia Foundation elections 2021] Candidates meet with South Asia + ESEAP communities संपादन

Hello,

As you may already know, the 2021 Wikimedia Foundation Board of Trustees elections are from 4 August 2021 to 17 August 2021. Members of the Wikimedia community have the opportunity to elect four candidates to a three-year term. After a three-week-long Call for Candidates, there are 20 candidates for the 2021 election.

An event for community members to know and interact with the candidates is being organized. During the event, the candidates will briefly introduce themselves and then answer questions from community members. The event details are as follows:

  • Bangladesh: 4:30 pm to 7:00 pm
  • India & Sri Lanka: 4:00 pm to 6:30 pm
  • Nepal: 4:15 pm to 6:45 pm
  • Pakistan & Maldives: 3:30 pm to 6:00 pm
  • Live interpretation is being provided in Hindi.
  • Please register using this form

For more details, please visit the event page at Wikimedia Foundation elections/2021/Meetings/South Asia + ESEAP.

Hope that you are able to join us, KCVelaga (WMF), १२:०४, २३ जुलै २०२१ (IST)Reply

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा संपादन

नमस्कार प्रथमेश ताम्हाणे,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)Reply

विकिपीडिया आशियाई महिना २०२२ संपादन

 

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊ शकता तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे, Tiven2240 किंवा संतोष गोरे यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२२

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या संतोष गोरे किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.