लक्झेंबर्ग (शहर)
लक्झेंबर्ग शहर (लक्झेंबर्गिश: Stad Lëtzebuerg, फ्रेंच: Ville de Luxembourg, जर्मन: Luxemburg Stadt) ही पश्चिम युरोपातील लक्झेंबर्ग देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्रँक लोकांनी मध्य युगात वसवलेले हे शहर लक्झेंबर्गच्या दक्षिण भागात आल्झेट व पेट्र्युस नद्यांच्या संगमावर स्थित आहे. हे शहर पश्चिम युरोपामध्ये मध्यवर्ती स्थानावर असून ते ब्रसेल्सपासून २१३ किमी (१३२ मैल), पॅरिसपासून ३७२ किमी (२३१ मैल), क्योल्नपासून २०९ किमी (१३० मैल) तर फ्रान्सच्या मेसपासून ६५ किमी (४० मैल) अंतरावर स्थित आहे.[१]
लक्झेंबर्ग Lëtzebuerg |
||
लक्झेंबर्ग देशाची राजधानी | ||
| ||
लक्झेंबर्गचे लक्झेंबर्गमधील स्थान | ||
देश | ![]() |
|
जिल्हा | लक्झेंबर्ग | |
क्षेत्रफळ | ५१.४६ चौ. किमी (१९.८७ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,३१९ फूट (४०२ मी) | |
लोकसंख्या (२०१०) | ||
- शहर | ९३,८६५ | |
- घनता | १,७२१ /चौ. किमी (४,४६० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
vdl.lu |
२०१० साली लक्झेंबर्ग शहराची लोकसंख्या सुमारे १ लाख होती. एक सुबत्त व प्रगत शहर असलेल्या लक्झेंबर्ग शहराचा २००९ साली जगात वार्षिक दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तिसरा क्रमांक होता.[२] बँकिंग व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग आहेत. येथील ऐतिहासिक तटबंदीमुळे ह्या शहराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळाले आहे.
चित्र दालनसंपादन करा
|
संदर्भसंपादन करा
- ^ "Great Circle Distances between Cities". United States Department of Agriculture. Archived from the original on 2005-03-26. 2006-07-23 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2015-11-17. 2011-11-01 रोजी पाहिले.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "पर्यटन".
- "लक्झेंबर्ग शहर संग्रहालय".
- विकिव्हॉयेज वरील लक्झेंबर्ग शहर पर्यटन गाईड (इंग्रजी)