दक्षिण कोरियाEn-us-South Korea.ogg उच्चार हा पूर्व आशियामधील एक देश आहे. हा देश कोरियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या उत्तरेस उत्तर कोरिया हा देश तर पश्चिमेस पिवळा समुद्र, पूर्वेस जपानचा समुद्र व दक्षिणेस पूर्व चीन समुद्र हे प्रशांत महासागराचे उप-समुद्र आहेत. दक्षिण कोरियाचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख चौरस किमी तर लोकसंख्या ५ कोटी असून सोल हे राजधानीचे व सर्वात मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे.

दक्षिण कोरिया
대한민국
कोरियाचे प्रजासत्ताक
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Benefit broadly the human world
राष्ट्रगीत: "(애국가)
एगुक्गा
देशप्रेम गीत
दक्षिण कोरियाचे स्थान
दक्षिण कोरियाचे स्थान
दक्षिण कोरियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सोल
अधिकृत भाषा कोरियन
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख यून सुक येओल
 - पंतप्रधान हान डक-सू
महत्त्वपूर्ण घटना
 - राष्ट्रीय स्थापना दिवस ३ ऑक्टोबर, इ.स. पूर्व २३३३ 
 - स्वातंत्र्यघोषणा १ मार्च १९१९ 
 - अस्थायी सरकार १३ एप्रिल १९१९ 
 - मुक्तता १५ ऑगस्ट १९४५ 
 - संविधान १७ जुलै १९४८ 
 - सरकार स्थापना १५ ऑगस्ट १९४८ 
क्षेत्रफळ
 - एकूण १००,२१० किमी (१०९वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.३
लोकसंख्या
 - २०१२ ५,००,०४,४४१[] (२५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४९१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १५५६ अब्ज अमेरिकन डॉलर (१३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३१,७५३ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८९७[] (अति उच्च) (१५ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन दक्षिण कोरियन वोन
आंतरराष्ट्रीय कालविभाग कोरिया प्रमाणवेळ (यूटीसी + ९:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ KR
आंतरजाल प्रत्यय .kr
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ८२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

प्रागैतिहासिक काळापासून कोरियन द्वीपकल्पावर मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. इ.स. ६६८ मध्ये कोरियामधील तीन राजतंत्रे एकत्र झाली व गोरेओ व चोसून घराण्यांनी कोरियावर इ.स. १८९७ पर्यंत राज्य केले. १८९७ ते १९१० दरम्यान हा प्रदेश कोरियन साम्राज्य ह्या नावाने ओळखला जात असे. २२ ऑगस्ट १९१० रोजी जपानी साम्राज्य व कोरियन साम्राज्यांदरम्यान झालेल्या तहानुसार जपानने सर्व कोरियावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले. १९१० ते १९४५ सालांदरम्यान कोरियावर जपानची सत्ता होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान पराभूत झाल्यानंतर कोरिया उत्तर व दक्षिण भागांत विभागला गेला. उत्तर भागास सोव्हिएत संघाचा तर दक्षिण भागास अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचा पाठिंबा होता. सोव्हिएत व अमेरिकेमधील मतभेदांमुळे ह्या दोन भागांचे स्वतंत्र देशांमध्ये रूपांतर झाले व १९४८ साली लोकशाही सरकार असलेला स्वतंत्र दक्षिण कोरिया देश निर्माण झाला. १९५० साली उत्तर कोरियाने दक्षिणेवर आक्रमण केल्यानंतर झालेल्या युद्धाची परिणती कायमस्वरूपी फाळणीमध्ये झाली. त्यानंतरच्या काळात कधी लोकशाही तर कधी लष्करी राजवट असलेल्या दक्षिण कोरियाने लक्षणीय प्रगती केली व केवळ ३० वर्षांमध्ये दक्षिण कोरियाचे रूपांतर एका गरीब व अविकसित देशापासून जगामधील सर्वात श्रीमंत व विकसित देशांमध्ये झाले.

सध्या आशियामधील एक महासत्ता असलेल्या कोरियामध्ये कायमस्वरूपी लोकशाही सरकार असून तो आशियामधील चौथ्या तर जगातील १२व्या क्रमांकाचा श्रीमंत देश आहे. निर्यातीवर अवलंबुन असलेली येथील अर्थव्यवस्था मोटार वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, अवजड यंत्रे इत्यादींच्या उत्पादनामध्ये जगात आघाडीवर आहे. दक्षिण कोरिया संयुक्त राष्ट्रे, आर्थिक सहयोग व विकास संघटनाजागतिक व्यापार संघटना इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे. संयुक्त राष्ट्रांचे विद्यमान सरचिटणीस बान की-मून हे दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत.

इतिहास

संपादन

नावाची व्युत्पत्ती

संपादन

प्रागैतिहासिक कालखंड

संपादन

अर्वाचीन इतिहास

संपादन

भूगोल

संपादन

चतुःसीमा

संपादन

राजकीय विभाग

संपादन
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


दक्षिण कोरिया देश एक विशेष शहर, एक स्वायत्त विशेष शहर, सहा महानगरी शहरे, ८ प्रांत व एक स्वायत्त प्रांत अशा प्रशासकीय विभागांमध्ये वाटला गेला आहे.

कोड नाव हांगुल हांजा लोकसंख्या
विशेष शहर (특별시 特別市)
KR-11 सोल 서울 특별시 서울特別市 9,794,304
विशेष स्वायत्त शहर (특별자치도 特別自治道)
KR-?? सेजॉंग 세종 특별자치시 世宗特別自治市 122,263
महानगरी शहरे (광역시 廣域市)
KR-26 बुसान 부산 광역시 釜山廣域市 3,635,389
KR-27 दैगू 대구 광역시 大邱廣域市 2,512,604
KR-28 इंचॉन 인천 광역시 仁川廣域市 2,628,000
KR-29 ग्वांगजू 광주 광역시 光州廣域市 1,442,857
KR-30 देजॉन 대전 광역시 大田廣域市 1,456,308
KR-31 उल्सान 울산 광역시 蔚山廣域市 1,087,958
प्रांत (도 道)
KR-41 ग्यॉंगी प्रांत 경기도 京畿道 10,415,399
KR-42 गंगवान प्रांत 강원도 江原道 1,592,000
KR-43 उत्तर चुंगचॉंग प्रांत 충청북도 忠清北道 1,462,621
KR-44 दक्षिण चुंगचॉंग प्रांत 충청남도 忠清南道 1,840,410
KR-45 उत्तर जेओला प्रांत 전라북도 全羅北道 1,890,669
KR-46 दक्षिण जेओला प्रांत 전라남도 全羅南道 1,994,287
KR-47 उत्तर ग्यॉंगसांग प्रांत 경상북도 慶尙北道 2,775,890
KR-48 दक्षिण ग्यॉंगसांग प्रांत 경상남도 慶尙南道 2,970,929
स्वायत्त प्रांत (특별자치도 特別自治道)
KR-49 जेजू 제주 특별자치도 濟州特別自治道 560,000

मोठी शहरे

संपादन
क्रमांक शहर हांगुल हांजा लोकसंख्या
(२०१०)
लोकसंख्या
(२००५)
लोकसंख्या
(२०००)
1 सोल 서울특별시 서울(首爾)特別市 9,794,304 10,183,705 9,853,972
2 बुसान 부산광역시 釜山廣域市 3,604,950 3,655,349 3,655,437
3 इंचॉन 인천광역시 仁川廣域市 2,637,652 2,590,863 2,466,338
4 दैगू 대구광역시 大邱廣域市 2,532,077 2,520,679 2,473,990
5 देजॉन 대전광역시 大田廣域市 1,495,453 1,451,792 1,365,961
6 ग्वांगजू 광주광역시 光州廣域市 1,469,293 1,402,446 1,350,948
7 उल्सान 울산광역시 蔚山廣域市 1,081,985 1,084,882 1,012,110
8 सुवान 수원시 水原市 1,064,951 1,034,735 944,239
9 चांगवान 창원시 昌原市 1,062,731 504,118 515,619
10 सेओंग्नम 성남시 城南市 951,424 984,260 912,222

समाजव्यवस्था

संपादन

वस्तीविभागणी

संपादन

दक्षिण कोरियामधील वस्ती दाट आहे. येथे प्रतिवर्गकिलोमीटर ४८७ व्यक्ती राहतात. जगाच्या वस्तीदाटीपेक्षा ही संख्या दहापट आहे. १९७०-२००० सालांमध्ये देशातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये स्थलांतर झाले.[]

शिक्षण

संपादन

संस्कृती

संपादन

राजकारण

संपादन

१९ डिसेंबर इ.स. २०१२ रोजी झालेल्या १८ व्या अध्यक्षीय निवडणूकीमध्ये पार्क-ज्यून-हे (Park Geun-hye) ह्या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष निवडून आल्या.

अर्थतंत्र

संपादन

ताईक्वोंदो ह्या ऑलिंपिक खेळाचा उगम दक्षिण कोरियामध्येच झाला. फुटबॉलबेसबॉल हे देखील येथील लोकप्रिय खेळ आहेत. दक्षिण कोरियाने आजवर अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. राजधानी सोल हे १९८६ आशियाई खेळ१९८८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते तर २००२ आशियाई खेळ बुसानमध्ये भरवले गेले. जपानसोबत दक्षिण कोरियाने २००२ फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते. आशिया खंडामध्ये फुटबॉल विश्वचषक खेळवला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. भविष्यात २०१४ आशियाई खेळ दक्षिण कोरियामधील इंचॉन येथे तर २०१८ हिवाळी ऑलिंपिक प्यॉंगचॅंग येथे भरवले जातील.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Korea's Population: 50 million". National Statistics Office. 2012. August 8, 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Human Development Report" (PDF). United Nations. 2011. November 5, 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "दक्षिण कोरिया". सीआयए कंट्री स्टडीझ (इंग्लिश भाषेत). २००६-०४-२२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: