पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे


डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे (संपूर्ण नाव पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे) ( [[इ.स.१९०४ - इ.स. १९८५) हे मराठीतील निबंधकार व विचारवंत म्हणून ओळखले जातात. ते एम.ए. पीएच.डी होते. पाश्चात्य व पौर्वात्य शास्त्रांचे ते अभ्यासक होते. 'विज्ञान- प्रणीत समाजरचना' व 'स्वभावलेखन' हे त्यांचे प्रारंभीचे ग्रंथ होत.

त्यांचा 'विज्ञान-प्रणित समाजरचना' हा ग्रंथ प्रथम १९३६ साली प्रसिद्ध झाला. या ग्रंथाला भोर संस्थानचे "श्रीमंत शंकराजी नारायण पारितोषिक" मिळाले. या ग्रंथाची दुसरी आवृत्ती १९८८ साली प्रसिद्ध झाली. आजच्या विज्ञान युगात कोणत्या नव्या तत्त्वांच्या आधारे समाज-रचना करावी, ते या ग्रंथात सांगितले आहे.^[१]

'महाराष्ट्र संस्कृती' या ग्रंथात इ. पू. २३५ ते इ. स. १९४७ या सुमारे बावीसशे वर्षांच्या काळातील महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विवेचन केले आहे. धर्म, राजकारण, समाजरचना, अर्थकारण, विज्ञान, कला, साहित्य व शिक्षण अशी संस्कृतीची आठ प्रधान अंगे आहेत. या आठही अंगांचे विवेचन उपलब्ध माहितीच्या आधारे या ग्रंथात केलेले आहे. या ग्रंथाची प्रकरणे ’वसंत’ मासिकात १९६८सालापासून ते १९७८ च्या ऑक्टोबरपर्यंत क्रमशः येत होती.[२]

पु.ग. सहस्रबुद्धे यांची पुस्तके संपादन करा

 • प्रबंध
  • इहवादी शासन (१९७२)
  • केसरीची त्रिमूर्ती (१९७४)
  • भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म (१९६५)
  • भारतीय लोकसत्ता (१९५४)
  • महाराष्ट्र संस्कृती (१९७९). [३]
  • लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान (१९६५)
  • विज्ञानप्रणीत समाजरचना (१९३६)[४]
  • स्वभावलेखन (१९३९)
  • हिंदुसमाज संघटना आणि विघटना (१९६७)
 • निबंध-संग्रह
  • पराधीन सरस्वती (१९६२)
  • माझे चिंतन (१९५५)[५]
  • राजविद्या (१९५९)
  • वैयक्तिक आणि सामाजिक (१९६३)
  • साहित्यातील जीवनभाष्य
  • सौंदर्यरस
 • ललित
  • लपलेले खडक (लघुकथा - १९३४)
  • वधूसंशोधन (नाटक - १९३४)
  • सत्याचे वाली (नाटक - १९३३)
 • पु.ग. सहस्रबुद्धे यांनी संपादित केलेले ग्रंथ
  • लोकहितवादींची शतपत्रे

गौरवग्रंथ संपादन करा

सहस्रबुद्धे यांच्या षष्ट्यब्दीला, म्हणजे १९६४ साली, ’डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे : व्यक्तिदर्शन आणि साहित्यविवेचन’ नावाचा दोन-खंडी ग्रंथ डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे सत्कार समितीने प्रसिद्ध केला. त्याचे संपादन प्रा. व.दि. कुलकर्णी, प्रा. भी. ब. कुलकर्णी, प्रा. स. ह. देशपांडे आणि प्रा. गं. म. साठे यांनी केले होते. या ग्रंथात सहस्रबुद्धे यांचा ‘वाणी आणि लेखणी’ हा एक छोटा आत्मचरित्रवजा लेख आहे.