नेरळ
नेरळ हे रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यामधील एक गाव आहे. नेरळ रेल्वे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील एक स्थानक आहे. येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी छोट्या रेल्वेचे हे पहीले स्थानक आहे. या छोट्या नॅरो गेज रेल्वे ट्रॅकचे निर्माण अब्दुल हुसैन आदमजी पीरबोय यांनी स्वखर्चाने केला, इ.स. १९०७ मध्ये या ट्रॅकवर पहीली छोटी रेल्वेगाडी धावली.
नेरळ | |
भारतामधील शहर | |
माथेरान डोंगरी रेल्वे |
|
देश | ![]() |
राज्य | महाराष्ट्र |
जिल्हा | रायगड जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | १३० फूट (४० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १६,०६० |
- घनता | ३६८ /चौ. किमी (९५० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |
neral.ind.in |
हवामानसंपादन करा
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.