डाॅ. विष्णू गोपाळ आपटे (१८ सप्टेंबर, १८५१ - २९ जुलै, १८९९) हे ब्रिटिश भारतात वैद्यकीय विषयावर लिखाण करणारे मराठी लेखक होते.

आपटे यांनी कोल्हापुरातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कोल्हापूर संस्थानाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयातून एल.एम.ॲन्ड एस. लायसेन्शिएट इन मेडिसिन ॲन्ड सर्जरीची पदवी पहिल्या वर्गात उत्तीर्ण होऊन संपादन केली. यानंतर काही काळ सरकारी डॉक्टर आणि नंतर कोल्हापूरच्या दरबाराचे असिस्टंट सर्जन म्हणून त्यांनी काम केले.

आपट्यांची कोल्हापूरच्या ग्रंथमालेतून न्यायवैद्यक आणि प्रसूतिचिकित्सक ही दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. पाश्चात्य वैद्यकाप्रमाणे आर्यवैद्यकशास्त्राचाही त्यांचा अभ्यास होता. या अभ्यासातूनच त्यांनी ग्रामवैद्य अथवा खेड्यातील प्रजा निरोगी राहण्याचा उपाय हा ग्रंथ लिहिला. याशिवाय, त्यांनी इंग्रज सरकारने तयार केलेल्या डोमेस्टिक इकॉनॉमी या ग्रंथाच्या मराठी भाषांतरासाठी प्रा. बालाजी प्रभाकर मोडक यांना साहाय्य केले.

विष्णू गोपाळ आपट्यांच्या मुंबई पुण्याच्या साहित्यविषयक चळवळीत पुढाकार व सहभाग असे.

वयाच्या अवघ्य ४८व्या वर्षी या साहित्यिक डाॅक्टरचे निधन झाले.

पुस्तके संपादन

  • ग्रामवैद्य अथवा खेड्यातील प्रजा निरोगी राहण्याचा उपाय
  • डोमेस्टिक एकॉनॉमी (अनुवादित; मूळ लेखक - मायकेल डोनोव्हन; सहअनुवादक - प्रा. बालाजी प्रभाकर मोडक)
  • न्यायवैद्यक
  • प्रसूतिचिकित्सक