मंदाकिनी ही भारताच्या उत्तराखंड राज्यामधील नदीअलकनंदाची उपनदी आहे. मंदाकिनी उत्तरखंडच्या उत्तर भागात केदारनाथजवळील एक पर्वतशिखरामध्ये उगम पावते. ती रुद्रप्रयाग येथे अलकनंदेला मिळते. पुढे अलकनंदा व भागीरथी ह्या नद्यांचा देवप्रयाग येथे संगम होऊन गंगेची सुरुवात होते.

मंदाकिनी
मंदाकिनीचे गुप्तकाशी येथील पात्र
उगम केदारनाथ
मुख रुद्रप्रयाग, उत्तराखंड
पाणलोट क्षेत्रामधील देश उत्तराखंड
ह्या नदीस मिळते अलकनंदा नदी
रुद्रप्रयाग येथे मंदाकिनी व अलकनंदेचा संगम

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले केदारनाथ मंदिर मंदाकिनीच्या किनाऱ्यावर स्थित आहे.