विष्णूभटजी गोडसे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विष्णूभटजी गोडसे हे 'माझा प्रवास' या १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धकाळातील प्रवासानुभव कथणाऱ्या पुस्तकाचे लेखक होते. विष्णूभटजी मूळचे 'वरसई' (पेण तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र) येथील विद्वान होते. ते घरच्या गरिबीमुळे अर्थार्जनासाठी वरसई सोडून काशीस गेले. प्रवासात दैववशाने झाशी येथे १८५७ च्या उठावात सापडले. तेथे त्यांना झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा आश्रय लाभला. झाशीत आश्रयास असताना झाशीच्या किल्ल्याला पडलेल्या वेढ्यात सापडल्यामुळे उठावातील घडामोडी त्यांना प्रत्यक्ष पाहता आल्या. उठावातील प्रसंगांना तोंड देत खडतर प्रवास करत विष्णूभटजी अखेरीस वरसईस सुखरूप परतले. वरसईस परतल्यावर चिंतामणराव वैद्य यांच्या सांगण्यावरून विष्णूभटजींनी उठावाच्या हकिगती लिहून काढल्या आणि वैद्यांच्या ताब्यात दिल्या. १९०६ मध्ये विष्णूभटजींचे देहावसान झाले. त्यांच्या मृत्युपश्चात् १९०७ साली चिंतामणराव वैद्यांनी त्यांचे लिखाण 'माझा प्रवास' या नावाने पुण्यात प्रसिद्ध केले.
विष्णूभटजी गोडसे | |
---|---|
जन्म | ?? |
मृत्यू |
१९०६ वरसई, पेण तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | प्रवासवर्णन |
प्रसिद्ध साहित्यकृती | माझा प्रवास |
विविध आवृत्त्या
संपादनगेल्या १०५ वर्षांत अनेक संपादकांना "माझा प्रवास" ने भुरळ घातली आहे.
- १९०७: भारताचार्य चिंतामणराव वैद्य (मोडीचे देवनागरी रूपांतर).
- १९४९: न.र. फाटक, नवीन प्रस्तावनेसह. (चित्रशाळा प्रकाशन)
- १९६६: दत्तो वामन पोतदार (व्हीनस प्रकाशन)
- २००७: मृणालिनी शहा (राजहंस प्रकाशन)
बाह्य दुवे
संपादन- पुस्तक परीक्षण : एक पुस्तक-प्रवासाची कथा Archived 2009-12-19 at the Wayback Machine.