रुद्रप्रयाग हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक लहान शहर व रुद्रप्रयाग जिल्ह्याचे मुख्यालय आहे. उत्तराखंडमधील पंचप्रयागांपैकी एक असलेले रुद्रप्रयाग अलकनंदामंदाकिनी नद्यांच्या संगमावर वसले असून ते राजधानी डेहराडूनच्या १८० किमी पूर्वेस स्थित आहे.

रुद्रप्रयाग
भारतामधील शहर

अलकनंदामंदाकिनी नद्यांच्या संगमावरील रुद्रप्रयाग
रुद्रप्रयाग is located in उत्तराखंड
रुद्रप्रयाग
रुद्रप्रयाग
रुद्रप्रयागचे उत्तराखंडमधील स्थान
रुद्रप्रयाग is located in भारत
रुद्रप्रयाग
रुद्रप्रयाग
रुद्रप्रयागचे भारतमधील स्थान

गुणक: 30°17′N 78°59′E / 30.283°N 78.983°E / 30.283; 78.983

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तराखंड
जिल्हा रुद्रप्रयाग जिल्हा
क्षेत्रफळ ३ चौ. किमी (१.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,९३६ फूट (८९५ मी)
लोकसंख्या  (२००१)
  - शहर २,२४२
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

राष्ट्रीय महामार्ग ५८ रुद्रप्रयागमधून जातो. रुद्र्प्रयागहून गौरीकुंडकेदारनाथकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग १०९ उपलब्ध आहे. २०१३ साली आलेल्या महापुरामध्ये रुद्रप्रयागचे प्रचंड नुकसान झाले.

बाह्य दुवे संपादन