विविध ज्ञानविस्तार (नियतकालिक)
विविध ज्ञानविस्तार हे इ.स. १८६७ साली[१] सुरू झालेले मराठी भाषेतील मासिक होते. रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी या मासिकाची स्थापना केली. भौतिक व सामाजिक शास्त्रांतील विविध ज्ञानशाखांविषयी तत्कालीन विद्वानांनी, अभ्यासकांनी लिहिलेले लेख या मासिकात छापून येत असत. हे मासिक इ.स. १९३७ सालापर्यंत चालले[२].
विविध ज्ञानविस्तार | |
---|---|
प्रकार | मासिक |
विषय | माहितीपर (विविध ज्ञानशाखा) |
भाषा | मराठी |
माजी संपादक | रामचंद्र भिकाजी गुंजीकर |
खप | मर्यादित |
स्थापना | इ.स. १८६७ |
पहिला अंक | इ.स. १८६७ |
देश | ब्रिटिश भारत |
मुख्यालय | मुंबई |
वाटचाल
संपादनइ.स. १८६७ साली रामचंद्र भिकाजी गुंजीकरांनी विविध ज्ञानविस्ताराची सुरुवात केली. या मासिकाचे ते संस्थापक संपादक होते; मात्र त्यावर ते संपादक म्हणून आपले नाव घालत नसत [३]. मासिकाच्या आरंभिक काळापासून भाषा, व्याकरण, भाषिक व्युत्पत्ती इत्यादी विषयांवर त्यात लेख छापून येत असत. सात वर्षे संपादनाचा व्याप सांभाळल्यानंतर गुंजीकर विविधज्ञानविस्तारातून बाहेर पडले [३].
शिवकालीन मराठा अष्टप्रधानमंडळातील रामचंद्र अमात्य यांनी ग्रथबद्ध केलेली आज्ञापत्रे विविध ज्ञानविस्तारातून इ.स. १८७२ - इ.स. १८७४ या काळात क्रमशः छापून येत होते [४].
संकेतस्थळावर विविध ज्ञानविस्तारचे अंक
संपादनजुलै १८६७ ते जानेवारी १९३५ या कालावधीतील विविध ज्ञानविस्तारचे १०० अंक Archived 2016-08-12 at the Wayback Machine. ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहेत. संकेतस्थळाच्या दुर्मिळ ग्रंथ या पानावरील ४९ ते ८६ या अनुक्रमांकावर ह्यातला अंक उतरवून घेण्याची कळ आहे.
संदर्भ व नोंदी
संपादन- ^ पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे. महाराष्ट्र संस्कृती. p. ७८१.
- ^ मराठी विश्वकोश, खंड ८.
- ^ a b मराठी विश्वकोश, खंड ५.
- ^ "विद्वत्तेचा वाटाड्या, समीक्षेचा आदर्श". ५ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |