नमक हराम हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.

देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९७३


पार्श्वभूमी

संपादन

हा चित्रपट २३ नोव्हेंबर १९७३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता जयेंद्र पांडया असून दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी आहेत. या चित्रपटाची कथा गुलझार व हृषीकेश मुखर्जी यांनी लिहिली आहे. या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली असून राहूल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केली आहेत. आशा भोसले, उषा मंगेशकर, किशोर कुमार यांनी गाणी गायली आहेत. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, सिमी गरेवाल, रेखा, असरानी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

         राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचे बरोबर हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट आहे याआधी या दोघांना घेऊन त्यांनी आनंद हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट सोमू(राजेश खन्ना) व विकी(अमिताभ बच्चन) या दोन मित्रांवर घेतलेला आहे.

कथानक

संपादन

सोमू(राजेश खन्ना) एक सामान्य घराण्यातला असून विधवा आई व बहिणीबरोबर दिल्लीत राहतो तर विकी(अमिताभ बच्चन) श्रीमंत घराण्यातील दाखवला आहे. एके दिवशी विकीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टर त्यांना आराम करायला सांगतात. विकी वडिलांचा व्यवसाय सांभाळतो. या दरम्यान विकीचे जुने कर्मचारी व युनियन लीडरशी भांडण होते त्यामुळे सर्व कर्मचारी संपावर जातात. विकीचे वडील मध्यस्थी करतात व विकीला कर्मचाऱ्यांची माफी मागायला सांगतात. विकी माफी मागतो व संप मिटतो.

        सोमू विकीच्या कारखान्यात मजदूर म्हणून कामाला लागतो व आपल्या साथीदारांबरोबर दोस्ती करतो. कालांतराने तो युनियन लीडर बनतो. विकी व सोमूच्यात तणाव निर्माण होतो व विकी मारला जातो.

उल्लेखनीय

संपादन

अमिताभचा राजेश खन्नाबरोबर काम न करण्याचा निर्णय --

          या चित्रपटात शेवटी अमिताभ मारला जातो. राजेश खन्नाला जेव्हा हे कळते तेव्हा तो  हृषीकेश मुखर्जी यांचेवर दबाव आणून चित्रपटाचा शेवट बदलण्यास सांगतो. कारण आनंद मध्ये राजेश खन्नाला प्रेक्षकांकडून जशी सहानुभूती मिळाली तशी अमिताभ चित्रपटाच्या शेवटी मरण पावला तर प्रेक्षकांकडून मिळणारी सहानुभूती अमिताभला मिळणार होती. पण हृषीकेश मुखर्जी यांनी दबावाला बळी न पडता चित्रपटाचा शेवट बदलला नाही. अमिताभला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा राजेश खन्नाबरोबर काम न करण्याचा निर्णय त्याने घेतला.         अमिताभने या चित्रपटात उत्कृष्ठ भूमिका केली. या भुमिकेमुळे त्याला फिल्मफेअरचा 'बेस्ट सपोर्टींग ऍक्टर' हा किताब देण्यात आला. या चित्रपटामुळे प्रेक्षकांना आनंद नंतर अमिताभ व राजेश खन्ना यांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळाली. या चित्रपटाच्या वेळी राजेश खन्ना सुपरस्टार होता तर अमिताभची सुपरस्टार पदाकडे वाटचाल सुरू होती. 

बाह्य दुवे

संपादन