जॉर्ज वॉशिंग्टन (इंग्लिश: George Washington) (२२ फेब्रुवारी, इ.स. १७३२ - १४ डिसेंबर, इ.स. १७९९) हे इ.स. १७८९ ते इ.स. १७९७ या काळात अधिकारारूढ असलेले अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होत. इ.स. १७७५ ते इ.स. १७८३ या कालखंडात घडलेल्या अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धातत्यांनी खंडीय सैन्याचे नेतृत्व केले. इ.स. १७८७ साली नवस्वतंत्र संस्थानांच्या राष्ट्रासाठी राज्यघटना लिहिणाऱ्या मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पहिला अध्यक्ष म्हणून इ.स. १७८९ साली त्यांची एकमुखाने निवड झाली. शासनाची कार्यकारी यंत्रणा कॅबिनेट स्वरूपाची असणे, अध्यक्षांचे अभिभाषण इत्यादी पायंडे व रीती घालून देऊन त्यांनी अमेरिकेच्या राज्यव्यवस्थेचा पाया घालण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अमेरिकेची संयुक्त संस्थानांनी युरोपातील राजकीय संघर्षाबाबत अलिप्त भूमिका राखत वित्तीय स्थिती सुदृढ असलेल्या शासनव्यवस्थेची बांधणी, स्थानिक बंडाळ्यांचा बिमोड करून सुव्यवस्था राखण्यावर भर दिला. या काळात अमेरिकेच्या राजकीय पटलावर भिन्न भिन्न मतप्रणाल्यांच्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांचे उदय होऊन बहुपक्षीय राजकारणाची व्यवस्था आकारास आली. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात व तत्पश्चात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या जडणघडणीवर त्यांच्या कार्याचा मोठा प्रभाव असल्याने, त्यांना अमेरिकेचा राष्ट्रपिता असेही मानले जाते.

जॉर्ज वॉशिंग्टन
जॉर्ज वॉशिंग्टन


कार्यकाळ
३० एप्रिल १७८९ – ४ मार्च १७९७
मागील पदनिर्मिती
पुढील जॉन अ‍ॅडम्स

जन्म २२ फेब्रुवारी १७३२ (1732-02-22)
व्हर्जिनिया, ब्रिटिश अमेरिका
मृत्यू १४ डिसेंबर, १७९९ (वय ६७)
व्हर्जिनिया, अमेरिका
सही जॉर्ज वॉशिंग्टनयांची सही

जाॅर्ज वाॅशिंग्टनच्या बाबतीत म्हटले जाते की, 'तो युद्धकाळातील पहिला होता, शांततेच्या काळात पहिला होता आणि त्यांच्या देशवासियांच्या ह्रदयातही त्यांचे स्थान पहिले होते.'

तरूणपणसंपादन करा

जॉर्ज वॉशिंग्टन हे व्हर्जिनियातील जमीनदार होते. त्यानी सप्तवार्षिक युद्धात तसेच फ्रेंचाशी व रेड इंडियन यांच्याशी झालेल्या अनेक लढायांत भाग घेतला. वसाहतींच्या संयुक्त सैन्यांच्या सेनापतीपदावर त्यांची निवड झाली. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचे नेतृत्व जॉर्ज वॉशिंग्टनकडे होते.

बाह्य दुवेसंपादन कराकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.