फिलाडेल्फिया
फिलाडेल्फिया हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील सर्वात मोठे शहर असून लोकसंख्येनुसार अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. फिलाडेल्फिया पेनसिल्व्हेनिया राज्याच्या आग्नेय कोपऱ्यात न्यू जर्सी राज्याच्या सीमेवर डेलावेर नदीच्या काठावर वसले असून ते न्यू यॉर्क शहराच्या नैऋत्येला ९० मैल अंतरावर तर वॉशिंग्टन डी.सी.च्या ईशान्येला १४० मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली फिलाडेल्फियाची लोकसंख्या १५.२६ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ६० लाख होती.
फिलाडेल्फिया Philadelphia |
|
अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | पेन्सिल्व्हेनिया |
स्थापना वर्ष | ऑक्टोबर २५, इ.स. १७०१ |
महापौर | मायकेल नटर |
क्षेत्रफळ | ३६९.३ चौ. किमी (१४२.६ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,११७ फूट (३४० मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | १५,२६,००६ |
- घनता | ४,४०५.४ /चौ. किमी (११,४१० /चौ. मैल) |
- महानगर | ५९,५५,३४३ |
प्रमाणवेळ | यूटीसी−०५:०० |
phila.gov |
ऑक्टोबर २७, इ.स. १६८२ रोजी विल्यम पेन ह्या ब्रिटिश व्यापाऱ्याने स्थापन केलेल्या फिलाडेल्फियाला अमेरिकेच्या इतिहासात मोठे महत्त्व आहे. जुलै ४, इ.स. १७७६ रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा येथेच लिहिला गेला. वॉशिंग्टन डी.सी. पूर्वी अमेरिकेची राजधानी फिलाडेल्फिया येथे होती.
वाहतूक
संपादनफिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पेन्सिल्व्हेनियामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ फिलाडेल्फिया शहरामध्येच स्थित आहे. येथून अमेरिकेच्या बहुतेक सर्व मोठ्या शहरांसाठी तसेच युरोप, कॅरिबियन, लॅटिन अमेरिका येथील काही प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. इंटरस्टेट ९५ व इंटरस्टेट ७६ हे दोन प्रमुख इंटरस्टेट महामार्ग फिलाडेल्फियामधून जातात. नागरी परिवहनासाठी येथे सेप्टा ह्या सरकारी संस्थेद्वारे अनेक बसमार्ग, जलद परिवहन रेल्वेमार्ग, उपनगरी रेल्वेमार्ग चालवले जातात. ॲमट्रॅक ह्या अमेरिकेतील प्रमुख रेल्वे कंपनीच्या मार्गावरील फिलाडेल्फिया हे प्रमुख स्थानक आहे.
खेळ
संपादनखालील चार प्रमुख व्यावसायिक क्रीडा संघ फिलाडेल्फिया महानगरामध्ये स्थित आहेत. अमेरिकेमधील चारही मोठ्या खेळांमधील व्यावसायिक संघ असलेले फिलाडेल्फिया हे १२ पैकी एक शहर आहे.
संघ | खेळ | लीग | स्थान | स्थापना |
---|---|---|---|---|
फिलाडेल्फिया ईगल्स | अमेरिकन फुटबॉल | नॅशनल फुटबॉल लीग | लिंकन फायनान्शियल फील्ड | १९३३ |
फिलाडेल्फिया सेव्हन्टीसिक्सर्स | बास्केटबॉल | नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन | वेल्स फार्गो सेंटर | १९६३ |
फिलाडेल्फिया फ्लायर्स | आइस हॉकी | नॅशनल हॉकी लीग | वेल्स फार्गो सेंटर | १९६७ |
फिलाडेल्फिया फिलीज | बेसबॉल | मेजर लीग बेसबॉल | सिटिझन्ज बँक पार्क | १८८३ |
शहर रचना
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |