विजू खोटे (जन्म : १७ डिसेंबर १९४१; - ३० सप्टेंबर २०१९) हे हिंदी चित्रपटांतून काम करणारे मराठी अभिनेते होते. त्यांनी ४४०पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून कामे केली होती.

विजू खोटे
विजू खोटे
जन्म विजू खोटे
१७ डिसेंबर १९४१
मुंबई
मृत्यू ३० सप्टेंबर २०१९
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
वडील नंदू खोटे

कुटुंबसंपादन करा

अभिनेत्री शुभा खोटे ही विजू खोटेंची बहीण. 'झाँसी की रानी'त ज्यांनी काम केले होते ते नंदू खोटे हे त्यांचे वडील आणि [[दुर्गा खोटे] ही त्यांची आजी.

विजू खोटे यांची भूमिका असलेले मराठी चित्रपटसंपादन करा

  • अदाबदली
  • अशी ही बनवाबनवी
  • आयत्या घरात घरोबा
  • एक उनाड दिवस
  • उत्तरायण
  • माझा नवरा तुझी बायको
  • या मालक
  • मास्तर एके मास्तर

विजू खोटे यांचे चित्रपटांतील प्रसिद्ध उद्गारसंपादन करा

"सरदार मैने आपका नमक खाया है ('शोले' चित्रपटातला काल्या डाकू.).

" गलतीसे मिस्टेक हो गया" ('अंदाज अपना अपना' मधला राॅबर्ट)