न्यू जर्सी

अमेरिकेतील एक राज्य

न्यू जर्सी (इंग्लिश: New Jersey, En-us-New_Jersey.ogg न्यू जर्झी ) हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले न्यू जर्सी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने अकराव्या क्रमांकाचे राज्य आहे.

न्यू जर्सी
New Jersey
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द गार्डन स्टेट (The Garden State)
ब्रीदवाक्य: Liberty and prosperity
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी ट्रेंटन
मोठे शहर न्यूअर्क
क्षेत्रफळ  अमेरिकेत ४७वा क्रमांक
 - एकूण २२,६०८ किमी² 
  - रुंदी ११२ किमी 
  - लांबी २७३ किमी 
 - % पाणी १४.९
लोकसंख्या  अमेरिकेत ११वा क्रमांक
 - एकूण ८७,९१,८९४ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ४५८/किमी² (अमेरिकेत १वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $७०,३७८
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश १८ डिसेंबर १७८७ (१८वा क्रमांक)
संक्षेप   US-NJ
संकेतस्थळ www.nj.gov

न्यू जर्सीच्या पूर्वेला व दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला डेलावेरपेनसिल्व्हेनिया व उत्तरेला न्यू यॉर्क ही राज्ये आहेत. ट्रेंटन ही न्यू जर्सीची राजधानी तर न्यूअर्क हे सर्वात मोठे शहर आहे. न्यू जर्सीमधील बव्हंशी लोक न्यू यॉर्क शहरफिलाडेल्फिया ह्या महानगरांच्या क्षेत्रांत राहतात.

दरडोई उत्पन्नाच्या दृष्टीने न्यू जर्सी हे अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. येथील अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणावर न्यू यॉर्क शहरावर अवलंबून आहे व न्यू यॉर्क शहरामध्ये काम करणारे हजारो लोक न्यू जर्सीमध्ये वास्तव्य करतात. भारतीय वंशाच्या रहिवाशांच्या संख्येमध्ये न्यू जर्सीचा अमेरिकेत तिसरा क्रमांक लागतो.


मोठी शहरे

संपादन


गॅलरी

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: