रायगड जिल्हा
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा.
रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले.
रायगड जिल्हा रायगड जिल्हा | |
---|---|
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा | |
![]()
| |
देश |
![]() |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | कोकण विभाग |
मुख्यालय | अलिबाग |
तालुके | १ पनवेल, २ पेण, ३ कर्जत, ४ खालापूर, ५ उरण, ६ अलिबाग, ७ सुधागड, ८ माणगाव, ९ रोहा, १० मुरूड, ११ श्रीवर्धन, १२ म्हसळा, १३ महाड, १४ पोलादपूर १५ तळा |
क्षेत्रफळ | ७,१४८ चौरस किमी (२,७६० चौ. मैल) |
लोकसंख्या | २२,०७,९२९ (२००१) |
लोकसंख्या घनता | ३०८.८९ प्रति चौरस किमी (८००.० /चौ. मैल) |
साक्षरता दर | ६०.४% |
जिल्हाधिकारी | डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी (ऑगस्ट २०१८). |
लोकसभा मतदारसंघ | मावळ (लोकसभा मतदारसंघ), रायगड (लोकसभा मतदारसंघ) |
खासदार | गजानन बाबर, अनंत गंगाराम गीते |
संकेतस्थळ |
हा लेख ’रायगड’ नावाचा महाराष्ट्रातील जिल्हा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, रायगड (निःसंदिग्धीकरण).
सीमा
रायगड जिल्ह्याच्या
- पश्चिम- अरबी समुद्र,
- उत्त्तरेला- ठाणे जिल्हा,
- पूर्वेला- पुणे जिल्हा
- दक्षिणेला- रत्नागिरी जिल्हा आहेत.
तालुके
पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि तळा