अलकनंदा नदी
उत्तराखंड राज्यातील नदी
अलकनंदा ही भारताच्या उत्तराखंड राज्यामधील नदी व गंगेच्या दोन मूळनद्यांपैकी एक आहे (भागीरथी नदी ही दुसरी). अलकनंदा उत्तरखंडच्या उत्तर भागातील तिबेटच्या सीमेजवळील एक पर्वतशिखरामध्ये उगम पावते. ती चमोली, रुद्रप्रयाग व पौडी ह्या जिल्ह्यांमधून वाहत जाऊन देवप्रयाग येथे गंगेला मिळते.
अलकनंदा | |
---|---|
अलकनंदाचे देवप्रयाग येथील पात्र | |
उगम | सतोपंथ ग्लेशियर, हिमालय |
मुख | देवप्रयाग, उत्तराखंड |
पाणलोट क्षेत्रामधील देश | उत्तराखंड |
लांबी | १९० किमी (१२० मैल) |
उगम स्थान उंची | ३,८८० मी (१२,७३० फूट) |
सरासरी प्रवाह | ४३९.४ घन मी/से (१५,५२० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | १०,८८२ |
ह्या नदीस मिळते | गंगा नदी |
उपनद्या | मंदाकिनी नदी, सरस्वती नदी, धौलीगंगा नदी |
चार धाम यात्रेचा भाग असलेले बद्रीनाथ हे गाव अलकनंदाच्या काठावर वसले आहे.
पंचप्रयाग
संपादनगढवाल प्रदेशामधील अनेक नद्या अलकनंदाला येऊन मिळतात. ह्या संगमांच्या स्थानांना पंचप्रयाग असे म्हणले जाते.
- विष्णुप्रयाग, जेथे अलकनंदाला धौलीगंगा नदी येऊन मिळते.
- नंदप्रयाग, जेथे अलकनंदाला नंदाकिनी नदी येऊन मिळते.
- कर्णप्रयाग, जेथे अलकनंदाला पिंडर नदी येऊन मिळते.
- रुद्रप्रयाग, जेथे अलकनंदाला मंदाकिनी नदी येऊन मिळते.
- देवप्रयाग, जेथे अलकनंदाला भागीरथी नदी येऊन मिळते व गंगा निर्माण होते.
काठावरील गावे
संपादननदीच्या उगमापासून ते मुखापर्यंत खालील गावे अलकनंदाच्या काठांवर वसली आहेत. ह्यांमधील बहुतेक गावे लोकप्रिय पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रे आहेत: बद्रीनाथ, विष्णुप्रयाग, जोशीमठ, चमोली गोपेश्वर, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, श्रीनगर व देवप्रयाग.