अमिताभ बच्चन

भारतीय नट


अमिताभ बच्चन (जन्म : ११ ऑक्टोबर १९४२)[] हे एक भारतीय चित्रपट अभिनेते, चित्रपट निर्माते, दूरदर्शन सूत्रसंचालक, माजी राजकारणी आहेत जे त्यांच्या हिंदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे.[] १९७०-८० च्या दरम्यान, ते भारतीय चित्रपटातील सर्वात प्रभावी अभिनेते होते ; फ्रेंच दिग्दर्शक फ्रँकोइस ट्रूफॉट यांनी त्यांना "One-man industry" (एक-पुरुष उद्योग) म्हणले.[]

अमिताभ

अमिताभ बच्चन ,आय.आय.एफ.ए. पुरस्कार
जन्म ११ ऑक्टोबर, १९४२ (1942-10-11) (वय: ८१)
अलाहाबाद, भारत
पत्नी नाव जया बच्चन
अपत्ये अभिषेक बच्चन
श्वेता नंदा

अमिताभ यांचा जन्म 1942 मध्ये अलाहाबाद येथे हिंदी कवी हरिवंशराय बच्चन आणि त्यांच्या पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांच्या घरी झाला. त्यांचे शिक्षण नैनिताल येथे आणि दिल्ली विद्यापीठातील किरोरी माल महाविद्यालयात झाले. १९६९ मध्ये भुवन शोम या चित्रपटात आवाज निवेदक म्हणून त्यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली. त्यांनी 1970च्या दशकाच्या सुरुवातीला जंजीर, दीवार आणि शोले यांसारख्या चित्रपटांसाठी लोकप्रियता मिळवली. हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्यांना भारताचा "अँग्री यंग मॅन" म्हणून संबोधले गेले.

अमिताभ यांना बॉलीवूडचा शहेनशाह (त्यांच्या 1988 मधील शहेनशाह चित्रपटाच्या संदर्भात), महानायक, स्टार ऑफ द मिलेनियम, किंवा बिग बी म्हणून संबोधले गेले.[] त्यांनी पाच दशकांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत[] 200हून अधिक भारतीय चित्रपटात काम केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले, ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांनी एकूण १६ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत, तसेच एकूण ४२ नामांकनांसह, फिल्मफेरमधील कोणत्याही प्रमुख अभिनय श्रेणीमध्ये ते सर्वाधिक नामांकित कलाकार आहेत.

अभिनयासोबतच बच्चन यांनी पार्श्वगायक, चित्रपट निर्माता आणि दूरचित्रवाणी प्रस्तुतकर्ता म्हणून काम केले आहे. त्यांनी गेम शो "कौन बनेगा करोडपती"चे अनेक सीझन होस्ट केले आहेत. १९८० च्या दशकात त्यांनी काही काळ राजकारणातही प्रवेश केला होता.

भारत सरकारने त्यांना कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल 1984 मध्ये पद्मश्री, 2001 मध्ये पद्मभूषण आणि 2015 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. 2007 मध्ये फ्रान्स सरकारने त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान, "नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले.

भारतीय उपखंडाच्या बाहेर त्यांचे आफ्रिका (दक्षिण आफ्रिका, पूर्व आफ्रिका आणि मॉरिशस), मध्य पूर्व (विशेषतः यूएई आणि इजिप्त), युनायटेड किंग्डम, यासह दक्षिण आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी चाहते आहेत. रशिया, कॅरिबियन (गियाना, सुरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो), ओशनिया (फिजी, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड) आणि युनायटेड स्टेट्स येथेही खूप मोठ्या प्रमाणात बच्चन यांचे चाहते आहेत.[]

प्रारंभीचे जीवन

अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबाद, उत्तरप्रदेश येथे एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होते तर त्यांची आई तेजी बच्चन या मूळच्या फैसलाबाद (पाकिस्तान) येथील हिंदू शीख कुटुंबातील होत्या. अमिताभ यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन (बालसुलभ) या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले. अमिताभ यांच्या वडिलांचे २००३ मध्ये तर आईचे २००७ मध्ये निधन झाले.[ संदर्भ हवा ]

हरिवंश राय बच्चन यांच्या दोन मुलांपैकी अमिताभ मोठे. त्यांच्या भावाचे नाव अजिताभ आहे. त्यांच्या आईला रंगभूमीची आवड होती आणि त्यांना एका फिल्ममध्ये भूमिकाही देऊ करण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याऐवजी घर सांभाळण्याला प्राधान्य दिले.[ संदर्भ हवा ]

बच्चन अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूलमध्ये शिकले. त्यांनी नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये कलाशाखेत शिक्षण घेतले त्यानंतर त्यानी दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानशाखेतली पदवी संपादन केली. ऐन विशीत कोलकत्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजंटाची नोकरी सोडून देऊन अभिनयात कारकीर्द करण्याचा निर्णय अमिताभ यांनी घेतला. मन का होतो अच्छा मन काना होतो जादा अच्छा.[ संदर्भ हवा ]

अभिनेता

वर्ष चित्रपट भूमिका माहिती
१९६९ सात हिंदुस्तानी अन्वर अली अन्वर विजेता, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, पदार्पण अभिनेता
भुवन शोम, हिंदी चित्रपट आलोचक (आवाज)
१९७१ परवाना, हिंदी चित्रपट कुमार सेन
आनंद डॉ. भास्कर क. बनर्जी/बाबु मोशाय विजेता, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
रेशमा और शेरा, हिंदी चित्रपट छोटू
गुड्डी, हिंदी चित्रपट स्वतः
प्यार की कहानी, हिंदी चित्रपट राम चन्द्र
१९७२ संजोग, हिंदी चित्रपट मोहन
बिरजू
पिया का घर, हिंदी चित्रपट पाहुणा कलाकार
एक नज़र, हिंदी चित्रपट मनमोहन आकाश त्यागी
बावर्ची, हिंदी चित्रपट सूत्रधार
रास्ते का पत्थर, हिंदी चित्रपट जय शंकर रे
बॉम्बे टू गोवा, हिंदी चित्रपट रवि कुमार
१९७३ बड़ा कबूतर, हिंदी चित्रपट पाहुणा कलाकार
बंधे हाथ, हिंदी चित्रपट शमु, दीपक दुहेरी भूमिका
ज़ंजीर, हिंदी चित्रपट इन्स्पेक्टर विजय खन्ना नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
गहरी चाल, हिंदी चित्रपट रतन
अभिमान (हिंदी चित्रपट) सुबीर कुमार
सौदागर मोती
नमक हराम, हिंदी चित्रपट विक्रम (विक्की) विजेता, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
१९७४ कुंवारा बाप, हिंदी चित्रपट ऑगस्टिन पाहुणा कलाकार
दोस्त, हिंदी चित्रपट आनंद पाहुणा कलाकार
कसौटी, हिंदी चित्रपट अमिताभ शर्मा (अमित)
बेनाम, हिंदी चित्रपट अमित श्रीवास्तव
रोटी कपडा और मकान, हिंदी चित्रपट विजय
मजबूर, हिंदी चित्रपट रवि खन्ना
१९७५ चुपके चुपके सुकुमार सिंहा/परिमल त्रिपाठी
फरार, हिंदी चित्रपट राजेश (राज)
मिली, हिंदी चित्रपट शेखर दयाल
दीवार, हिंदी चित्रपट विजय वर्मा नामांकन, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार
ज़मीर, हिंदी चित्रपट बादल/चिम्पू
शोले, हिंदी चित्रपट जय (जयदेव)
१९७६ दो अंजाने अमित रॉय/नरेश दत्त
छोटी सी बात, हिंदी चित्रपट पाहुणा कलाकार
कभी कभी, हिंदी चित्रपट अमित मल्होत्रा नामांकन, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार
हेरा फेरी, हिंदी चित्रपट विजय/इंसपेक्टर हिराचंद
१९७७ अलाप (हिंदी चित्रपट) अलोक प्रसाद
चरणदास क़व्वाली सिंगेर पाहुणा कलाकार
अमर अकबर ॲंथोनी अन्थोनी गोंजाल्वेस विजेता, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार
शतरंज के खिलाडी, हिंदी चित्रपट सुत्रधार
अदालत धर्मं/ठाकुर धरम चंद, राजू नामांकन, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार. <बर/> दुहेरी भूमिका
इमान धरम, हिंदी चित्रपट अहमद राजा
खून पसीना, हिंदी चित्रपट शिवा/तिगेर
परवरीश, हिंदी चित्रपट अमित
१९७८ बेशरम, हिंदी चित्रपट राम कुमार चंद्र/
प्रिन्स चन्द्रशेखर
गंगा की सौगंध, हिंदी चित्रपट जीवा
कसमे वादे, हिंदी चित्रपट अमित, शंकर दुहेरी भूमिका
त्रिशूल, हिंदी चित्रपट विजय कुमार नामांकन, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार
डॉन, हिंदी चित्रपट दोन/विजय विजेता, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार.
दुहेरी भूमिका
मुकद्दर का सिकंदर, हिंदी चित्रपट सिकंदर नामांकन, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार
१९७९ द ग्रेट गॅम्बलर, हिंदी चित्रपट जे, इंसपेक्टर विजय दुहेरी भूमिका
गोलमाल, हिंदी चित्रपट स्वतः पाहुणा कलाकार
जुर्माना, हिंदी चित्रपट इंदर सक्सेना
मंजिल, हिंदी चित्रपट अजय चंद्र
मि. नटवरलाल, हिंदी चित्रपट नटवरलाल/अवतार सिंह नामांकन, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार & फिल्मफेर सर्वोत्तम पुरूष पार्श्वगायक पुरस्कार
काला पत्थर, हिंदी चित्रपट विजय पल सिंह नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
सुहाग, हिंदी चित्रपट अमित कपूर
१९८० दो और दो पांच विजय/राम
दोस्ताना, हिंदी चित्रपट विजय वर्मा नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
राम बलराम, हिंदी चित्रपट इन्स्पेक्टर बलराम सिंह
शान, हिंदी चित्रपट विजय कुमार
१९८१ चश्मे बद्दूर, हिंदी चित्रपट पाहुणा कलाकार
कमांडर, हिंदी चित्रपट पाहुणा कलाकार
नसीब, हिंदी चित्रपट रवि
बरसात कि एक रात, हिंदी चित्रपट ए.सी.पी. अभिजीत रे
लावारिस, हिंदी चित्रपट हीरा नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
सिलसिला, हिंदी चित्रपट अमित मल्होत्रा नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
याराना, हिंदी चित्रपट किशन कुमार
कालिया, हिंदी चित्रपट कल्लू/कालिया
१९८२ सत्ते पे सत्ता, हिंदी चित्रपट रवि आनंद, बाबु
बेमिसाल डॉ. सुधीर रॉय, अधीर रॉय नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार.
दुहेरी भूमिका
देश प्रेमी, हिंदी चित्रपट मास्टर दीनानाथ, राजू दुहेरी भूमिका
नमक हलाल, हिंदी चित्रपट अर्जुन सिंह नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
खुद्दार, हिंदी चित्रपट गोविन्द श्रीवास्तव/छोटू उस्ताद
शक्ती, हिंदी चित्रपट विजय कुमार नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
१९८३ नास्तिक, हिंदी चित्रपट शंकर (शेरू)/भोला
अंधा कानून (हिंदी चित्रपट) जन. निस्सार अख्तर खान नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार.
पाहुणा कलाकार
महान, हिंदी चित्रपट राणा रणवीर, गुरू, इन्स्पेक्टर शंकर तिहेरी भूमिका
पुकार, हिंदी चित्रपट रामदास/रोंनी
कुली, हिंदी चित्रपट इकबाल अ. खान
१९८४ इन्किलाब, हिंदी चित्रपट अमरनाथ
शराबी, हिंदी चित्रपट विक्की कपूर नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
१९८५ गिरफ्तार, हिंदी चित्रपट इन्स्पे. करण कुमार खन्ना
मर्द, हिंदी चित्रपट राजू "मर्द" टांगेवाला नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
१९८६ एक रुका हुआ फैसला, हिंदी चित्रपट पाहुणा कलाकार
आखरी रास्ता (हिंदी चित्रपट) डेव्हिड, विजय दुहेरी भूमिका
१९८७ जलवा, हिंदी चित्रपट स्वतः पाहुणा कलाकार
कौन जीता कौन हारा, हिंदी चित्रपट स्वतः पाहुणा कलाकार
१९८८ सूरमा भोपाली पाहुणा कलाकार
शहेनशाह, हिंदी चित्रपट इन्स्पेक्टर विजय कुमार श्रीवास्तव
/ शहेंशाह
नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
हीरो हीरालाल (हिंदी चित्रपट) स्वतः पाहुणा कलाकार
गंगा जमुना सरस्वती, हिंदी चित्रपट गंगा प्रसाद
१९८९ बटवारा, हिंदी चित्रपट सुत्रधार
तूफान, हिंदी चित्रपट तूफान, शाम दुहेरी भूमिका
जादूगर गोगा/गोगेश्वर
मैं आझाद हूॅं, हिंदी चित्रपट आझाद
१९९० अग्नीपथ विजय दीनानाथ चौहान विजेता, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्तम अभिनेता व नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
क्रोध, हिंदी चित्रपट पाहुणा कलाकार
आज का अर्जुन (हिंदी चित्रपट) भीमा
१९९१ हम Tiger/शेखर विजेता, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
अजूबा (हिंदी चित्रपट) अजूबा/अली
इन्द्रजीत, हिंदी चित्रपट इन्द्रजीत
अकेला (हिंदी चित्रपट) इंसपेक्टर विजय वर्मा
१९९२ खुदा गवाह, हिंदी चित्रपट बादशाह खान नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
१९९४ इंसानियत, हिंदी चित्रपट इंसपेक्टर अमर
१९९६ तेरे मेरे सपने सुत्रधार
१९९७ मृत्युदाता, हिंदी चित्रपट डॉ. राम प्रसाद घायल
१९९८ मेजर साब मेजर जसबीर सिंह राणा
बडे मियां छोटे मियां, हिंदी चित्रपट इन्स्पेक्टर अर्जुन सिंह, बडे मियां दुहेरी भूमिका
१९९९ लाल बादशाह, हिंदी चित्रपट लाल "बादशाह" सिंह, रणभीर सिंह दुहेरी भूमिका
सूर्यवंशम, हिंदी चित्रपट ठाकुर भानु प्रताप सिंह, हीरा सिंह दुहेरी भूमिका
हिंदुस्तान कि कसम (हिंदी चित्रपट) कबीर
कोहराम, हिंदी चित्रपट काल. बलबीर सिंह सोडी (देवराज हथोड़ा)
& दादा भाई
हॅलो ब्रदर (हिंदी चित्रपट) देवाचा आवाज
२००० मोहब्बतें, हिंदी चित्रपट नारायण शंकर विजेता, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
२००१ एक रिश्ता: द बॉॅंड ऑफ लव्ह विजय कपूर
लगान, हिंदी चित्रपट सूत्रधार
अक्स मनु वर्मा विजेता, फिल्मफेअर क्रिटीक्स पुरस्कार, सर्वोत्तम अभिनय व नामांकन, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार
कभी खुशी कभी ग़म, हिंदी चित्रपट यशवोर्धन "यश" रायचंद नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
२००२ ऑंखें, हिंदी चित्रपट विजय सिंह राजपूत नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
हम किसीसे कम नही, हिंदी चित्रपट डॉ. रस्तोगी
अग्नि वर्षा इन्द्र (गोद) पाहुणा कलाकार
कांटे, हिंदी चित्रपट यश्वर्धन रामपाल/"मेजर" नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
२००३ खुशी, हिंदी चित्रपट सुत्रधार
अरमान, हिंदी चित्रपट डॉ. सिद्धार्थ सिंहा
मुम्बई से आया मेरा दोस्त, हिंदी चित्रपट सूत्रधार
बूम, हिंदी चित्रपट बडे मिया
बागबान, हिंदी चित्रपट राज मल्होत्रा नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
फन2श, हिंदी चित्रपट सुत्रधार
२००४ खाकी, हिंदी चित्रपट डी.सी.पी. अनंत कुमार श्रीवास्तव नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
एतबार, हिंदी चित्रपट डॉ. रणवीर मल्होत्रा
रुद्राक्ष, हिंदी चित्रपट सुत्रधार
इन्साफ - थे जस्टिस, हिंदी चित्रपट सुत्रधार
देव, हिंदी चित्रपट डी.सी.पी. देव प्रताप सिंह
लक्ष्य, हिंदी चित्रपट कर्नल सुनील दामले
दीवार, हिंदी चित्रपट मेजर रणवीर कौल
क्यों...! हो गया ना, हिंदी चित्रपट राज चौहान
हम कौन है, हिंदी चित्रपट मेजर फ्रॅंक जॉन विल्यम्स, फ्रॅंक जेम्स विल्सम्स दुहेरी भूमिका
वीर-झारा, हिंदी चित्रपट चौधरी सुमेर सिंह नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार.
पाहुणा कलाकार
अब तुम्हारे हवाले वतन साथियो (हिंदी चित्रपट) मेजर जनरल अमरजीत सिंह
२००५ ब्लॅक, हिंदी चित्रपट देब्राज सही दुहेरी-विजेता, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार & फिल्मफेअर क्रिटीक्स पुरस्कार, सर्वोत्तम अभिनय.
विजेता, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्तम अभिनेता
वक्त: द रेस अगेंस्ट टाइम, हिंदी चित्रपट इश्वरचंद्र शरावत
बंटी और बबली, हिंदी चित्रपट डी.सी.पी. दशरथ सिंह नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
परिणीता, हिंदी चित्रपट सुत्रधार
पहेली, हिंदी चित्रपट गडरिया पाहुणा कलाकार
सरकार, हिंदी चित्रपट सुभाष नगरे/"सरकार" नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
विरुद्ध... फॅमिली कम्स फर्स्ट, हिंदी चित्रपट विद्याधर पटवर्धन
रामजी लंडनवाले, हिंदी चित्रपट स्वतः पाहुणा कलाकार
दिल जो भी कहे..., हिंदी चित्रपट शेखर सिन्हा
एक अजनबी, हिंदी चित्रपट सुर्यवीर सिंह
२००६ फॅमिली - टाईझ ऑफ ब्लड विरेन सही
डरना जरूरी है, प्रोफेसर
कभी अलविदाना कहना, समरजीत सिंह तलवार (अक. सेक्सी सम) नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
बाबुल, हिंदी चित्रपट बलराज कपूर
२००७ एकलव्यः द रॉयल गार्ड, एकलव्य
निशब्द, हिंदी चित्रपट विजय
चीनी कम, हिंदी चित्रपट बुद्धदेव गुप्ता
शूटआउट ऍट लोखंडवाला, दिन्ग्र पाहुणा कलाकार
झूम बराबर झूम, हिंदी चित्रपट सूत्रधार पाहुणा कलाकार
राम गोपाल वर्मा कि आग, बब्बन सिंह
द लास्ट लियर, हिंदी चित्रपट हरीश मिश्र
ॐ शांति ॐ, हिंदी चित्रपट स्वतः पाहुणा कलाकार
२००८ जमानत, शिव शंकर ओं होल्ड
गॉड तुस्सी ग्रेट हो, पोस्ट-प्रोडक्शन
भूतनाथ, भूतनाथ रेलेअसिंग ओं जानेवारी १८, इ.स. २००८
सरकार राज, सुभाष नागरे/"सरकार" रेलेअसिंग ओं फेब्रुवारी ८, इ.स. २००८
एक्सक्लुझन,
युद्ध, अन्नौंसद[]
२००९ दिल्ली -६ [null दादाजी]
पा औरो
२०१० रंण विजय  हर्षवर्धन  मलिक
तीन  पट्टी प्रोफ . वेंकट  सुब्रमणिम
कंदहार लोकनाथ  शर्मा
२०११ बुढ्ढा ... होगा  तेरा बाप विजय  'विज्जु ' मल्होत्रा
२०१५ पिकू भास्कर बॅनर्जी

निर्माता

पार्श्वगायक

दूरवित्रवाणी

चित्रपट


 
 
 
 

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Amitabh Bachchan: No resolutions for my birthday". Rediff (इंग्रजी भाषेत). 2022-01-16 रोजी पाहिले.
  2. ^ "Amitabh Bachchan: The biggest film star in the world - News - Films - The Independent". web.archive.org. 2015-02-10. रोजी मूळ पानापासून संग्रहित2015-02-10. 2022-01-16 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  3. ^ D&B Bureau. "Amitabh Bachchan: THE MAN AND THE LEGEND | Diplomacy & Beyond Plus" (इंग्रजी भाषेत). 2022-01-16 रोजी पाहिले.
  4. ^ "Amitabh Bachchan at 73: An ode to the undisputed 'Shahenshah' of Bollywood". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2015-10-11. 2022-01-16 रोजी पाहिले.
  5. ^ "Amitabh Bachchan: A Life in Pictures | BAFTA Guru". web.archive.org. 2011-12-28. रोजी मूळ पानापासून संग्रहित2011-12-28. 2022-01-16 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  6. ^ Willis, Andrew (2004-09-04). Film Stars: Hollywood and Beyond (इंग्रजी भाषेत). Manchester University Press. ISBN 978-0-7190-5645-1.
  7. ^ [१]

बाह्य दुवे

http://static.bafta.org/files/amitabhbachchanbrochure-82.pdf