चर्चा:गोव्यातील गणेशोत्सव


नमस्कार,

इथे लिहिणारी सर्वच संपादक लेखक मंडळी कधीन कधी नवीन होती, इथे प्रत्येकानेच इतर सदस्यांकडून माहिती घेत घेतच वाट काढली आहे.कृपया,कुठेही येथील नियमांची धास्ती वाटून न घेता नि:संकोच पणे संपादन, लेखन, वाचन करत रहावे.

मराठी विकिपीडियातील स्वागत आणि साहाय्य चमू आपणास सहाय्य करण्यास सदैव तत्पर आहे येथे खाली लिहिलेले सहाय्य कितपत उपयूक्त वाटले आणि शंका निरसन पूर्ण झाले नसल्यास किंवा असहमत असल्यासही, अशाच मोकळे पणाने पुन्हा लिहिल्यास आम्हाला फकत आपल्यालाच नाही, तर सर्वांना पोहोचवायचे सहाय्य अधीक चांगल्या दर्जाचे करता येईल.

मराठी विकिपीडिया एक विश्वकोश असल्यामुळे मजकूर विश्वकोशास साजेशा स्वरूपात बसवावा लागतो, म्हणजे काय ते आपण खाली पुढे पाहू परंतु आपल्या लेखना बद्दल दिलेले कोणतेही संदेश केवळ पुर्नलेखनाची विनंती असतात. असे पुर्नलेखन तुम्ही स्वतःच पूर्ण केले पाहिजे असेही नाही,इतर मंडळीनी करिता ते तसेच सोडण्यासही तुम्ही मुक्त असता . त्यामुळे आपण आपले इतर लेखन किंवा वाचन चालू ठेऊन खालील सहाय्यपर लेखन सुद्धा आपल्या सवडीने जरूर तेवढेच वाचू शकता.

आपण लेखन केलेल्या लेखानापुढे शीर्षकलेखन संकेत, पुर्नलेखन,विकिकरण,संदर्भ द्या,व्यक्तिगत मते,शुद्धलेखन,पक्षपात,पूर्वग्रह अशा अर्थाचे काही संदेश, लिहिणार्‍या संपादकास घाबरवण्याकरिता नव्हे तर आपल्या सारख्या नवागत सदस्यांच्या लेखनाकडे नियमीत जाणत्या सदस्यांचे लक्ष जावे आणि विकिपीडियाच्या स्वरूपास अनुकूल विकिकरण (बदल) करण्यास आपल्याला सहाय्य आणि सहयोग उपलब्ध व्हावा असे असते आणि कालौघात लेखात दर्जात्मक सुधारणा व्हावी असा उद्देश असतो.

त्या शिवाय असा संदेश कुणी लावला आहे ते लेखाच्या इतिहासात पाहून संबंधीत सहसंपादकाच्या चर्चा पानावर लेखाच्या चर्चा पानावर ,चावडी मदत केंद्र इत्यादी ठिकाणी आपण आपले शंका निरसन करून घेऊ शकता. असे संदेश लावण्यात आपल्यालाही पुढाकार घावयाचा असेल तर विकिपीडियाचा दर्जा सांभाळण्याच्या अमूल्य कार्यात विकिपीडिया:पहारा आणि गस्त ,विकिकरण आणि इतर विवीध समन्वय प्रकल्पात आपण स्वतः सुद्धा सहभागी होऊ शकता.

मराठी विकिपीडिया केवळ एक विश्वकोश आहे.संबधीत माहिती संबधीत प्रकरणात (लेखात) लिहिणे अपेक्षीत असते.

विश्वकोशांना स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो, जो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजक) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो.

(इथे वाचकांना रूक्षता अपेक्षीत नसते पण निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते, वाचकाचा दृष्टीकोण आम्ही मोजक्या Facts आणि statistics वाचतो आम्हाला इतरांची परस्पर विरोधी मते विशीष्ट संदर्भा सहीत सांगा पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका, असा असतो.)


सारे विश्वकोश विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता सहसा वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात.त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षीत असते.

ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग स्वरूपातील लेखन आपल्या आवडीचा किवा सवयीचा भाग असेलतर, विकिपीडियात लिहिण्याच्या दृष्टिने, आपण आधी मराठी विकिपीडियात आधी पासून असलेल्या एखाद दुसर्‍या लेखांमध्ये भर घालून पाहू शकता, मुखपृष्ठ सदर म्हणून मागे निवडले गेलेले लेख अभासू शकता अथवा धूळपाटी येथे कच्चे लेखन करून इतर संपादकांचे सहाय्य घेऊन बरोबर करून घेऊ शकता .

आपल्याला इतर नवागत सदस्य काय चूका करत असत्तात ते नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रूटी लेखात जाणून घेता येईल.आणि विकिपीडियाच्या इतर मर्यादांची माहिती विकिपीडिया:विकिपीडियाच्या मर्यादा या लेखात घेता येईल.

माहीतगार १०:४०, ४ सप्टेंबर २००९ (UTC)

असे केले तर? संपादन

गोवा.भारतातील एक छोटसं राज्य.(हे वाक्य गोवा राज्य]] या लेखात टाकावयास हव.)

छोटसं असलं तरी इथली संस्कृतीचं वेगळेपण चटकन जाणवतं. टुमदार कौलारु घरं, हिरवीगार वनराई, लाल माती, रम्य समुद्रकिनारे, भव्य मन्दिरं, चर्च आणी पोर्तुगीज शब्दांचा प्रभाव असलेली कोकणी भाषा.(हे वाक्य गोवा राज्य या लेखात टाकावयास हव. खर असलं तरी, हे तुमच व्यक्तिगत मत आहे बरोबर ना? तर त्या ऐवजी गोवा राज्य लेखात अशाच प्रकारची इतर कुणाची विकिपीडिया सोडून इतरत्र प्रकाशित मत संदर्भा सहीत लिहू शकता. आणि असे संदर्भ पुस्तकात किंवा गूगल वर शोधले तर असंख्य मिळतील)

अश्या ह्या(अविश्वकोशिय! हे टाळल तर चालेल ?)

गोव्याचा मुख्य सण म्हणजे गणेशचतुर्थी (कोकणी भाषेत 'चवथ'सांगायच झालं तर(अविश्वकोशिय! हे टाळल तर चालेल ?) ).

बरयाच लोकांना प्रश्न पडेल (गोव्याचे लोक सोडून बर का!) की गोव्यात आणी मुख्य सण गणेशचतुर्थी? काहीतरी काय?अहो (अविश्वकोशिय! हे टाळल तर चालेल ?) नाताळ, कार्निवलविषयी, न्यु ईयर (?) बद्दल बोला!

अस लिहिल तर: गोव्यातील सोडून इतर राज्यातील लोकांचा नाताळ, कार्निवलविषयी, न्यु ईयर वगैरे गोव्याचे मुख्य सण आहेत पण मुख्य सण गणेशचतुर्थी हाच आहे ( इथे उपलब्ध संदर्भ आणि उपलब्ध असल्यास आकडेवारी अपेक्षीत आहे.)

पण साडेचारशे वर्ष पोर्तुगीज राजवटीत राहूनसुद्धा इथले लोक आपली संस्कृती विसरले नाहित. आणी मुख्य म्हणजे दसरा दिवाळिपेक्षासुद्धा इथे गणेशचतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.( इथे संदर्भ अपेक्षीत आहे.)

गोव्याच्या लोकांना मासे (कोकणीत 'नुस्ते') म्हणजे जीव की प्राण. (तसे गोव्यातील सगळेच लोक मासे खातात हा आणखी एक गैरसमज.( इथे संदर्भ अपेक्षीत आहे.) पण गोव्यातसुद्धा बरेच लोक शुद्ध शाकाहारी आहेत. असो!).(अविश्वकोशिय! हे टाळल तर चालेल ?)

पण श्रावण महिना ते गणेशचतुर्थी होईपर्यंत इथले लोक शुद्ध शाकाहारी असतात. शाकाहाराला इथे 'शिवराक' म्हणतात. ( छान अशा नवी माहितीच इथे स्वागत आहे, तसे प्रत्येक ठिकाणी आम्ही संदर्भाची आठवण देत नाही!)

चतुर्थीचे वेध सगळ्यात आधी लागतात ते इथल्या पारंपारिक मूर्तिकारांना. साधारण दोन तीन महिन्याआधी त्यांच्या कामाला सुरुवात होते.

चिकणमाती आणुन ते रंग देण्यापर्यन्तची सगळी कामे आटोपेपर्यँत श्रावण कसा संपतो ते कळतच नाही.( हे तुमच व्यक्तिगत मत आहे बरोबर ना? तर त्या ऐवजी , अशाच प्रकारची इतर कुणाची विकिपीडिया सोडून इतरत्र प्रकाशित मत संदर्भा सहीत लिहू शकता).

श्रावण संपतो आणि घरोघरी खरेदी सुरु होते. सजावटीचे सामान, स्वयंपाकाच्या वस्तु, माटोळीच्या वस्तु (माटोळी? सांगतो पुढे!), फटाके इ. ची खरेदी होते. झालंच तर(अविश्वकोशिय! हे टाळल तर चालेल ?) घराला रंगरंगोटी केली जाते.

त्यानंतर घरोघरी करंज्या केल्या जातात. इथल्या गणेशोत्सवाचं हे एक खास वैशिष्ट्य आहे. इथे मोदकांपेक्षा मोठा मान करंजीचा.( छान अशा नवी माहितीच इथे स्वागत आहे, तसे प्रत्येक ठिकाणी आम्ही संदर्भाची आठवण देत नाही!) ओल्या नारळाच्या, सुक्या खोबरयाच्या, तिखट असे बरेच प्रकार केले जातात.

असे दिसले तर? संपादन

गोव्यातील सोडून इतर राज्यातील लोकांचा नाताळ, कार्निवलविषयी, न्यु ईयर वगैरे गोव्याचे मुख्य सण आहेत असा समज असतो पण मुख्य सण गणेशचतुर्थी हाच आहे[ संदर्भ हवा ] कोकणी भाषेत 'चवथ' असेही म्हणतात.


पण साडेचारशे वर्ष पोर्तुगीज राजवटीत राहूनसुद्धा गोव्याचे लोक आपली संस्कृती विसरले नाहित. आणी मुख्य म्हणजे दसरा दिवाळिपेक्षासुद्धा इथे गणेशचतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.[ संदर्भ हवा ]

शिवराक संपादन

गोव्याच्या लोकांना मासे (कोकणीत 'नुस्ते') म्हणजे जीव की प्राण. (तसे गोव्यातील सगळेच लोक मासे खातात हा आणखी एक गैरसमज.[ संदर्भ हवा ] पण गोव्यातसुद्धा बरेच लोक शुद्ध शाकाहारी आहेत.[ संदर्भ हवा ]

श्रावण महिना ते गणेशचतुर्थी होईपर्यंत इथले लोक शुद्ध शाकाहारी असतात. शाकाहाराला इथे 'शिवराक' म्हणतात.

चतुर्थीचे वेध सगळ्यात आधी लागतात ते इथल्या पारंपारिक मूर्तिकारांना. साधारण दोन तीन महिन्याआधी त्यांच्या कामाला सुरुवात होते.

चिकणमाती आणुन ते रंग देण्यापर्यन्तची सगळी कामे आटोपेपर्यँत श्रावण कसा संपतो.

श्रावण संपतो आणि घरोघरी खरेदी सुरु होते. सजावटीचे सामान, स्वयंपाकाच्या वस्तु, माटोळीच्या वस्तु [विशिष्ट अर्थ पहा], फटाके इ. ची खरेदी होते. घराना रंगरंगोटी केली जाते.

त्यानंतर घरोघरी करंज्या केल्या जातात. इथल्या गणेशोत्सवाचं हे एक खास वैशिष्ट्य आहे. इथे मोदकांपेक्षा मोठा मान करंजीचा. ओल्या नारळाच्या, सुक्या खोबरयाच्या, तिखट असे बरेच प्रकार केले जातात.

"गोव्यातील गणेशोत्सव" पानाकडे परत चला.