जून २६
दिनांक
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७७ वा किंवा लीप वर्षात १७८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनचौथे शतक
संपादन- ३६३ - रोमन सम्राट ज्युलियनचा मृत्यू. जोव्हियन सम्राटपदी.
सातवे शतक
संपादन- ६८४ - बेनेडिक्ट दुसरा पोप पदी.
पंधरावे शतक
संपादन- १४८३ - रिचर्ड तिसरा इंग्लंडच्या राजेपदी.
अठरावे शतक
संपादन- १७२३ - रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकु जिंकली.
एकोणिसावे शतक
संपादन- १८०७ - लक्झेम्बर्गमध्ये गोदामावर वीज पडून २३० ठार.
- १८१९ - सायकलचा पेटंट देण्यात आला.
विसावे शतक
संपादन- १९२४ - अमेरिकेच्या सैन्याने डॉमिनिकन प्रजासत्ताकमधून माघार घेतली.
- १९४५ - सान फ्रान्सिस्कोमध्ये संयुक्त राष्ट्रांचे संविधान जाहीर झाले.
- १९४८ - सोवियेत संघाने बर्लिनची रसद कापल्यावर अमेरिकेने विमानाद्वारे रसद कायम केली.
- १९५९ - अमेरिकेतील सेंट लॉरेन्स सी वे खुला झाला.
- १९६० - सोमालियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६० - मादागास्करला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६३ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीने मी बर्लिनचा एक नागरिक आहे (इश बिन आइन बर्लिनेर) असे जाहीर केले.
- १९७३ - सोवियेत संघातील प्लेसेत्स्क कॉस्मोड्रोम या उपग्रह प्रक्षेपणतळावर कॉसमॉस ३-एम. प्रकारच्या रॉकेटचा स्फोट. ९ ठार.
- १९७५ - तत्कालीन भारतीय राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणी जारी केली.
- १९७६ - कॅनडातील टोरोंटो शहरातील सी.एन. टॉवर खुला.
- १९७७ - एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम.
- १९७८ - एर कॅनडा फ्लाइट १८९ हे डी.सी.९ प्रकारचे विमान टोरोंटो येथे उड्डाण करताना कोसळले. २ ठार.
- १९७९ - मुष्टियोद्धा मुहम्मद अलीने निवृत्ती घेतली.
एकविसावे शतक
संपादन- २००६ - मॉॅंटेनिग्रोला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
जन्म
संपादन- १६८१ - हेडविग सोफिया, स्वीडिश लेखक.
- १६९४ - जॉर्ज ब्रांड्ट, स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ.
- १८२४ - लॉर्ड केल्व्हिन, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८३८ - बंकिमचंद्र चटर्जी, आद्य बंगाली कादंबरीकार.
- १८५४ - रॉबर्ट लेर्ड बोर्डेन, कॅनडाचा आठवा पंतप्रधान.
- १८७४ - छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज.
- १८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक.
- १८९२ - पर्ल बक, अमेरिकन लेखिका.
- १९१४ - शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान.
- १९५१ - गॅरी गिलमोर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - मिखाइल खोदोर्कोव्स्की, रशियन उद्योगपती.
मृत्यू
संपादन- ३६३ - ज्युलियन, रोमन सम्राट.
- १५४१ - फ्रान्सिस्को पिझारो, स्पॅनिश कॉॅंकिस्तादोर.
- १९२२ - आल्बर्ट पहिला, मोनॅकोचा राजा.
- १९४४ - प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
- २००१ - वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक.
- २००४ - यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- ध्वज दिन - रोमेनिया
- स्वातंत्र्य दिन - मादागास्कर, सोमालिया.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जून २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)