कौस्तुभ कस्तुरे

मराठी ऐतिहासिक लेखक

कौस्तुभ सतीश कस्तुरे हे महाराष्ट्राच्या इतिहासावर पुस्तके लिहिणारे एक मराठी लेखक आणि इतिहास अभ्यासक आहेत. ॲन्ड्रॉइड फोनवर कस्तुरे यांचा 'इतिहासमित्र' नावाचे ॲप आहे. कस्तुरे यांनी पेशवाईत वापरल्या जाणाऱ्या मोडी लिपीचा फॉंटही उपलब्ध करून दिला आहे.

पुस्तके

संपादन
 • इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ (डिसेंबर २०१५)[१] - मराठ्यांच्या इतिहासातील निरनिराळ्या घटनांचा सासंदर्भ घेतलेला परामर्श म्हणजे इतिहासाच्या पाऊलखुणा हे पुस्तक. याच्या पुस्तकाच्या पहिल्या भागात सहा मित्र-सहालेखकांसह कस्तुरे यांनी सहभाग घेतला आहे.
 • इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ (डिसेंबर २०१६)[२] - मराठ्यांच्या इतिहासातील निरनिराळ्या घटनांचा सासंदर्भ घेतलेला परामर्श म्हणजे इतिहासाच्या पाऊलखुणा हे पुस्तक. याच्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात आठ मित्र-सहालेखकांसह कस्तुरे यांनी सहभाग घेतला आहे. (या पुस्तकाचा ३रा भाग नितीन बाळपाटकी, ओंकार चावरे, पुष्कराज घाटगे, राहुल भावे, सागर पाध्ये, शुभंकर अत्रे, सौरभ रत्नपारखी, सुधांशू कविमंडन, तुषार माने, विकास नगरे यांनी लिहिला आहे)
 • पुरंदरे- अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे (डिसेंबर २०१६)[३] - श्रीवर्धनकर बाळाजी विश्वनाथ भट जेव्हा देशावर आले तेव्हा त्यांना प्रथम आसरा मिळाला तो सासवडच्या सरदार पुरंदऱ्यांच्या वाड्यात. सासवडचे पुरंदरे घराणे हे एक इतिहासप्रसिद्ध घराणे. अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून पुरंदऱ्यांची नावे कागदोपत्री आढळतात. पुढे तर सासवडचे अंबाजी त्र्यंबक पुरंदरे हे शाहू महाराजांच्या दरबारातील एक प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहू लागले. शाहू महाराज महाराष्ट्रात आल्यावर त्यांना जाऊन मिळणारा सगळ्यात पहिला सरदार हा या घराण्यातील असून बालाजी विश्वनाथांना पेशवाई मिळण्यासही पुरंदऱ्यांनी मदत केल्यामुळे पेशव्यांनी त्यांना आपले भाऊबंदच मानून सातारा दरबारात मुतालकी बहाल केली. अशा या प्रसिद्ध पुरंदरे घराण्याच्या इतिहासाचा ससंदर्भ घेतलेला लेखाजोखा म्हणजे हे पुस्तक. या पुस्तकात अनेक मोडी पत्रे प्रथमच प्रकाशित करण्यात आली आहेत.
 • पेशवाई- महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान (डिसेंबर २०१५)[४] - पेशवे म्हणजे पंतप्रधान. पेशवाई म्हणजे पंतप्रधानांची कारकीर्द! मराठ्यांच्या इतिहासात अगदी शिवाजी महाराजांपासून अमुक एकाला 'पेशवाई दिल्ही' असे उल्लेख सापडतात. छत्रपती शाहू महाराज मोंगलांच्या तावडीतून पुन्हा महाराष्ट्रात परतल्यानंतर त्यांना सर्वतोपरी साहाय्य झाले ते बाळाजी विश्वनाथ भट यांचे. मूळच्या श्रीवर्धनच्या भट-देशमुखांच्या घरात पेशवाई चालून आली आणि चाहती-वाढती पदवी पावत पेशवेपद पुढची शंभर वर्षे याच घराण्याकडे राहिले. शाहू महाराजांनी मृत्यूपूर्वी केलेल्या याद्यांमध्ये भट घराण्याकडे वंशपरंपरागत पेशवाई नेमून दिली आणि या घराण्याने ती जबाबदारी पुढे सांभाळली. सदर पुस्तकात भट घराण्यातील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ ते शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांच्यापर्यंतच्या १०५ वर्षांच्या कारकिर्दीत घडलेल्या घटनांचा परामर्श घेण्यात आला आहे. सादर पुस्तकात पेशव्यांशी संबंधित काही मूळ कागदांची छायाचित्रेही जोडण्यात आली आहेत.
 • प्रतिशोध पानिपतचा (कादंबरी)
 • सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ (मे २०१७)[५] - सदाशिवरावभाऊ म्हणजे थोरल्या नानासाहेब पेशव्यांचा धाकटा चुलतभाऊ. लढाईचा अनुभव पदरी नसल्याने पानिपत हरण्यास कारणीभूत असा सर्वत्र गैरसमज भाऊसाहेबांविषयी आजवर चालत आला आहे. परंतु सदाशिवरावभाऊंना पानिपटापूर्वी जवळपास पंधरा वर्षे लढायांचा अनुभव होता हे सप्रमाण आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. सदाशिवरावभाऊंच्या १७४६ च्या पहिल्या सावनूर मोहिमेपासून ते त्यांच्या शेवटच्या पानिपत मोहिमेपर्यंत त्यांच्या कारकिर्दीचा आणि चरित्राचा सासंदर्भ आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
 • समर्थ- समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन (मे २०१९)[६] - समर्थ रामदासस्वामींविषयी महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्राबाहेरही अनेक गैरसमज पसरले आहेत. अनेकदा विरोधकांच्या अपप्रचारामुळे अथवा बहुतांशी भक्तांच्या अतिरिक्त भोळ्या भक्तीमुळे रामदासांचे जसे होते तसे चित्रण केले जात नाही. म्हणूनच, बखरी वगळता समकालीन कागदपत्रांतून रामदासांचं जे दर्शन घडतं ते कागदपत्रांच्या आणि लघुचित्रांच्या सहाय्याने दर्शविण्याचा लेखकाने येथे प्रयत्न केला आहे.

कौस्तुभ सतीश कस्तुरे यांचे इतर योगदान

संपादन
 • इतिहासमित्र (ॲंन्ड्रॉइड ॲप)[७] - Available on Google Play Store
 • इतिहासाची सुवर्णपाने - www.kaustubhkasture.in नावाने ब्लॉग लेखन. मराठ्यांच्या इतिहासाशी, विशेषतः अठराव्या शतकाशी निगडित निरनिराळ्या विषयांवरचे लेख येथे वाचायला मिळतात.
 • मोडीकस्तुरे (मोडी लिपीचा फॉन्ट) कस्तुरे यांनी मोडीलिपीच्या प्रचार-प्रसारार्थ 'मोडीकस्तुरे' नावाने फॉन्ट बनवला असून कस्तुरे यांच्या ब्लॉगवर तो मोफत उपलब्ध आहे. ट्रूटाईप प्रणालीचा हा फॉन्ट संगणकावर निरनिराळ्या सॉफ्टवेअर्समध्ये वापरला जाऊ शकतो.
 • कस्तुरे यांनी निरनिराळ्या संस्थांमध्ये मोडी लिपी आणि इतिहासावर प्रेझेंटेशन्स आणि व्याख्याने दिली आहेत.


संदर्भ

संपादन

 1. ^ Many (2015). Itihasachya Paulkhuna, Marathyanchya parakramachi shouryagatha (Hindi भाषेत) (1 edition ed.). Rafter. ISBN 9788192237978.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: extra text (link)
 2. ^ Team, Vishal Khule and; Joshi, Umesh; Kasture, Kaustubh; Mahajan, Pranav; Gaikar, Yogesh; Pawar, Rohit; Vaishampayan, Saurabh; Purandare, Vidyacharan (2016). Itihasachya Paulkhuna part 2 (Marathi भाषेत). Rafter. ISBN 9788193248119.CS1 maint: unrecognized language (link)
 3. ^ Kasture, Kaustubh (2016). Purandare (Marathi भाषेत). ISBN 9788193248102.CS1 maint: unrecognized language (link)
 4. ^ Kasture, Kaustubh (2015). Peshwai- Maharashtrachya Itihasatil Ek Suvarnpaan (Marathi भाषेत) (1 edition ed.). Rafter. ISBN 9788192237985.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: extra text (link)
 5. ^ Kasture, Kaustubh; Kulkarni, Dr Uday (2017). Sakalrajkaryadhurandhar Sadashivraobhau. ISBN 9788193248140.
 6. ^ › product › samarth "Samarth" Check |दुवा= value (सहाय्य).
 7. ^ "Itihaas Mitra - Google Play पर Android ऐप्स". play.google.com (हिंदी भाषेत). 2018-04-13 रोजी पाहिले.