रियो डी जानीरो

(रियो दि जानेरो या पानावरून पुनर्निर्देशित)


रियो डी जानीरो हे ब्राझील देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इ.स. १७६३ ते १९६० दरम्यान ही ब्राझीलची राजधानी होती. २०१६मध्ये रियो डी जानीरोमध्ये ऑलिंपिक खेळस्पर्धा झाल्या.तसेच हे एक उत्तम बंदर असून व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे.पहिली वसुंधरा परिषद १९९२ साली ब्राझील देशाच्या याच शहरात झाली होती.या शहराला दक्षिण अटलांटिक महासागराचा समुद्रकिनारा लाभला आहे.हे शहर दक्षिण अमेरिका खंडातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

रियो डी जानीरो
Rio de Janeiro
ब्राझीलमधील शहर


ध्वज
चिन्ह
रियो डी जानीरो is located in ब्राझील
रियो डी जानीरो
रियो डी जानीरो
रियो डी जानीरोचे ब्राझीलमधील स्थान

गुणक: 22°54′S 43°12′W / 22.900°S 43.200°W / -22.900; -43.200

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य रियो डी जानीरो
स्थापना वर्ष १ मार्च १५६५
क्षेत्रफळ १,२६० चौ. किमी (४९० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ० फूट (० मी)
लोकसंख्या  
  - शहर ६०,९३,४७२
  - घनता ४,७८१ /चौ. किमी (१२,३८० /चौ. मैल)
http://www.rio.rj.gov.br

नाव संपादन

या शहराचे नाव रिओ डी जनेरिओ असे आहे.या नावाचा पोर्तुगीज भाषेत अर्थ जानेरीओची नदी असा होतो.या शहराचे दुसरे उपनाव अ सिदादे मार्विलोह्सा अर्थात अद्भुत शहर असे सुद्धा प्रचलित आहे.

इतिहास संपादन

हे शहर पोर्तुगीज सत्तेच्या अधिपत्याखाली दोन शतक ब्राझील देशाची राजधानी होते.

भूगोल संपादन

हे ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे शहर आहे.या किनारपट्टीला दक्षिण अटलांटिक महासागराचा किनारा आहे.हे शहर ब्राझीलच्या आग्नेय दिशेस आहे.या शहराची समुद्र्सापाटीपासूनची उंची सर्वसाधारणपणे २०० मी एवढी आहे.या शहराच्या किनाऱ्यावर पुळण व तटीय वालुकागिरी दिसतात.या प्रदेशातील नद्या मुख्यतः कमी लांबीच्या आहेत.जसे रिओ डी जनेरिओ हे शहर आहे तसेच ते राज्य सुद्धा आहे.

हवामान संपादन

रिओ डी जनेरिओ हे शहर किनारी भागात असल्याने या भगातून आग्नेय वारे ब्राझील देशात प्रवेशतात.तसच जवळील प्राकृतिक विभाग असलेल्या अजस्त्र कडयामुळे या भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.या शहराच्या भौगोलिक स्तिथीमुळे या शहरातील हवामान सौम्य व आर्द्र प्रकारचे आहे.तसेच या शहरात फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक तापमान असते. आणि डिसेंबर ते मार्च या काळात जास्त पाऊस पडतो.