कुस्को

(कुझ्को या पानावरून पुनर्निर्देशित)


कुस्को (स्पॅनिश: Cuzco; क्वेचुआ: Qusqu किंवा Qosqo) हे पेरू देशातील एक शहर आहे. हे शहर पेरूच्या दक्षिण भागात आन्देस पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून ११,००० फूट उंचीवर वसले असून ह्याच नावाच्या प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे. १८व्या शतकाच्या अखेरीस दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असलेल्या कुस्कोची लोकसंख्या २००७ साली सुमारे ३.५९ लाख इतकी होती.

कुस्को
Cusco
पेरूमधील शहर


ध्वज
कुस्को is located in पेरू
कुस्को
कुस्को
कुस्कोचे पेरूमधील स्थान

गुणक: 13°31′30″S 71°58′20″W / 13.52500°S 71.97222°W / -13.52500; -71.97222

देश पेरू ध्वज पेरू
प्रदेश कुस्को
क्षेत्रफळ ७०,०१५ चौ. किमी (२७,०३३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ११,१५२ फूट (३,३९९ मी)
लोकसंख्या  (२००७)
  - शहर ३,५८,९३५
www.municusco.gob.pe

ऐतिहासिक इंका साम्राज्याची राजधानी असलेले कुस्को आजच्या घडिला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान व एक मोठे पर्यटनकेंद्र आहे. राष्ट्रीय संविधानात पेरूची ऐतिहासिक राजधानी असा उल्लेख केलेल्या कुस्को येथे दरवर्षी अंदाजे २० लाख पर्यटक भेट देतात.

चित्रदालन

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "अधिकृत संकेतस्थळ" (स्पॅनिश भाषेत). 2007-10-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-12 रोजी पाहिले.
  • "शासकीय सांस्कृतिक संकेतस्थळ" (स्पॅनिश भाषेत). 2011-11-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-12 रोजी पाहिले.
  • "कुस्कोची माहिती" (स्पॅनिश भाषेत). 2012-02-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-12 रोजी पाहिले.
  •   विकिव्हॉयेज वरील कुस्को पर्यटन गाईड (इंग्रजी)