मूळचे अमेरिकन लोक

(रेड इंडियन या पानावरून पुनर्निर्देशित)


सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिकेची संयुक्त संस्थाने खंडात आले व संपूर्ण द. व उ. अमेरिकेत पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात.

त्यांच्या अनेक भटक्या जमाती अस्तित्वात होत्या. त्यांची अनेक राज्ये, शहरे व भरभराटीला आलेल्या संस्कृतीभाषा होत्या.

१९ नोव्हेंबर १४९३ रोजी क्रिस्टोफर कोलंबस याला अमेरिकेचा शोध लागला. नंतर युरोपियन लोक अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागले. युरोपातून आलेल्या अनेक साथीच्या रोगांमुळेयुरोपियनांशी झालेल्या संघर्षांमध्ये जवळजवळ ९० टक्के मूळचे अमेरिकन लोक मरण पावले. युरोपियन लोकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे त्यांचे प्राबल्य कमी होऊन ती भूमी युरोपियन अमेरिकन लोकांच्या ताब्यात गेली व मूळ अमेरिकन लोकांना छोट्या आरक्षित क्षेत्रांमध्ये राहावे लागले.

आज त्यांच्या अनेक भाषासंस्कृती या लुप्त झालेल्या आहेत किंवा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

आजही संपूर्ण अमेरिकेची संयुक्त संस्थाने खंडात आज त्यांच्या अनेक जमाती आहेत. अमेरिका देशातील त्यांची लोकसंख्या २,७८६,६५२ म्हणजे संपूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येच्या केवळ १% इतकी आहे. (२००३ जनगणना). इतर देशांतील त्यांची टक्केवारी बरीच जास्त आहे.

न्यू मेक्सिको येथील मूळ अमेरिकन लोकांसाठीचा आरक्षित प्रदेश

युरोपियन स्थलांतरानंतर त्यांना आपली संपन्न भूमी गमवावी लागली, अनेक जुलुमांना बळी पडावे लागले व छोट्या आरक्षित क्षेत्रांमध्ये राहावे लागले. अनेक आरक्षित क्षेत्रे ही कोरड्या हवामानाची असल्यामुळे तिथे पुरेसे अन्न पिकत नाही.

नवाजो, चेरोकी, चॉक्टॉ, लखोटा, चिप्पेवा, आय्मारा, क्वेचुआ, एस्किमो, इनुइट, मापुचे, नाहुआ, माया या काही मूळ अमेरिकन जमाती आहेत.

इंग्रजी दुवे

संपादन
  1. अमेरिकेतील मूळचे अमेरिकन लोक
  2. मूळच्या अमेरिकन लोकांची युद्धे
  3. अश्रूंची पाऊलवाट