मार्च १
दिनांक
(१ मार्च या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | मार्च २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५९ वा किंवा लीप वर्षात ६० वा दिवस असतो.
ठळक घटना
संपादनइ.स.पू. पहिले शतक
संपादन- ८६ - लुसियस कोर्नेलियस सुलाच्या नेतृत्वाखाली रोमन सैन्य अथेन्समध्ये घुसले व तेथील राज्यकर्ता ऍरिस्टियोनला पदच्युत केले.
सोळावे शतक
संपादन- १५६२ - फ्रांसमधील वासी शहरात कॅथोलिक जमावाने १,००हून अधिक हुगेनो व्यक्तिंना मारले.
- १५६५ - ब्राझिलमध्ये रियो दि जानेरो शहराची स्थापना.
सतरावे शतक
संपादन- १६४० - ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मद्रासमध्ये व्यापारी ठाणे उघडले.
एकोणिसावे शतक
संपादन- १८०३ - ओहायो अमेरिकेचे १७वे राज्य झाले.
- १८१५ - एल्बाहून सुटका करून घेउन नेपोलियन बोनापार्ट फ्रांसला परतला.
- १८४० - ऍडोल्फ थियेर्स फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १८६७ - नेब्रास्का अमेरिकेचे ३७वे राज्य झाले.
- १८६९ - रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी जगदहितेच्छु नावाचे पत्र सुरू केले शिवरामपंत परांजपे यांचे काळपत्र सुरुवातीला जगदहितेच्छूच्या छापखान्यात छापले जायचे.
- १८७२ - यलोस्टोन नॅशनल पार्क जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान झाले.
- १८७३ - ई. रेमिंग्टन अँड सन्सनी पहिले टंकलेखन यंत्र विकण्यास सुरुवात केली.
- १८९६ - अडोवाची लढाई - इथियोपियाच्या सैन्याने इटलीला हरवले.
- १८९६ - आंत्वान हेन्री बेकरेलने किरणोत्सर्गाचा शोध लावला.
विसावे शतक
संपादन- १९०७ - टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना झाली.
- १९१२ - आल्बर्ट बेरी हा विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारणारा सर्वप्रथम व्यक्ति ठरला.
- १९१८ - जर्मन पाणबुडीने रॅथलिन बेटाजवळ इंग्लंडचे एच.एस.एस. कॅल्गारियन हे जहाज बुडवले.
- १९३२ - चार्ल्स लिंडबर्गचा मुलगा चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग तिसरा याचे अपहरण झाले.
- १९३६ - हूवर धरणाचे बांधकाम समाप्त.
- १९४१ - बल्गेरियाने जर्मनी व इटलीशी संधी केली.
- १९४६ - बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण.
- १९४७ - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कामकाजास सुरुवात झाली
- १९४८ - गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- १९४९ - इंडोनेशियाने जावा बेटावरील योग्यकर्ता प्रांत बळकावला.
- १९५३ - जोसेफ स्टालिनला पक्षाघाताचा झटका.
- १९५४ - अमेरिकेने बिकिनी बेटावर अणूबॉम्बचा स्फोट घडवला. आसपासच्या भागात प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्ग फैलावले.
- १९६१ - अमेरिकेत शांति दलाची स्थापना.
- १९६२ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १ हे विमान न्यू यॉर्कजवळ कोसळले.
- १९६९ - नवी दिल्ली व कलकत्त्यामध्ये धावणारी पहिली राजधानी एक्सप्रेस ही अतिजलद रेल्वेगाडी सुरू झाली
- १९७१ - पाकिस्तानच्या अध्यक्ष याह्या खानने नॅशनल असेम्ब्ली(संसद)ची बैठक अनिश्चित काळासाठी तहकूब केली.
- १९७८ - स्वित्झर्लंडमधील चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
- १९९८ - जगभरात एकूण १ अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला.
- १९९९ - १३३ देशांनी भूसुरूंगावर बंदी घालणारा करार केला.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - भारत हा एक अब्ज पेक्षा अधिक लोकसंख्या असलेला चीनमागोमाग दुसरा देश झाला..
- २००२ - स्पेनने पेसेटा हे चलन सोडून देऊन यूरो हे चलन स्वीकारले.
- २००४ - मोहम्मद बह्र अल-उलुम इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- २००६ - ताऱ्या हेलोनेन फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षपदी.
जन्म
संपादन- १८१० - फ्रेडरिक चॉपिन, पोलिश संगीतकार.
- १८८८ - इवार्ट ऍस्टील, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१० - डेव्हिड निवेन, इंग्लिश अभिनेता.
- १९१४ - भानुदास श्रीधर परांजपे, मराठी कथाकार, समीक्षक.
- १९१७ - करतार सिंह दुग्गल, पंजाबी, हिंदी आणि उर्दू साहित्यिक.
- १९१८ - होआव गुलार्ट, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२२ - यित्झाक राबिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
- १९३० - कोइंबताराव गोपीनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३० - राम प्रसाद गोएंका, भारतीय उद्योजक.
- १९४२ - रिचर्ड मायर्स, अमेरिकन सेनापती.
- १९४४ - बुद्धदेव भट्टाचार्य, पश्चिम बंगालचे ७वे मुख्यमंत्री.
- १९५० - शहीद इस्रार, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - नितीश कुमार, केंद्रीय रेल्वेमंत्री व बिहारचे २२वे मुख्यमंत्री.
- १९५३ - बंदुला वर्णपुरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - वेन बी. फिलिप्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - सज्जाद अकबर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - अर्चना जोगळेकर, मराठी अभिनेत्री.
- १९६८ - कुंजारानी देवी, भारतीय महिला भारोत्तोलक.
- १९६८ - सलिल अंकोला, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - संजीवा वीरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - आझम खान , पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - झहूर इलाही, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - अनिसुर रहमान, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १९८० - शहीद आफ्रिदी, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - तिलन तुषारा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८३ - मेरी कोम, भारतीय मुष्टियोद्धा.
मृत्यू
संपादन- ११३१ - स्टीवन दुसरा, हंगेरीचा राजा.
- १७९२ - लिओपोल्ड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १९५५ - नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती, महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक.
- १९८८ - सोहन लाल द्विवेदी, हिंदी कवी.
- १९८९ - वसंतदादा पाटील, महाराष्ट्राचे ५वे आणि ९वे मुख्यमंत्री.
- १९९१ - एडविन लॅंड, अमेरिकन संशोधक.
- १९९४ - मनमोहन देसाई, हिंदी चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक.
- १९९९ - दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर, वेदविद्येचे आणि संस्कृतचे अभ्यासक, वेदांती पंडित.
- २००३ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका.
- २०१४ - प्रफुल्ला डहाणूकर, मराठी चित्रकार.
- २०१७ - तारक मेहता, गुजराती लेखक.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- स्वांतत्र्य आंदोलन दिन - दक्षिण कोरिया.
- जागतिक संरक्षण दिन
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर मार्च १ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २९ - मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - (मार्च महिना)