माथेरान डोंगरी रेल्वे

माथेरान डोंगरी रेल्वे ही भारतीय रेल्वेची एक विशेष सेवा आहे. नॅरो गेजवर धावणारी ही छोटी रेल्वे महाराष्ट्रामधील माथेरान ह्या लोकप्रिय थंड हवेच्या पर्यटन स्थळाला मध्य रेल्वेवरील नेरळसोबत जोडते. मुंबई उपनगरी रेल्वेच्या नेरळ स्थानकापासून नेरळ−माथेरान रेल्वेची सुरुवात होते. सह्याद्री पर्वतरांगेमधून वाट काढत ही रेल्वे नेरळ ते माथेरान दरम्यानचे २१ किमी अंतर सुमारे २ तास २० मिनिटांमध्ये पार करते.

नेरळ स्थानकामधून सुटणारी माथेरान डोंगरी रेल्वे
नेरळ−माथेरान रेल्वे
नेरळ
जुम्मापट्टी
वॉटर पाईप
अमन लॉज
माथेरान
माथेरान रेल्वे स्थानक

इ.स. १९०१ साली ब्रिटिश राजवटीदरम्यान प्रसिद्ध उद्योगपती सर आदमजी पीरभॉय ह्यांनी स्वतःचे भारतीय रूपया १६ लाख खर्च करून ही रेल्वे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पीरभॉय ह्याने १९०७ साली नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण केले. स्वातंत्र्यानंतर इतर सर्व खाजगी रेल्वेमार्गांप्रमाणे नेरळ-माथेरान रेल्वेदेखील भारत सरकारच्या अखत्यारीखाली आली. १९८३ साली ह्या रेल्वेवरील सर्व वाफेची इंजिने बंद करून त्याऐवजी डिझेल इंजिने वापरली जाऊ लागली.

२००५ सालच्या रायगड जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरादरम्यान माथेरान रेल्वेचा बव्हंशी मार्ग वाहून गेला. तब्बल २ वर्षांनंतर ह्या मार्गाची डागडुजी पूर्ण होऊन मार्च २००७ मध्ये ही रेल्वे पुन्हा सुरू करण्यात आली. सध्या ह्या रेल्वेच्या दररोज ५ सेवा चालवल्या जातात. तसेच अमन लॉज ते माथेरानदरम्यान अतिरिक्त फेऱ्या देखील चालवल्या जातात.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन