किरण अनंत गुरव हे एक मराठी कथालेखक आणि कादंबरीकार आहेत.[] त्यांच्या 'श्रीलिपी' या पुस्तकातील 'वडाप' या कथेचा कोल्हापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. गुरव यांना 'बाळूच्या अवस्थांतराची डायरी' या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा २०२१ सालचा मराठी भाषेचा मुख्य पुरस्कार मिळाला.[] ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक आहेत.[]

किरण गुरव यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • राखीव सावल्यांचा खेळ (कथासंग्रह)
  • श्रीलिपी (कथासंग्रह)
  • जुगाड (कादंबरी)
  • बाळूच्या अवस्थांतराची डायरी (कथासंग्रह)
  • क्षुधाशांती भुवन (कथासंग्रह)

किरण गुरव यांना मिळालेले पुरस्कार

संपादन
  • जळगाव येथील भॅंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनचा सन २०१६-१७चा ना.धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्यलेखन पुरस्कार.
  • दिल्लीच्या साहित्य अकादमीतर्फे बडोद्यात आयोजित झालेल्या कार्यशाळेत कथावाचनासाठी निमंत्रण..
  • महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) व साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ललित पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचा ग.ल. ठोकळ पुरस्कार
  • मुंबई मराठी साहित्य संघाचा कथाकार शांताराम पुरस्कार
  • शरद प्रकाशनाचा बाबूराव बागूल पुरस्कार
  • मॅजेस्टिक प्रकाशनचा सुभाष भेंडे पुरस्कार
  • जुगाड या कादंबरीला सन २०१८चा बी. रघुनाथ पुरस्कार (मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद)
  • जुगाड या कादंबरीला सन २०१८चा पद्मश्री डॉ. ‍विठ्ठलराव ‍विखेपाटील पुरस्कार (प्रवरानगर)
  • जुगाड या कादंबरीला सन २०१८चा भी. ग. राहमारे पुरस्कार (कोपरगाव)
  • जुगाड या कादंबरीला सन २०१८चा ए. पां. रेंदाळकर पुरस्कार (रेंदाळ)
  • 'बाळूच्या अवस्थांतराची डायरी' या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा २०२१ सालचा मराठी भाषेचा मुख्य पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b c "किरण गुरव यांना "बाळूच्या अवस्थांतराची डायरी" पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार". Loksatta. 2022-01-09 रोजी पाहिले.