शान (चित्रपट)
शान हा १९८० साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. शोलेच्या अमाप यशानंतर रमेश सिप्पीने दिग्दर्शित केलेल्या शानकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती परंतु त्याला तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला.
दिग्दर्शन | रमेश सिप्पी |
---|---|
निर्मिती | जी.पी. सिप्पी |
कथा | सलीम-जावेद |
प्रमुख कलाकार |
सुनिल दत्त अमिताभ बच्चन शशी कपूर शत्रुघ्न सिन्हा परवीन बाबी बिंदीया गोस्वामी राखी गुलजार कुलभुषण खरबंदा |
संगीत | आर.डी. बर्मन |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १२ डिसेंबर १९८० |
अवधी | १८१ मिनिटे |
कलाकार
संपादन- अमिताभ बच्चन - विजय कुमार
- शशी कपूर - रवी कुमार
- शत्रुघ्न सिन्हा - राकेश
- परवीन बाबी - सुनीता
- बिंदीया गोस्वामी - रेणू
- राखी गुलजार - शीतल कुमार
- सुनील दत्त - डी.सी.पी. शिव कुमार
- कुलभूषण खरबंदा - शाकाल
- जॉनी वॉकर - चाचा
- मझहर खान - अब्दुल
- मॅक मोहन - जगमोहन (शाकालचा सहाय्यक)
- सुधीर - रंजीत (शाकालचा सहाय्यक)
- शरत सक्सेना - शाकालचा गुंड
- विजू खोटे - पोलीस इन्स्पेक्टर
- पद्मिनी कपिला - रोमा (राकेशची पत्नी)
- हेलन - नर्तकी
- बिंदू - महाराणी
पार्श्वभूमी
संपादनकथानक
संपादनडी.एस.पी शिव कुमार (सुनिल दत्त) नावाचा शूर व निष्ठावंत पोलीस अधिकारी आपली बायको शीतल (राखी गुलजार) व त्यांची मुलगी ह्यांच्याकडे घरी परत येतो आणि जाहीर करतो की त्याची बदली मुंबई येथे झालेली आहे. त्याचे दोन धाकटे भाऊ विजय (अमिताभ बच्चन) व रवी (शशी कपूर) हे मुंबईत रहात असतात पण ते बिनधास्त लोकांना फसवण्यात आपला वेळ घालवतात. सुंदर तरुणी रेणू (बिंदीया गोस्वामी) व तिचे काका (जॉनी वॉकर) ह्यांनी विजय व रवीला फसवल्यानंतर, ते दोघं सुनिता (परवीन बाबी) नावाच्या आणखी एका चोरासह त्यांच्या धंद्यात सामिल होतात. विजय व रवी अनुक्रमे सुनीता व रेणू ह्यांच्या प्रेमात पडतात. तथापि, त्यांची एक युक्ती उलटते व विजय आणि रवी ह्यांना तुरुंगवास भोगावा लागतो. परंतू, शिव ह्याचं मुंबईत आगमन होतं व तो त्या दोघांना सन्मानीय जीवन देण्याच्या आशेने त्यांना जामिनावर सोडतो.
दरम्यान, एक रहस्यमय माणूस (शत्रुघ्न सिन्हा) दोनदा शिवला गोळी मारण्याचा प्रयत्न करतो, पण शिव दोन्हीही वेळेला वाचतो. ह्या धक्कादायक प्रासंगामुळे, विजय आणि रवी शिवला दुसऱ्या प्रकाराची नोकरी मिळवण्याचा सल्ला देतात, असा वाद घालत की त्याच्या साध्याचा व्यवसाय एका कुटुंबातल्या माणसासाठी अत्यंत धोकादायक आहे. तथापि, शिव त्याची अखंड देशभक्त वचनबद्धता उद्धृत करत खंबीरपणे उभा राहतो. असं अखेरीस समोर येतं की तो रहस्यमय माणूस काम करत होता शाकाल (कुलभूषण खरबंदा) ह्याच्या साठी, जो एक निर्दयी आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असून भारताच्या बाहेर एका पेटावरून कार्यरत करतोय, आणि त्याचे शत्रू व देशद्रोही ह्यांच्या दुःखात आनंदी राहून मुंबईत गुन्हेगारीला निधी पुरवतोय.
शिव हा मुंबईत होणाऱ्या गुन्ह्यांचं मूळ शोधण्यात जवळ आलाय ह्या वस्तुस्थितीमुळे, शाकाल आपल्या सहाय्यकांना शिव ह्याला पळवून आपल्या पेटावर आणण्यास भाग पाडतो. तिथे शाकाल शिवला उदरनिर्वाहासाठी पुष्कळ संपत्तीच्या बदल्यात त्याच्या गुन्हेगारी सैन्यात सामिल होण्यास प्रभावित करण्याच्या प्रयत्न करतो. तथापि, शिव साफ नकार देतो व पेटावरून पळून जाऊन शाकालनं पाठवलेल्या जंगली कुत्र्यांपासून ही आपला जीव वाचतो. परंतु, शाकालला शिव समुद्रावर दिसतो व तो त्याच्यावर हेलिकॉप्टरमधून जीवघेणा गोळीबार करून त्याचं प्रेत परत मुंबईला पाठवतो.
जसे विजय, रवी आणि शीतल शिवच्या दुःखद निधनाचा शोक व्यक्त करतात, तो रहस्यमय माणूस त्यांच्या घरी येतो व सर्कसमध्ये काम करणारा राकेश म्हणून स्वतःचा परिचय करतो. राकेश कबूल करतो की शाकालनं त्याच्या पत्नीला आपल्या कबज्यात ठेवून शिवला मारण्यासाठी ब्लॅकमेल केलं, आणि आपल्या पत्नीला वाचवायला वेळ मिळवण्याच्या आशेने त्यानी पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये जाणूनबुजून नेम चुकवला. तथापि, शाकालनं आधीच ह्याचं अनुमान काढलं होतं आणि राकेशच्या पत्नीला एका गाडीच्या अपघातात ठार मारण्याची व्यवस्था केली. हे कळल्यानंतर, विजय व रवी राकेश बरोबर सहयोगी होतात आणि ते एकत्र त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना मारल्याबद्दल शाकाल ह्याच्याकडून बदला घ्यायचा ठरवतात.
उल्लेखनीय
संपादनबाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील शान चे पान (इंग्लिश मजकूर)