लक्झेंबर्ग

पश्चिम युरोपातील एक देश
(लक्झेम्बर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)


लक्झेंबर्गची शाही राजसत्ता (लक्झेंबर्गिश: Groussherzogtum Lëtzebuerg, फ्रेंच: Grand-Duché de Luxembourg, जर्मन: Großherzogtum Luxemburg) हा पश्चिम युरोपामधील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लक्झेंबर्गच्या पश्चिम व उत्तरेला बेल्जियम, दक्षिणेला फ्रान्स व पूर्वेला जर्मनी हे देश आहेत. २,५८६ चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या लक्झेंबर्गची लोकसंख्या २०११ साली ५,१२,३५३ इतकी होती. लक्झेंबर्ग ह्याचा नावाचे शहर ही ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

लक्झेंबर्ग
Großherzogtum Luxemburg (जर्मन)
Grand-Duché de Luxembourg (फ्रेंच)
Groussherzogtum Lëtzebuerg (लक्झेंबर्गिश)
लक्झेंबर्ग चा ध्वज
ध्वज
ब्रीद वाक्य: "Mir wëlle bleiwe wat mir sinn"
(आम्ही जसे आहोत तसेच राहणे पसंद करू)
राष्ट्रगीत:
Ons Heemecht
आमची मातृभूमी
लक्झेंबर्गचे स्थान
लक्झेंबर्गचे स्थान
लक्झेंबर्गचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
लक्झेंबर्ग
अधिकृत भाषा फ्रेंच, जर्मन, लक्झेंबर्गिश
 - राष्ट्रप्रमुख हेन्री
 - पंतप्रधान ज्यां-क्लोद जुंके
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ९ जून १८१५ (फ्रान्सपासून
क्षेत्रफळ
 - एकूण २,५८६.४ किमी (१७९वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.६
लोकसंख्या
 -एकूण ५,०९,०७४ (१७३वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १९४.१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४१.२२१ अब्ज अमेरिकन डॉलर (९४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ८०,११९ अमेरिकन डॉलर (२वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.८६७ (अति उच्च) (२५ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन युरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+१)
आय.एस.ओ. ३१६६-१ LU
आंतरजाल प्रत्यय .lu
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३५२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इ.स. १८१५ सालापासून स्वतंत्र असलेल्या लक्झेंबर्गमध्ये संविधानिक एकाधिकारशाही स्वरूपाची राजवट असून सध्या राजसत्ता (डची) असलेला हा जगातील एकमेव देश आहे. लक्झेंबर्ग हा जगातील सर्वात प्रगत देशांपैकी एक असून येथील दरडोई उत्पन्न जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. लक्झेंबर्ग संयुक्त राष्ट्रे, युरोपियन संघ, नाटो, आर्थिक सहयोग व विकास संघटना, बेनेलक्स इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सभासद असून युरो हे येथील अधिकृत चलन आहे.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: