शांताराम आठवले

मराठी चित्रपट दिग्दर्शक, लेखक व गीतकार

शांताराम आठवले (२१ जानेवारी, इ.स. १९१०; पुणे, ब्रिटिश भारत - २ मे, इ.स. १९७५) हे मराठी चित्रपटदिग्दर्शक, लेखक, गीतकार होते.

शांताराम आठवले
जन्म २१ जानेवारी, इ.स. १९१०
पुणे, ब्रिटिश भारत
मृत्यू २ मे, इ.स. १९७५
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट (दिग्दर्शन),
साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार गीते, कथा, कादंबरी

जीवन संपादन

शांताराम आठवल्यांचा जन्म २१ जानेवारी, इ.स. १९१० रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील ग्वाल्हेर संस्थानाच्या सरदार शितोळ्यांचे पुण्यातील कारभारी होते [१]. पुण्यातल्या भावे प्रशालेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. आठवल्यांचे एक चुलतभाऊ - यशवंतराव आठवले - गंधर्व नाटकमंडळीच्या नाटकांत अभिनय करत असल्यामुळे शालेय जीवनात अनेक नाटके बघण्यासह नाट्यसॄष्टीशी जवळून परिचय होण्याची संधी त्यांना लाभली. याच काळात सरदार शितोळ्यांच्या पुण्यातील वाड्यावर घडणाऱ्या शाहिरी व लावणीच्या कार्यक्रमांमुळे त्यांच्यावर लोकगीतांचे संस्कार झाले.

इ.स. १९२८ साली शालान्त परीक्षेत गणित विषयात आठवले अनुत्तीर्ण झाले [१]. त्याच्या पुढल्याच वर्षी, म्हणजे इ.स. १९२९ साली, पक्षाघात झालेल्या त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे इ.स. १९३० साली पुन्हा शालान्त परीक्षेस बसून ते ती परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते वर्षभर महाविद्यालयात जात होते. मात्र इ.स. १९३१ साली आठवले कुटुंबाने पुण्याहून थेऊराजवळ असलेल्या कोलवडी या त्यांच्या वतनाच्या गावी बस्तान हलवल्यामुळे शांतारामांचे महाविद्यालयीन शिक्षण खुंटले [१].

शांताराम आठवले आणि नारायण हरी आपटे यांची चांगली पत्रमैत्री होती. १९३२ साली कौटुंबिक आपत्तींमुळे शांतारामने कॉलेज सोडले होते. आपटे यांच्या 'मधुकर' मासिकाला आणि श्रीनिवास मुद्रणालयाचे काम पाहण्यासाठी सहाय्यक म्हणून शांताराम आठवले कोरेगावला आले. शांताराम आठवले यांच्या कविता मधुकर मासिकामध्ये छापल्या जात असत. ('प्रभात'काल पान ५, ११-१३)

शांताराम आठवलेंना आपटे यांच्या शिफारसीमुळे अमृतमंथन या बोलपटाचे गीतलेखानाचे काम मिळाले. अशा रीतीने शांताराम आठवले प्रभातमध्ये सहाय्यक म्हणून १ जानेवारी १९३५ Archived 2020-02-22 at the Wayback Machine. पासून नोकरीस रुजू झाले. ('प्रभात'काल पान २०३,२०४)


काही प्रसिद्ध गीते संपादन

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ a b c "जीवन परिचय - साखरझोप". Archived from the original on 2011-11-21. २१ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे संपादन