नैनितालचे दृश्य
नैना देवी मंदिर
नैनितालमधील मॉल रोड

नैनिताल भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे.

हे शहर नैनिताल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे एक लोकप्रिय गिरीस्थान आहे. नैनिताल समुद्रसपाटीपासून २०८४ मीटर उंचीवर एका दरीत वसलेले आहे.नैनिताल हे नाव या गावातील प्रसिद्ध नैनी तलावावरून पडले आहे. नैनितालच्या सभोवती हिमालयीन पर्वतरांगेतील पर्वत आहेत. उत्तरेला नैना (२६१५ मीटर), पश्चिमेला देवपाठा (२४३८ मीटर), दक्षिणेला अयरपाठा (२२७८ मीटर) हे पर्वत आहेत. या पर्वतांच्या शिखरावरून हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतांचे सुंदर दृश्य दिसते.

हवामानसंपादन करा

नैनिताल मधील हवामान वर्षभर सुखद आणि थंड असते.जुलैमध्ये येथे वर्षातील सर्वांत जास्त तापमान म्हणजे १६.४ अंश सेल्शियस ते २३.५ सेल्शियसच्या दरम्यान असते. सर्वांत कमी तापमान जानेवारी महिन्यात १.७ अंश सेल्शियस ते १०.७ अंश सेल्शियस असते.

लोकसंख्यासंपादन करा

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४१,३७७ आहे. यात ५२.३% पुरुष आणि ४७.७% स्त्रिया आहेत.साक्षरतेचे प्रमाण ९२.९३% आहे. गावातील बहुसंख्य लोक कुमाऊ आहेत.

पुराणकथासंपादन करा

नैनी तलाव हा भारतातील ६४ शक्ती पीठांमधील एक आहे, असे मानण्यात येते. सतीचे (पार्वतीचे) जळलेले शरीर शंकर घेऊन जात असताना जिथे तिचा डोळा पडला तिथे नैनी ताल म्हणजे डोळ्याचा तलाव तयार झाला, अशी दंतकथा आहे. या तलावाच्या उत्तरेला नैना देवीचे मंदिर आहे.

इतिहाससंपादन करा

ब्रिटीश राजवटीच्या काळात नैनिताल एक गिरीस्थान म्हणून उदयास आले. इथे इमारती बांधल्या जाऊ लागल्या. मैदानी प्रदेशातील उन्हाळ्यापासून सुटका करून घेण्यासाठी ब्रिटीश सैनिक,अधिकारी इथे वास्तव्य करत. नंतर ही युनायटेड प्रोव्हिन्सच्या गव्हर्नरची राजधानी बनली.

प्रसिध्द पर्यटन स्थळेसंपादन करा

  • नैनिताल तलाव
  • नैनी शिखर
  • मॉल रस्ता
  • टिफिन टॉप
  • सातताल
  • स्नोव्ह्यू पॉइंट
  • नैना देवी मंदिर
  • केव्ह गार्डन
  • हनुमानगढी
  • जी.बी.पंत प्राणीसंग्रहालय