फ्रांसिस्को पिझारो इ गोंझालेझ (स्पॅनिश: Francisco Pizarro y González ;) (इ.स. १४७१ किंवा इ.स. १४७६ - जून २६, इ.स. १५४१) हा स्पॅनिश काँकिस्तादोर, इंका साम्राज्य जिंकून घेणारा जेता आणि सध्याच्या पेरूची राजधानी असलेल्या लिमा शहराचा संस्थापक होता.

मारक्वेस फ्रांसिस्को पिझारो
फ्रांसिस्को पिझारो

फ्रांसिस्को पिझारो


नुएवा कास्तीयाचा गव्हर्नर
कार्यकाळ
२६ जुलै इ.स. १५२९ – २६ जून इ.स. १५४१
राजा पहिला कार्लोस
पुढील ख्रिस्टोबाल वाका दे कास्त्रो

नुएवा कास्तीयाचा कॅप्टन जनरल
कार्यकाळ
२६ जुलै इ.स. १५२९ – २६ जून इ.स. १५४१

जन्म इ.स. १४७१ किंवा इ.स. १४७६
त्रुहियो, क्राउन ऑफ कॅस्टील
मृत्यू २६ जून इ.स. १५४१
लिमा, नुएवा कास्तीया
धर्म रोमन कॅथलिक
सही फ्रांसिस्को पिझारोयांची सही

पिझारोने इ.स. १५२४, इ.स. १५२६ व इ.स. १५३२ साली, अश्या तीन वेळा दक्षिण अमेरिकेत मुलूख धुंडाळायच्या मोहिमा काढल्या. इ.स. १५३३ साली इंकांकडून कुझ्कोचा पाडाव करून त्याने विद्यमान पेरूचा भूप्रदेश जिंकून घेतला. १८ जानेवारी, इ.स. १५३५ रोजी त्याने पेरूच्या किनार्‍यावर लिम्याची स्थापना केली.

बाह्य दुवेसंपादन करा