पांडुरंग श्रीधर आपटे
पांडुरंग श्रीधर आपटे (६ एप्रिल, इ.स. १८८७ - १९ डिसेंबर, इ.स. १९५६) हे एक मराठी साहित्यिक होते. ते गांधीवादी होते. आपटे गुरुजी या नावाने ते ओळखले जात. भारतातली पहिली राष्ट्रीय शाळा आपटे गुरुजींनी येवला येथे काढली होती.
पुस्तके
संपादन- अलौकिक अभियोग (पशू, पक्षी, वनस्पती यांची मानवनिर्मित निसर्गऱ्हासाबद्दल फिर्याद)
- आपल्या पूर्वजांचा शोध (डार्विनच्या सिद्धान्तावर आधारित)
- कुटुंब रंजन
- जवाहरलाल नेहरू
- महात्मा गांधी दर्शन
- लाडका मुलगा
- श्रीकृष्णाची आत्मकथा
- श्रीविद्यानंदस्वामीमहाराज व श्री केशवगोविंदमाहात्म्य
- साने गुरुजी : ओझरते दर्शन
- सेनापती बापट दर्शन
- स्वराज्य मार्गदर्शक लोकमान्य टिळक