खंडीय सेना

(खंडीय सैन्य या पानावरून पुनर्निर्देशित)

खंडीय सेना तथा कॉंटिनेंटल आर्मी हे अमेरिकेच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ब्रिटिशांविरुद्ध लढणारे सैन्य होते. याची रचना १४ जून, इ.स. १७७५ रोजी दुसऱ्या खंडीय काँग्रेसने ठराव संमत करून केली. अमेरिकेच्या पहिल्या १३ वसाहतींमधील सैनिकी तुकड्यांमध्ये एकोपा होउन एका नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी हे सैन्य रचले गेले होते. जॉर्ज वॉशिंग्टन या सैन्याचा एकमेव सेनापती होता. हे सैन्य १७८३ च्या पॅरिस तहानंतर बरखास्त करण्यात आले. यातील १ ली व २ री रेजिमेंट १७९२ साली लीजन ऑफ द युनायटेड स्टेट्समध्ये परिवर्तित झाली. १७९६मध्ये यातून अमेरिकेचे सैन्य निर्माण करण्यात आले.