जून १८
दिनांक
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६९ वा किंवा लीप वर्षात १७० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअठरावे शतक
संपादन- १७६७ - सॅम्युएल वॉलिस ताहितीला पोचणारा पहिला युरोपीय झाला.
- १७७८ - अमेरिकन क्रांती - ब्रिटिश सैन्याने फिलाडेल्फियातून पळ काढला.
एकोणिसावे शतक
संपादन- १८१२ - १८१२ चेयुद्ध - अमेरिकेने युनायटेड किंग्डमविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८१५ - वॉटर्लूच्या युद्धानंतर नेपोलियन बोनापार्टने फ्रांसचे राज्य सोडले.
विसावे शतक
संपादन- १९०० - चीनने देशातील बाल-स्त्रीयांसकट सगळ्या परदेशी व्यक्तींना ठार मारण्याचा हुकुम सोडला.
- १९०८ - ७८१ जपानी व्यक्ती पेरूच्या किनाऱ्यावर पोचले.
- १९५३ - इजिप्त प्रजासत्ताक झाले.
- १९५३ - अमेरिकेचे सी.-१२४ प्रकारचे विमान टोक्योजवळ कोसळले. १२९ ठार.
- १९५४ - पिएर मेंडेस-फ्रांस फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९७९ - अमेरिका व सोवियेत संघात सॉल्ट २ तह.
- १९८३ - सॅली राइड पहिली अमेरिकन महिला अंतराळयात्री झाली.
एकविसावे शतक
संपादन- २००६ - कॅझसॅट या कझाकस्तानच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण.
- २०१३ - भारताच्या उत्तराखंड राज्यात मुसळधार पाउस पडून मंदाकिनी व अलकनंदा नद्यांना महापूर. शेकडो मृत्युमुखी, हजारो बेघर.
जन्म
संपादन- १५१७ - ओगिमाची, जपानी सम्राट.
- १५५२ - गॅब्रियेलो चियाब्रेरा, इटालियन कवी.
- १८१२ - इव्हान गॉन्चारोव्ह, रशियन लेखक.
- १९१५ - रेड अडेर, अमेरिकन अग्निशामक.
- १८१८ - जेरोम कार्ल, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९३१ - फर्नान्डो हेनरिके कार्दोसो, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३२ - डडली आर. हर्शबाख, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९३७ - जॉन डी. रॉकेफेलर चौथा, अमेरिकन सेनेटर.
- १९४२ - सर पॉल मॅककार्टनी, इंग्लिश संगीतकार.
- १९४२ - थाबो म्बेकी, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४९ - लेक कझिन्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४९ - यारोस्लॉ कझिन्स्की, पोलंडचा पंतप्रधान, लेक कझिन्स्कीचा जुळा भाऊ.
- १९६४ - उदय हुसेन, इराकी नेता.
मृत्यू
संपादन- १९०१ - रामचंद्र भिकाजी गुंजीकर, विविध ज्ञानविस्तार या मासिकाचे संपादक.
- १९७१ - पॉल कारर, स्विस रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९९९ - श्रीपाद रामकृष्ण काळे, मराठी साहित्यिक
- २००३ - जानकीदास, भारतीय चरित्र अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- राष्ट्र दिन - सेशेल्स.
- वॉटरलू दिन - युनायटेड किंग्डम.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जून १८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)