डाॅ. विनय अपसिंगकर हे एक मराठी कवी व लेखक आहेत. सन १९५७ च्या एप्रिल महिन्यात ते नववीत असताना त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली. २००७ सालापर्यंत त्यांच्या कवितांचे ऩऊ संग्रह निघाले आहेत.

अपसिंगकरांनीचा गुराखी, शेतमजूर, पोलीस, शिक्षक, प्राध्यापक असे व्यवासय केले आहेत. पोलीस खात्यातून.बाहेर पडल्यावर ते आठ-दहा वर्षे बेकार होते. या काळात अपसिंगकरांनी शेती केली, नोकरी शोधली, बी.ए. केले आणि वर एम.ए. पीएच.डी केले.

अपसिंगकरांनी अंतरी ताळा पडे या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्या आत्मचरित्रात निझामशाही, रझाकारांचे अत्याचार आणि त्याकाळच्या मराठवाड्याचे वर्णन आहे.

प्रकाशित पुस्तके

संपादन
  • अंतरी ताळा पडे (आत्मचरित्र)
  • त्या उजाड गावावरती (कवितासंग्रह)
  • सावल्या उलटताना (कवितासंग्रह)