रोम (इटालियन: Roma) ही इटली देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. रोम शहरात अंदाजे २७ लाख तर महानगर परिसरात ३७ लाख लोकवस्ती आहे.[२]

रोम
Roma
इटली देशाची राजधानी

Collage Rome.jpg

Flag of Rome.svg
ध्वज
रोम is located in इटली
रोम
रोम
रोमचे इटलीमधील स्थान

गुणक: 41°54′N 12°30′E / 41.900°N 12.500°E / 41.900; 12.500

देश इटली ध्वज इटली
प्रांत लात्सियो
क्षेत्रफळ १,२८५ चौ. किमी (४९६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६६ फूट (२० मी)
लोकसंख्या  
  - शहर २७,४३,७९६ (डिसेंबर २००९)[१]
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.comune.roma.it/

इटलीच्या मध्य-पश्चिम भागात लात्सियो प्रांतामध्ये तिबेरऍनियेन नद्यांच्या संगमावर वसलेल्या रोम शहराला अतिप्राचीन इतिहास आहे. इ.स. पूर्व ८व्या शतकापासूनच्या लिखित इतिहासात रोमचा उल्लेख आहे. एका नोंदीनुसार रोमची स्थापना एप्रिल २१, इ.स.पूर्व ७५३ रोजी करण्यात आली होती. ऐतिहासिक रोमन साम्राज्याची राजधानी रोम येथेच होती.

दुसर्‍या शतकापासून पोपचे वास्तव्य रोम शहरामध्ये राहिले आहे. १९२९ साली स्थापन झालेला व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान देश पूर्णपणे रोम शहराच्या अंतर्गत आहे.[३]

रोम हे इटलीमधील सर्वांत लोकप्रिय, युरोपीय संघामधील ३ रे तर जगातील ११वे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.[४] युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांपैकी रोम हे एक आहे.[५]

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Demography in Figures". June 2010.
  2. ^ OECD. "OECD Territorial Reviews: Competitive Cities in the Global Economy" (PDF). p. 39. 2009-04-30 रोजी पाहिले.
  3. ^ "Aboutroma.com". 2010-02-03 रोजी पाहिले.
  4. ^ Bremner, Caroline. "Euromonitor International's Top City Destinations Ranking". 2 March 2010 रोजी पाहिले.
  5. ^ "Historic Centre of Rome, the Properties of the Holy See in that City Enjoying Extraterritorial Rights and San Paolo Fuori le Mura". UNESCO World Heritage Center. 2008-06-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

हे सुद्धा पहासंपादन करा