इंटरस्टेट हायवे सिस्टम

ड्वाइट डी. आयझेनहोवर राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराज्य हमरस्ता प्रणाली किंवा इंटरस्टेट हायवे सिस्टम हे अमेरिकेतील नियंत्रित-प्रवेश महामार्गांचे जाळे आहे. याला इंटरस्टेट फ्रीवे सिस्टम, इंटरस्टेट सिस्टम किंवा नुसतेच इंटरस्टेट या नावांनेही ओळखले जाते. १९५६ साली राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवरने इंटरस्टेट मार्गांची संकल्पना मांडली. जर्मनीच्या ऑटोबानवरून त्याला ही कल्पना सुचली असे मानले जाते.

एकूण ४६,८३७ मैल (७५,३७६ किमी) पसरलेले हे जाळे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांना चौपदरी किंवा अधिक रुंदीच्या द्रुतगतीमार्गांनी जोडते. प्रत्येक इंटरस्टेट महामार्ग एका ठराविक क्रमांकाने ओळखला जातो. उत्तर-दक्षिण महामार्गांना विषम तर पूर्व-पश्चिम महामार्गांना सम क्रमांक देउन या रस्त्त्यांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. बोस्टन ते सिऍटल दरम्यान ३०९९ मैल धावणारा इंटरस्टेट ९० हा सर्वात लांब इंटरस्टेट महामार्ग आहे.

हे सुद्धा पहा संपादन