वसंतराव बलवंत अरगडे (जन्म : पंढरपूर, १८ सप्टेंबर, इ.स. १९१६) हे पुणे जिल्हा परिषदेचे एक मराठी उपशिक्षणाधिकारी होते. १९७४ साली नोकरीवरून निवृत्त झाल्यावरही त्यांनी शाइक्षणिक आणि धार्मिक पुस्तके लिहिण्याचा उपक्रम चालू ठेवला.

व.ब. अरगडे यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • उद्याची शाळा
  • करुणाष्टके (इंग्रजी अनुवाद, मूळ मराठी कवी - रामदास)
  • कोण गरीब आहे?
  • तरंग (लघुनिबंधसंग्रह)
  • दासबोध (इंग्रजी अनुवाद, मूळ मराठी कवी - रामदास)
  • दिवळ्याची दिवाळी
  • श्रीनृसिंहकोश (तीन खंड, लेखन आणि प्रकाशन)
  • पांडुरंग पावला
  • भूमाता की जय
  • मनाचे श्लोक (इंग्रजी अनुवाद, मूळ मराठी कवी - रामदास)
  • मराठी व्याकरण
  • शैक्षणिक मूल्यमापनाची रूपरेषा
  • श्रीक्षेत्रराज नीरा-नरसिंहपूर.

सन्मान

संपादन
  • वसंतराव अरगडे यांचा त्यांच्या वयाच्या १००व्या वर्षी पुण्याच्या शारदा ज्ञानपीठम्‌‍ने ऋषितुल्य व्यक्ती म्हणून सन्मान केला.