कलोसियम हे रोम शहरामधील अंडाकृती आकाराचे एक खुले थिएटर आहे. ऐतिहासिक रोमन साम्राज्य काळात बांधले गेलेले कलोसियम थिएटर रोमन वास्तूशास्त्र व अभियांत्रिकीचे एक सर्वश्रेष्ठ उदाहरण मानले जाते.

कलोसियम

सम्राट व्हेस्पासियनच्या मार्गदर्शनाखाली इ.स. ७० ते ७२ काळामध्ये कलोसियमचे बांधकाम सुरु झाले[१] व इ.स. ८० साली टायटसच्या काळात ते पूर्ण झाले.[२] ५०,००० प्रेक्षकांची क्षमता असलेले कलोसियम कला, संगीत, नाटके, लढाया इत्यादी मनोरंजन प्रकारांसाठी वापरले जात असे.

२००० वर्षे जुने कलोसियम नैसर्गिक झीज, भूकंप इत्यादी घटनांमुळे काही अंशी नष्ट झाले असले तरी आजही ते रोममधील सर्वांत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. २००७ साली प्रकाशित झालेल्या जगातील सात नव्या आश्चर्यांपैकी कलोसियम हे एक आहे.

संदर्भसंपादन करा

  1. ^ Rome-accom.com, The full history of the Colosseum
  2. ^ BBC.co.uk, BBC's History of the Colosseum p. 2.


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 41°53′24.61″N 12°29′32.17″E / 41.8901694°N 12.4922694°E / 41.8901694; 12.4922694