उल्हास बापट (प्राध्यापक)

या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.

पुण्यातील प्रोफेसर बापट्स ॲकॅडमी ऑफ इंग्लिश ही एक मे १९९८पासून पुण्यात लक्ष्मी रोडवर सुरू असलेली नामवंत संस्था आहे. या संस्थेने पहिल्या दहा वर्षात १२००० विद्यार्थ्यांना इंग्रजीत बोलायला शिकविले.

प्राध्यापक बापटांची संस्था डॉक्टरांसाठी, इंजिनिअरांसाठी, वकिलांसाठी आणि चार्टर्ड अकौन्टन्ट्‌ससाठी त्यांच्यात्यांच्या गरजांनुसार इंग्रजी बोलण्याचे स्वतंत्र अभ्यासक्रम राबविते.

प्राध्यापक उल्हास बापट एम.ए. एल्‌एल.बी आहेत. ते पुण्याच्या विधी महाविद्यालयात, एस.पी कॉलेजात आणि अमेरिकन फोर्ड फाउंडेशनच्या शैक्षणिक अभ्यासवर्गांत, कायदा आणि राज्यशास्त्र या विषयांचे अध्यापक होते. इंग्रजीचे उत्तम ज्ञान असल्याने त्यांना मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणे सहज शक्य होते, पण त्याऐवजी त्यांनी इंग्रजी शिकविणारी ॲकॅडमी काढली. उल्हास बापट यांच्या उच्चविद्याविभूषित कुटुंबीय-पत्नी विनया, पुत्र अमोल आणि कन्या अपर्णा बापट मोडक-हे सर्वजण त्याच संस्थेत अध्यापन करतात.

उल्हास बापट यांचे पिढीजात चालत आलेले एक सायकलचे दुकान पुण्यात लक्ष्मी रोडवर होते. एके दिवशी अचानक ते दुकान बंद करून त्यांनी त्या जागेवर इंग्रजी शिकविणारी प्रबोधिनी काढली. या संस्थेतून दरवर्षी १००० विद्यार्थी इंग्रजी बोलण्यात तरबेज होऊन बाहेर पडतात. अनेकांना येथील शिक्षणाचा ब्रिटिश, अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन स्कॉलरशिप्स मिळवून परदेशी जाण्यासाठी झाला आहे.

जाहीर सभांतून इंग्रजीत कसे बोलावे याचा वर्ग त्यांनी पुण्याच्या एस.पी. कॉलेजात सुरू केला. असा महाविद्यालयीन उपक्रम चालू करणारे उल्हास बापट बहुधा पहिलेच शिक्षक असावेत. त्यानंतर इंग्रजी शिकविणाऱ्या शिक्षकांची कमतरता पाहून त्यांनी असे शिक्षक तयार करण्यावर भर दिला. त्यासाठी बापट यांनी लंडनच्या एम्‌टीेएस या संस्थेत एक खास अभ्यासक्रम पुरा केला. त्यांनी केंब्रिज ॲकॅडमी ऑफ इंग्लिशचे आणि ऑक्सफर्डच्या सेंट क्लेअर्स कॉलेजचे सभासदत्व मिळविले.

इंग्रजी शिकविणारी संस्था काढली तरी प्रा. उल्हास बापट राज्यशास्त्र विसरले नाहीत. आजही ते भारतीय राज्यघटनेचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात आणि अधिकारवाणीने त्या विषयावरचे लेख मराठी आणि इंग्रजी नियतकालिकांमधून लिहितात.