संदीप काळे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
संदीप काळे (ऑगस्ट १५, इ.स. १९८२ - हयात) हे सकाळ [१] एक लेखक आणि कवी आहेत. [२] संपादकही आहेत.
संदीप काळे | |
---|---|
जन्म |
ऑगस्ट १५, इ.स. १९८२ हिंगोली, महाराष्ट्र |
निवासस्थान | मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | एम.ए. एम.सी.जे, एम.बी.ए., डी.एन.वाय.एस. |
प्रशिक्षणसंस्था | मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र |
पेशा | पत्रकारिता |
कारकिर्दीचा काळ | इ.स. २००० पासून |
मूळ गाव | पाटनूर ता. अर्धापूर, जि. नांदेड |
ख्याती | मराठी लेखक आणि कवी |
वडील | रामराव काळे |
आई | कमलबाई काळे |
पुरस्कार | आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार 2021 |
संकेतस्थळ http://sandipkale.in/ |
अशी झाली सुरुवात
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात सांडस या गावी संदीप काळे यांचा जन्म झाला.[ संदर्भ हवा ] घरातील आध्यात्मिक संस्कारांमध्ये आणि वातावरणात संदीप काळे लहानाचे मोठे झाले. याच घरात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले फ.मु.शिंदे हे सुद्धा लहानाचे मोठे झाले.[ संदर्भ हवा ] पोथी वाचन तिचा अर्थ सांगण रामायण, महाभारत, नवनाथ, भगवद्गीता , असे सगळे पुराण कथेच्या स्वरूपात उतरवण हे संदीप काळे यांनी लहानपणीच शिकवून घेतलं होतं.[ संदर्भ हवा ]
पाटनूर गावात आप्पाराव आणि कमलाबाई याच्या पोटी काळे यांचा जन्म (दिनांक??) रोजी झाला. संदीप यांना परमेश्वर रामराव काळे हा लहाना भाऊ आणि शारदा रामराव काळे-वरवंटकर ही बहिण आहे. घरात शेतकरी वातावरण असल्यामुळे आपसूचक संदीप काळे यांच्यामध्ये शेतीसंदर्भातले संस्कार रूजत गेले. एकनामी, भारूड, रामायण अशा सगळ्या प्रकारचा भजनाचा ग्रुप त्यांच्या घरामधनं चालायचा. त्यामुळे संगीत आणि गाण्याचा प्रभावही संदीप काळेंवर दिसून येतो.[ संदर्भ हवा ]
शालेय शिक्षण
संपादनपहिलीपासून ते सहावीपर्यंत संदीप काळे यांच शिक्षण पाटनूर या गावी झाल आहे. संदीप काळे यांच सातवी ते दहावी पर्यंतच शिक्षण पाटनूरपासून सहा किलोमीटर अंतर असलेल्या चेनापूर येथील भास्कर आदिवासी आश्रम शाळा येथे येथे झालं.[ संदर्भ हवा ] अकरावी आणि बारावी हे दोन वर्ष नांदेड जिल्ह्यातील उमरी या तालूका असलेल्या ठिकाणी नूतन विद्यालयामध्ये झालं.[ संदर्भ हवा ]
नांदेडमध्ये वजिराबादला प्रतिभा निकेतन महाविद्यालायमध्ये संदीप काळे यांनी बी. ए. प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला. दरवर्षी राष्ट्रीय सेवायोजनाचे कॅम्प, एनसीसीचे कॅम्प, बाहेर जायचे त्या कॅम्पच नियोजन संदीप काळे करायचे. त्यातूनच त्यांच्यामधला संघटक निर्माण झाला. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवातही याच महाविद्यालायतून झाली. प्रतिभा निकेतन महाविद्यालयाच्या प्रेरणा या वार्षिक अंकाचे तिन्ही वर्ष आपल्या विभागाचे ते संपादक राहिलेले आहेत. कॉलेजमधल्या कार्यक्रमाच्या बातम्या तयार करणे. कॉलेजमधले वेगवेगळ्या उपक्रमाचे अहवाल तयार करणे यातूनच त्यांच्यामधले लिखाणाचे अंग विकसीत होत गेले.[ संदर्भ हवा ] ह्याच महाविद्यालयाचे युवा मंच प्रतिनिधी म्हणून संदीप काळे पहिल्यांदा लोकमत समुहाच्या माध्यमसमुहाचे घटक बनले.
नांदेड्च्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात त्यांनी विद्यापीठाअंतर्गत पदवीच शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्चशिक्षणासाठी औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद वृत्तपत्र विद्याविभागामध्ये एम.ए.एम.सीजे साठी प्रवेश घेतला.[ संदर्भ हवा ] कमवा, शिका योजनेत काम करत करत संदीप काळे यांनी पत्रकारितेची मास्टर डिग्री या विद्यापीठात पूर्ण केली. काळे हे कमवा शिकवामध्ये काम करायचे आणि विद्यापीठाच्या वसतीगृहात राहायचे.[ संदर्भ हवा ] त्यानंतर एमबीए ही व्यवस्थापनाची पदवी, डीएनवायएस ही आरोग्य विषयाशी पदवी संदीप काळे यांनी संपादीत केली. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पाच वर्ष शेतक-यांच्या आत्महत्या संशोधन केले.[ संदर्भ हवा ]
संघटना चळवळ
संपादनप्रतिभा निकेतन महाविद्यालयात असताना संदीप काळे यांना घेऊन प्रा.राजाराम वट्टमवार अनेक वेळा बाबा आमटेंच्या श्रमसंस्कार छावणी शिबीरात गेले होते.[ संदर्भ हवा ] माधवी फुके यासारखी दिग्गज मंडळी संदीप काळे यांना या शिबिरात भेटली. राष्ट्रसेवा दल, सर्वेदय अशा वेगवेगळ्या सेवाभावी आणि समाजवादी विचारसरणीशी संबंधित असलेल्या अनेक उपक्रमांमध्ये वट्टंमवार सर यांच्या समवेत संदीप काळे यांनी हिरारीने सहभाग नोंदवला होता. पुढे अंनिस, राष्ट्रसेवादल, छात्रभारती, सर्वोदय अशा वेगवेगळ्या संघटनांमधून संदीप काळे राज्याचे नेतृत्व करत होते. वेगवेगळे पद यादरम्यान या संघटनांमध्ये भूषवली.[ संदर्भ हवा ] औरंगाबादमध्ये असताना विद्यापीठात एसएफआय या संघटनेमध्ये त्यांचा सहभाग असायचा. त्यांनी या संघटनेत सक्रियपणे कामही केले. या सगळ्या चळवळीमध्ये संघटनेमध्ये काम करत असताना पूर्ववेळ कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी त्यांच्या वाट्याला आली. चळवळी आणि संघटनामध्ये काम करत असताना त्यांनी पत्रकारीता कधीही सोडली नाही. एकीकडे पत्रकारिता आणि दुसरीकडे चळवळ आणि संघटना यामुळे त्यांचा जनसंपर्क खूप वाढत गेला.[ संदर्भ हवा ]
अशा भेटल्या अनेक व्यक्ती
संपादनप्रा. राजाराम वट्टमवार सर यांच्या माध्यमातून सेवाभावी, पुरी सरांच्या माध्यमातून जनसंपर्क आणि पत्रकारितेचे धडे आणि विद्याभाऊ सदावर्ते यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पत्रकारिता कशी करायची याचे धडे संदीप काळे यांना मिळत होते.[ संदर्भ हवा ] बाबा आमटेंच्या सोमनाथ संस्कार छावणीमधून संदीप काळे यांच्यामधल्या कार्यकर्त्या मुहूर्तमेढ रोवल्या गेली. बाबा आमटेंना सतत चार वर्ष किमान दर वर्षी पंधरा दिवस सकाळी सकाळी फिरवणे, त्यांच्या मुलाखती घेणे, बाबा आमटे यांच्याकडून व्यक्तीक रित्या सतत काही तरी शिकण्याच भाग्य संदीप काळे यांना मिळालं.[ संदर्भ हवा ] माधव बावगे, सोमनाथ रोडे, दगडू लोमटे, अशोक बेलखोडे, साधनाताई आमटे, विकास आमटे, प्रकाश आमटे, माधवी फुके अशी अनेक माणसं या श्रमसंस्कार छावणीमुळे कुटुंबासह जोडता आली. राष्ट्रसेवादलामध्ये काम करत असताना, निळू फूले, श्रीराम लागू, भाई वैद्य, पन्नालाल सुराणा, अशा अनेक मंडळींचा प्रत्यक्ष सहवास लाभला. संदीप काळेंच्या नांदेडच्या घरी अनेक मंडळी मुक्कामी उतरायचे. त्यामध्ये गोविंदराव पानसरे, नरेंद्र दाभोलकर ही नावे आघाडीवर आहेत.[ संदर्भ हवा ] अण्णा हजारेंनी आंदोलनाचं रणशिंग फुकलं ते नांदेडमधून. या आंदोलनाची पहिली बैठक नांदेडमध्ये झाली ती संदीप काळेंच्या घरी.[ संदर्भ हवा ] किरण बेदी, अरविंद केजरीवाल या सारखी मंडळी बैठकीला आवर्जुन उपस्थित होती. संदीप काळे यांचे मामा, लेखक कवी, फ.मु.शिंदे यांनी संदीप काळे यांना पत्रकारितेची लस तुम्ही द्यावी असं पत्र विद्याभाऊंना दिलं होतं. विद्याभाऊ पूर्वी लोकमतमध्ये संपादक होते. सेवानिवृत्तीनंतर ते सांजवार्तामध्ये काम पाहात होते. विद्याभाऊंनी आपल्या लिखानाची सर्व कवच कुंडली संदीप काळे यांना दिली.[ संदर्भ हवा ] विद्याविलास पाठक यांची भेट याच सांजवार्तामध्ये झाली. पुढे पत्रकारितेमध्ये संजय वरकड, मंदार फणसे, विनोद राऊत यासारखी दिग्गज माणसं मराठवाड्यात काम करत असताना मिळत गेली. मु.पोस्ट आई या पुस्तकाच्या निमित्ताने शरद पवार यांची जवळीक झाली आणि एक वेगळ नातं निर्माण झालं.[ संदर्भ हवा ] आपल्या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये सचिन तेंडूलकर, अमिताभ बचन पासून ते शाहरूखखान पर्यंत अटलबिहारी वाचपेयी पासून ते शरद पवार यांच्यापर्यंत त्यांनी सर्वांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत.[ संदर्भ हवा ]
काम केलेले माध्यमसमूह
संपादनसंदीप काळे यांच्या लिखानाची सुरुवात प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या प्रेरणा या वार्षिक विशेषंकापासून झाली. या अंकामध्ये ‘गरिबीवर इलाज नाही’. असा संदीप काळे यांचा पहिला लेख प्रसिद्ध झाला होता. त्याच प्रतिभा निकेतन महाविद्यालयात असताना लोकमतचे युवामंच प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली.[ संदर्भ हवा ] आणि महाविद्यालयाचं वार्तांकन लोकमतमधून करु लागले. प्रतिभा निकेतन महाविद्यालायमध्ये महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार असलेले प्राध्यापक सु.मा.कुलकर्णी शिकवणीचं काम करायचे. त्यांनी मुल्यशिक्षणाला वाहिलेले साप्ताहिक श्रीमंत दर्शन असे एक साप्ताहिक चालविले होते. पुढे त्या साप्ताहिकामध्ये संदीप काळे सातत्याने लिहू लागले.[ संदर्भ हवा ] बाबा आमटे यांची पहिली मुलाखत त्यांनी याच साप्ताहिकात घेतली.[ संदर्भ हवा ] ज्या भागात ते राहत होते त्या भागामधल्या अर्धापूर तालुक्यासाठी त्यांनी दैनिक लोकमतचे प्रतिनिधी म्हणूनही कामं केले आहे. श्रीमंत दर्शनला त्यांनी सहसंपादक म्हणून काम केलं. विद्यापीठात शिकत असताना शिवाजी बनकर पाटील यांच्या लोकाश्रय नावाच्या साप्ताहिकात कार्यकारी संपादक म्हणून काम केलं. लोकाश्रयचा दिवाळी अंक आणि याच लोकाश्रय अंकामध्ये अनेक वर्ष चाललेलं वास्तव नावाच सदर खूप चर्चेचा विषय असायचा. ‘सॅंडी पाटील’ नावाच एक गजलशी संबंधीत असलेलं सदर याच लोकाश्रय साप्ताहिकामध्ये संदीप काळे चालवायचे.[ संदर्भ हवा ] विद्याभाऊ सदावर्ते यांच्याशी ओळख झाल्यानंतर संदीप काळे सांजवार्तामध्ये नव्याने कामाला लागले. जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, महापालिका, क्राईम अशा वेगवेगळ्या विभागात त्यांना काम करण्याची संधी मिळाली.[ संदर्भ हवा ] त्या दरम्यान त्यांनी स्वतःच मराठवाडा आवाज नावाचा साप्ताहिकही सुरू केलं होतं, पण ते साप्ताहिक पुढे सतत निघाले नाही. दैनिक शासन सम्राटमध्ये वृत्तसंपादक, विजय युवकचे संपादक अशा अनेक दैनिक, साप्ताहिक, मासिकात काम सुरू होतं.[ संदर्भ हवा ] संजय वरकड यांची भेट झाल्यावर त्यांनी औरंगाबादहून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये नांदेडला काम करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. नांदेडला तेव्हाच्या आयबीएन लोकमतला प्रतिनिधी म्हणून काम करत होते. नांदेडला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असताना त्यांनी अंकुशराव कदम यांच्या सांगण्यावरून दैनिक लोकपत्रमध्ये नांदेडचे संपादक म्हणून कामाची सुरुवात केली. त्याच लोकपत्रने पुढे नांदेडमधून सायंदैनिक लोकपत्र सुरू केले. त्याचे संपादक म्हणून संदीप काळे यांनी काम पाहिले.[ संदर्भ हवा ] पुढे उद्याचा मराठवाडा या दैनिकात वृत्तसंपादक म्हणून काम केले. ही सगळी काम सुरू असताना महाराष्ट्र पातळीवरील काही दैनिकांमध्ये, पोर्टलमध्ये संदीप काळे काम करत होते. प्रहारमध्ये मराठवाड्याचे प्रतिनिधी म्हणून काम करायचे. त्याशिवाय मंदार फणसे यांनी सुरू केलेल्या भारत फॉर इंडिया पोर्टलचे मराठवाड्याचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. अनिल फळे यांचे अप्रतिम मीडियाचे काम पाहायचे.[ संदर्भ हवा ] त्यानंतर नांदेडमध्येच हे करत असताना अनेक ठिकाणी त्यांनी जर्नलिझमचे प्राध्यापक म्हणून भूमिका बजावली आहे. लातूरला मंदार फणसे, रविंद्र आंबेकर, तुळशीदास भुईटे, विनोद राऊत यांच्या आग्रहास्तव जय महाराष्ट्र न्यूझ चॅनलला मराठवाड्याचे ब्यूरो चीफ म्हणून संदीप काळे लातूरला रुजू झाले.[ संदर्भ हवा ] नांदेडला असताना देश, राज्य आणि जिल्हापातळीवरील पंचावन पेक्षा अधिक पुरस्कार संदीप काळे यांना मिळालेले आहे.[ संदर्भ हवा ] जय महाराष्ट्रामधून संदीप काळे यांची एन्ट्री सकाळ मीडिया ग्रुपमध्ये झाली. सकाळमध्ये जाॅईन झाल्यावर युवकांच संघटन उभ करणे. आणि पत्रकारिता करणे असे दोन्ही आवडीचे काम संदीप काळे यांना मिळाले. यंग इन्परेटर नेटवर्क नावाचा आगळा वेगळा प्रोजेक्ट अभिजीत पवार सर यांच्या संकल्पनेतून संदीप काळे यांनी सुरू केला. सुरुवातीला दहा कॉलेजमध्ये असलेलं नेटवर्क चार हजार कॉलेजमध्ये जाऊन पोहोचलं.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोप-यात जाऊन संदीप काळे भाषण देऊ लागले. याच यिनच्या निवडणुका झाल्या आणि मंत्रिमंडळही. सकाळ मीडियाग्रुपमध्ये संदीप काळे युवकांच्या यीनचं ते काम पाहातात. सकाळचेही ते संपादक आहेत आणि यिनबझ नावाच्या पोर्टलचेही संपादक आहेत. आठ वर्षाच्या सकाळच्या कालावधीमध्ये त्यांनी साम टिव्हीचंही काम पाहिलं आहे. मुंबईमधल्या चारशे कॉलेजमध्ये जाऊन सलग एक वर्ष जाऊन शो केलेले आहेत. एक उत्कृष्ट एंकर म्हणून त्यांच्यावर शिक्का बसलेला आहे.[ संदर्भ हवा ]
कार्य
संपादनपत्रकारितेची पदवी मिळवल्यानंतर ‘लोकमत’ ‘सांजवार्ता’, ‘प्रहार, ‘आयबीएन लोकमत’[३], ‘उद्याचा मराठवाडा’[४] अशा वेगवेगळ्या दैनिकांत आणि न्यूझ चॅनलमध्ये त्यांनी काम केले आहे.[५] ‘नेटवर्क 18’ सारख्या भारतातील प्रसिद्ध माध्यम समूहांमध्ये त्यांनी काम केलेले आहे. नांदेड येथील विवेकानंद महाविद्यालयात पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपले योगदान दिलेले आहे. जय महाराष्ट्र या प्रसिद्ध मराठी न्यूझ चॅनेल साठी मराठवाडा संपादक म्हणून काम पहिल्या नंतर २०१३ पासून सकाळ माध्यम समूहात ते संपादक आहेत.[६] तसेच याच सकाळ माध्यम समूहाच्या द्वारे चालवण्यात येणाऱ्या यिन या चळवळीची सुरुवात त्यांनी केली. यिनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सर्व महाविद्यालयात निवडणूका आणि त्या माध्यमातून यिन मंत्री मंडळाची नेमणूक करण्यात येते. तसेच या मंत्री मंडळाच्या माध्यमातून राज्यात शिक्षण आणि विकास या क्षेत्रात विविध कार्यक्रम पार पडले जातात. यात, फूटपाथ स्कुल, मॉडेल व्हिलेज, निसर्ग संवर्धन, व्यक्तीमत्व विकास अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.[७] यिनचे जाळे राज्यातल्या सर्व महाविद्यालयात पसरले आहे. यिनमध्ये आज काम करणाऱ्या युवकांची संख्या २५ लाखांच्या घरात आहे. या शिवाय राज्यातील अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.[८]
वेगवेगळ्या देशाचा अभ्यास करण्यासाठी संदीप काळे यांनी परदेशात दौरे केले. या दौ-यात त्यांनी त्या त्या देशातील अर्थव्यवस्था, शिक्षण, राजकारण, पत्रकारिता, समाजकारण यावरचा अभ्यास केला आहे. हा अभ्यास करताना त्यांनी आपल्या देशात उपयोग कसा होईल याचीही आखणी केली होती. अभ्यास दौरा केलेल्यांमध्ये अमेरीका, साऊथ कोरीया, ब्राझील, मलेशिया, चीन या देशांचा समावेश आहे. [ संदर्भ हवा ]
संशोधन
संपादनशेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे आणि उपाय यावर संदीप काळे यांनी संशोधन केले. .[९][१०] या प्रश्नावर त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब ते देशाचे कृषी मंत्री इथपर्यंत अनेकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. यामध्ये शरद पवार, अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, प्रकाश पोहरे, गंगाप्रसाद अग्रवाल, विकास आमटे आदींचा समावेश आहे.[ संदर्भ हवा ] राज्यातील युवकांच्या नेतृत्व गुणांचा विकास, त्यांचा उच्च शिक्षणाच्या प्रवाहातील समावेश, स्त्रीशिक्षण अशा अनेक विषयांवर संशोधन करून त्या संशोधनाची त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून अंमलबाजवणी केली.[ संदर्भ हवा ]
मुक्त लेखन केलेले दैनिक[ संदर्भ हवा ]
संपादन- प्रजावाणी
- गोदातीर
- सामिक्षा
- सामना
- पुण्यनगरी
- गावकरी
- नवशक्ती
- महाराष्ट्र टाईम्स
इलेक्ट्रॉनिक माध्यम [ संदर्भ हवा ]
संपादन- आयबीएन लोकमत टिव्ही चॅनल
- जय महाराष्ट्र
- साम टिव्ही
वेब पोर्टल [ संदर्भ हवा ]
संपादन- आयबीएन लोकमत
- भारत फॉर इंडिया
- अप्रतिम न्यूझ मीडिया
- जय महाराष्ट्र
- प्रहार
- सकाळ
- अग्रोवन
- यिनबझ
सकाळमध्ये केलेले प्रोजेक्ट
संपादनपाण्यासाठी लॅब
संपादनडिसेंबर 2013 मध्ये सकाळ माध्यम समुहात संदीप काळे रुजू झाले. सकाळने मुंबई विद्यापीठामध्ये पाण्यासाठी लॅब सुरू केली होती. त्या लॅबचा प्रोजेक्ट संदीप काळे यांनी हाताळला.[ संदर्भ हवा ] राज्याचा पाणि प्रश्न कसा सुटला जाऊ शकतो. वेगवेगळ्या देशांनी पाण्यासाठी काय खबरदारी घेतली आहे. सिंचन, पाण्याचा प्रश्न,पाणी वाढीवसाठी उपाययोजना, त्यासाठी जगभरातून अनेक तज्ञ या लॅबमध्ये सहभागी झाले होते. पुढे याच लॅबच्या माध्यमातून जलसंधारण, पुर्नभरण यासारखे अनेक प्रोजेक्ट सरकाने राज्यभर राबविले.[ संदर्भ हवा ]
यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क
संपादनत्यानंतर यंग इन्प्रेटर नेटवर्क हा तरुणाईसाठी असलेला प्रोजेक्ट त्यांनी सुरू केला. युवकांचं संघटन उभ करून त्या कामाला गती दिली. दोन वर्षात वीस लाखाहून अधिक तरुणांच संघटन महाराष्ट्रात उभं केलं.[ संदर्भ हवा ] तरुणांच संघटन करणं त्यांच्या माध्यमातून सेवाभावी प्रोजेक्ट राबविणं, बाबा आमटेंच्या श्रमसंस्कार शिबिराप्रमाणे राज्यभरात यीनची अनेक शिबीर विभागीय जिल्हापातळीवर नेण्याचं काम संदीप काळे यांनी केलं. आम्ही घडवू देशासाठी या टायटलसाठी ही शिबीर पार पडली.[ संदर्भ हवा ]
महान राष्ट्र नेटवर्क
संपादनएमआरएन या प्रोजेक्टच्या माध्यमातून संदीप काळे यांनी राज्यातील काम करणारा आणि कामाबरोबर आपल्या हक्कासाठी लढणारा शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, याचा एक मोठा गट स्थापन केला. त्या गटाच्या माध्यमातून त्या त्या भागातील समस्या सोडवण्याचं काम सातत्याने होत गेलं. त्यातून दीड लाख व्यक्ती एका झेंड्या खाली येऊन काम करत होत्या.[ संदर्भ हवा ]
साम टिव्ही शो
संपादनराज्यभरातल्या युवकांना वेगवेगळ्या विषयावर काय वाटतं. या भावनेतून साम टिव्हीने आवाज तरुणाईचा या नावाखाली एका शोचं आयोजन केलं होतं. त्या शोचे निर्माता आणि एंकर म्हणून संदीप काळे यांनी काम पाहिलं. तब्बल दीड वर्ष चारशे शो सामच्या माध्यमातून करण्यात आले.[ संदर्भ हवा ]
यिनबझ
संपादनतरुणांनी लिहतं व्हावं. त्यांच्या भावना छानपणे मांडाव्यात या उद्देशाने सकाळ माध्यम समूहाने यिनबझ नावाचं वेब पोर्टल सुरू झालं. त्याचे संपादक म्हणून संदीप काळे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली.[ संदर्भ हवा ] एका वर्षभरात एक करोड तरुणाई या यिनबझच्या झेंड्याखाली एकत्रित येऊन व्यक्त होत आहे. चारशेहून अधिक मुलं आपले ब्लॉग यिनबझवर लिहीत असतात. दीड हजारापेक्षा जास्त मुलं राज्यभरातून यिनबझचे प्रतिनिधी काम करतात.[ संदर्भ हवा ] देशातले युवकांसाठी पहिलं पोर्टल म्हणून यिनबझकडे बघितलं जातं.[ संदर्भ हवा ]
भ्रमंती लाईव्ह
संपादनसकाळच्या सप्तरंग पुरवणीमध्ये भ्रमंती लाईव्ह नावाचं संदीप काळे यांच एक सदर चालते. वंचित गरिब, मजूर, पीडित, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या विषयांवर संदीप काळे यांच लिखाण दर रविवारी प्रकाशित होत असतं.[ संदर्भ हवा ]
व्हाॅईस ऑफ मीडिया
संपादन'व्हाईस ऑफ मीडिया' या पत्रकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संदीप काळे काम करतात. गेल्या चार वर्षांपासून, पत्रकारांच्या मूळ विषयांवर रिसर्च करीत, जेष्ठ पत्रकारांची फळी एकत्रित आली आणि त्यांनी पत्रकारांच्या पाच मूळ विषयांवर काम करण्याचा निर्णय घेतला.. आज जगातल्त्याया ४३ देशात मध्ये 'व्हाईस ऑफ मीडिया' काम करते. लाख ७० हजार पत्परकार यात काम करतात. पत्रकारांचे आरोग्य, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, पत्रकारांच्या घरांचा प्रश्न, पत्रकारांनी काळाप्रमाणे विकसित करावे असे कौशल्य आणि सेवानिवृत्ती नंतर पत्रकारांच्या सोडविल्या जाणाऱ्या अडचणीं, ह्या पाच विषयाला घेऊन 'व्हाईस ऑफ मीडिया' ही संघटना काम करते.[ संदर्भ हवा ]
लिहिलेली पुस्तके
संपादनअनावृत्त हे संदीप काळेंच पहिलं पुस्तक. या पुस्तकात सामाजिक कार्यात वाहून घेणा-या अनेकांचा लेखाजोखा देण्यात आला आहे. या पुस्तकाची प्रस्तावणा मंदार फणसे यांनी लिहीलेली आहे.[ संदर्भ हवा ] त्यानंतर आई मनाचा गुरू, एक आग्रलेख आईचा, जागतिक करणातील राजाराम, ब्रेकिंग न्यूझ ते न्यूझ फ्लॅश, शेतक-यांचे मारेकरी, अशी त्यांची पुस्तके आलीत.[ संदर्भ हवा ] मुक्काम पोस्ट आई इत्यादी पुस्तके काळे यांनी लिहिली. या पुस्तकाच्या 23 आवृत्या निघाल्या.[ संदर्भ हवा ] ग्रंथालीनं प्रकाशीत केलेल्या या पुस्तकाला शरद पवारांनी प्रस्तावना दिलेली आहे. 30 संपादकांच्या आईवर आधारीत असलेलं हे पुस्तक मराठी, हिंदी, इंग्रजीमध्येपण येऊ घातला आहे.[ संदर्भ हवा ] डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या तीन विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला मु.पोस्ट आई हे पुस्तक लाभलेलं आहे.[ संदर्भ हवा ] मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारीत असलेलं ट्वेल फेल हे पुस्तक देखील त्यांनी लिहिले. त्याच्याही चार आवरत्या निघाल्या.[ संदर्भ हवा ] त्यानंतर जय भीम लाल सलाम, अश्रूंची फूले, माणुसकी, तेरा अक्षर प्रेमाचे, अशी अनेक पुस्तके संदीप काळे यांची आली. संघर्षातून यशाकडे जाण्याचा मूलमंत्र सांगणारे 'सकाळ' प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले संपादक, लेखक, निवेदक, संघटक संदीप काळे लिखित 'ऑल इज वेल', मराठी, हिंदी आणि इंग्लिश हे पुस्तक तीन भाषांमध्ये नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशित झाले.[ संदर्भ हवा ]
संदीप काळे यांची काही निवडक पुस्तके [ संदर्भ हवा ]
संपादन१) बापू हे दोन शब्द २) रमाई ते भिमाई ३) शिवरायांच्या नावाने ४) पांडवी आणि छक्का ५) फिटे अंधाराचे जाळे ६) जागलीचे दिवस ७) गोदाकाठचे पाऊले ८) अश्रूंच्या थेंबावर ९) पलीकडच्या गावात १०) तिथे हरवले मन ११) तिथे बांध फुटला १२) अनावृत वृत्तापलीकडचे १३) आई मनाचा गुरू १४) एक अग्रलेख आईचा १५) ग्रामपरिवर्तनाचा वाटसरू १६) जागतिकीकरणातले राजाराम १७) न्यूझ फ्लॅश ते ब्रेकिंग न्यूझ १८) बाबासाहेब आंबेडकर १९) मु.पो. आई : संपादकांचं मातृस्मरण २०) शेतकऱ्यांचे मारेकरी २१) जयभीम लाल सलाम २२) ट्वेल्थ फेल (१० आवृत्त्या) २३) अश्रूंची फुले (९ आवृत्या) २४) माणुस'की' (९ आवृत्या) २५) तेरा अक्षर प्रेमाचे २६) दिवस असे की २७) सख्या बहिणी पक्या मैत्रिणी (४ आवृत्या) २८) प्रेमसेतू (५ आवृत्या) २९) आधुनिक भगीरथ ३०) आचार्य ३१) गंध आपुलकीचा (४ आवृत्या) ३२) मां (हिंदी) ३३) कश्मीरी काळ ३४) ऑल इज वेल (मराठी) (१५ आवृत्या) ३५) ऑल इज वेल (हिंदी) ३६) ऑल इज वेल (इंग्लिश) ३७) सक्सेस पासवर्ड ३८) काटेरी फुले ३९)संदल (हिंदी) ४०)संदल (मराठी) ४१)संदल (इंग्रजी) ४२)आठवणीतले काजवे (मराठी) ४३)आठवणीतले काजवे (हिंदी) ४४)आठवणीतले काजवे (इंग्रजी) ४५)काही बोलायचे आहे ४६) तू गेल्यावर ४७) जर्नालीझम बदलते समीकरण ४८) मी ˈपॉझ़टिव्ह् ४९) मला पत्रकार व्हयाचे आहे. ५०)वूमन पॉवर (मराठी) ५१)वूमन पॉवर (हिंदी) ५२)वूमन पॉवर (इंग्रजी) ५३)क्रांतीची पावलं ५४) नयन अर्ध्यावर संपलेली मैफिल ५५) वी वन आम्ही जिंकलो (मराठी) ५६) वी वन आम्ही जिंकलो (हिंदी) ५७)वी वन आम्ही जिंकलो (इंग्रजी) ५८) कोवळी पाने
मिळालेले पुरस्कार[ संदर्भ हवा ]
संपादनपत्रकारिता क्षेत्रात काम करीत असताना संदीप काळे आचार्य बाळशास्त्री जांभेकर 2021, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, चौथा स्तंभ पुरस्कार[ संदर्भ हवा ][११], महाराष्ट्र गौरव पुरस्कार, सत्यशोधक पत्रकारिता पुरस्कार, शांताबाई जोशी पत्रकारिता पुरस्कार, शिवजन्मोत्सव पत्रकार पुरस्कार, महाराष्ट्र पत्रकाररत्न गौरव पुरस्कार, दोन वेळा महाराष्ट्र पत्रकारभूषण गौरव पुरस्कार, महाराष्ट्र दीप पुरस्कार, कै. बाबा दळवी शोध पत्रकारिता पुरस्कार, शंकरराव चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार,यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार, मराठवाडा भूषण पुरस्कार,नांदेड विकासरत्न पुरस्कार,साने गुरुजी सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत.[ संदर्भ हवा ]
शैक्षणिक अनुभव
संपादनसंदीप काळे यांना पत्रकारितेमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा सुद्धा अनुभव आहे. त्यांनी घडविलेले अनेक विद्यार्थी विविध प्रसारमाध्यमांमध्ये काम करत आहेत.[ संदर्भ हवा ] एमजीएम वृत्तपत्रविभागाचे प्राध्यापक होते. राजीव गांधी पत्रकारिता महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. नांदेडच्या विवेकानंद पत्रकारिता महाविद्यालयात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, पत्रकारिता विभाग मुंबई विद्यापीठ या सर्व ठिकाणी त्यांनी गेस्ट प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे.[ संदर्भ हवा ] प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि जनसंपर्क हे तिन्ही विषय त्यांचे आवडीचे विषय आहे. जे त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविले आहे. औरंगाबादला कृषी व ग्रामिण विकास प्रतिष्ठाण अंबेलोहळ या ठिकाणी त्यांनी जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे.[ संदर्भ हवा ]
संदर्भ
संपादन- ^ संदीप काळे. "यश आंतरजातीय विवाहाचे' सकाळ मधील लेखन". Sakal.[permanent dead link]
- ^ साम टीव्ही. "मोठ्ठ व्हायचंय ,मला". साम टीव्ही.
- ^ संदीप काळे. "आयबीएन लोकमतचे केलेले एक वार्तांकन". ibnlokmat.[permanent dead link]
- ^ ग्लोबल मराठी. "उद्याचा मराठवाडा संपादकीय कार्य". ग्लोबल मराठी.
- ^ संदीप काळे. "सर संमेलनाध्यक्ष लेख". नवशक्ती.[permanent dead link]
- ^ सकाळ वृत्तसेवा. "नांदेड येथील महिला भूषण पुरस्कारास सहयोगी संपादक संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती". Sakal.[permanent dead link]
- ^ MH News. "'आम्ही घडू देशासाठी' यूथ छावणी शिबिर". MH News. 2021-04-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-13 रोजी पाहिले.
- ^ सकाळ वृत्तसेवा. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसंमेलनाचे रविवारी उद्घाटन". Sakal.
- ^ दिनकर गांगल. "शेतकरी प्रश्नावरील संशोधनाचा संदर्भ". थिंक महाराष्ट्र. 2021-04-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-13 रोजी पाहिले.
- ^ "हिंमत-ए-मर्दा... | eSakal". www.esakal.com. 2021-04-11 रोजी पाहिले.
- ^ सकाळ वृत्तसेवा. "'चौथा स्तंभ'चे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर". सकाळ.[permanent dead link]