जगातील सात नवी आश्चर्ये

जगातील सात नवी आश्चर्ये (२००१ - २००७) हा २००१ साली सुरू झालेला व जगातील सात नवी आश्चर्ये शोधून काढण्यासाठी बनवलेला एक उपक्रम आहे असे सांगितले गेले. लोकांनी त्यांच्या मते आश्चर्यांत नोंद व्हावी अशा २०० इमारतीं व वास्तूंची नावे न्यू७वंडर्स नावाच्या झुरिच शहरामधील एका संस्थेकडे पाठवली. त्या संस्थेने घेतलेल्या या लोकप्रियता कौलामधील विजेत्या वास्तूंची घोषणा ७ जुलै २००७ रोजी लिस्बन येथे करण्यात आली.[१] ह्या कौलादरम्यान इंटरनेट व फोनद्वारे १० कोटी लोकांनी मते टाकल्याचा न्यू७वंडर्सने दावा केला. परंतु हा कौल शास्त्रशुद्ध पद्धतीने न घेतल्यामुळे एकाच व्यक्तीला अनेक वेळा मते देणे सहज शक्य होते. ह्यामुळे ह्या कौलाच्या अचूकतेवर शंका व्यक्त केली गेली आहे.

जगातील सात नवी आश्चर्ये

विजेतेसंपादन करा

 
सात नव्या आश्चर्यांची स्थाने
आश्चर्य स्थान चित्र
ताज महाल
Taj mahal
आग्रा, भारत  
चिचेन इत्सा
Chi'ch'èen Ìitsha'
युकातान, मेक्सिको  
क्रिस्तो रेदेंतोर
O Cristo Redentor
रियो दि जानेरो, ब्राझिल  
कलोसियम
Colosseo
रोम, इटली  
चीनची भिंत

Wànlǐ Chángchéng
चीन  
माक्सू पिक्त्सू
Machu Pikchu
कुस्को, पेरू  
पेट्रा al-Batrāʾ जॉर्डन  

ह्यांव्यतिरिक्त ऐतिहासिक जगातील सध्या अस्तित्वात असलेले एकमेव आश्चर्य गिझाचा पिरॅमिड ह्याला मानाचे स्थान देण्यात आले.

आश्चर्य स्थान चित्र
गिझाचा भव्य पिरॅमिड | गिझा, इजिप्त  

इतर स्पर्धकसंपादन करा

आश्चर्य स्थान चित्र
अथेन्सचे अ‍ॅक्रोपोलिस अथेन्स, ग्रीस  
आलांब्रा ग्रानादा, स्पेन  
आंग्कोर वाट आंग्कोर, कंबोडिया  
आयफेल टॉवर पॅरिस, फ्रान्स  
हागिया सोफिया इस्तंबूल, तुर्कस्तान  
कियोमिझू-देरा क्योतो, जपान  
माउई ईस्टर द्वीप, चिली  
नॉयश्वानस्टाइन बायर्न, जर्मनी  
लाल चौक मॉस्को, रशिया  
स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा न्यू यॉर्क, अमेरिका  
स्टोनहेंज एम्सबरी, इंग्लंड  
सिडनी ऑपेरा हाउस सिडनी, ऑस्ट्रेलिया  
टिंबक्टू टिंबक्टू, माली  

संदर्भसंपादन करा

  1. ^ Dwoskin, Elizabeth. "Vote for Christ". ISSN 0028-9604.

बाह्य दुवेसंपादन करा