प्रा. दादासाहेब मारकड

प्रा.दादासाहेब मारकड ( जन्म 15 मे 1978, जन्मस्थान - विहाळ, ता. करमाळा) हे हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर येथे भूगोल या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे बी.ए.ही पदवी प्राप्त केली असून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे एम. ए. ही पदवी प्राप्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी मराठी विषयामध्ये विशेष प्राविण्यासह एम. ए. ही पदवी प्राप्त केली आहे.ते सध्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे पीएचडी करत आहेत.

प्रा दादासाहेब मारकड हे मराठी साहित्यिक आणि साहित्याचे अभ्यासक आहेत.   ओवीबद्ध वाङ्मय हे त्यांचे आवडीचे साहित्यक्षेत्र आहे. तसेच ते संतसाहित्य आणि लोकसाहित्याचेही अभ्यासक आहेत . त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनावर ओवीबद्ध महाकाव्ये लिहिली आहेत. त्यांच्या ओवीबद्ध वाङ्मयाचे महाराष्ट्रात गावोगावी श्रद्धेने वाचन व निरुपण केले जाते.

प्रा. मारकड यांची प्रकाशित पुस्तके - [१]

१. शिवायन - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महाकाव्य

२. पद्मावती - लोककथासंग्रह

३. मानवी साधनसंपत्ती भूगोल

४.पर्यटन भूगोल

अप्रकाशित साहित्य-

१. ज्ञानविजय

२. शंभूपर्व

३ .श्रीमद्भागवत

४. आनंद संप्रदाय आणि संतसाहित्य

५. माझी शाळा

६. मराठी बोलींचा शब्दकोश

उपवर्ग

एकूण ३३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३३ उपवर्ग आहेत.

"मराठी लेखक" वर्गातील लेख

एकूण १,०८३ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.

(मागील पान) (पुढील पान)

(मागील पान) (पुढील पान)