आनंद माडगूळकर हे ग.दि. माडगूळकर यांचे चिरंजीव असून एक मराठी लेखक आहेत.

"गदिमां'च्या निधनानंतर त्यांचे पुत्र आनंद माडगूळकर यांनी गीतरामायणाचे सातशेहून जास्त प्रयोग देशात आणि परदेशांत केले. या प्रयोगाच्या दरम्यान रसिकांना गीतरामायण कसे घडले हे जाणून घेण्यात स्वारस्य आहे, हे त्यांना जाणवले. गीतरामायणाचा हा इतिहास आनंद माडगूळकरांनी लिहून पुस्तकरूपाने प्रकाशित केला आहे.

आनंद माडगूळकर यांची पुस्तके

संपादन
  • गीतरामायणाचे रामायण (प्रकाशन दिनांक ७-५-२०१२)
  • जिप्सीच्या वाटा (प्रकाशन दिनांक १४-१२-२०१४)